शहरं
Join us  
Trending Stories
1
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
2
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
3
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
4
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
5
बँकेने गुन्हा दाखल केल्याने त्याची सटकली, साथीदारांना सोबत घेत अख्खी बँकच पेटवली
6
UPSC पास झाल्यानंतर उमेदवारांना पहिला पगार कधी आणि किती मिळतो? पाहा...
7
"मुस्लीम राजेशाही असो अथवा लोकशाही, वक्फ सर्वत्र...;" सौदीत पोहोचलेल्या PM मोदींवर ओवेसींचा निशाणा
8
Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला; पर्यटकांवर केला गोळीबार, २ जण जखमी
9
Jammu and Kashmir : दहशतवाद्यांनी पर्यटकांना आधी विचारला 'हा' प्रश्न अन् सुरू केला गोळीबार, नेमकं काय घडलं?
10
दहशतवाद्यांनी आधी धर्म विचारला, नंतर झाडल्या गोळ्या, पहलगाम हल्ल्यातील जखमींचा धक्कादायक दावा   
11
'नरेंद्र मोदी जगातील सर्वात लोकप्रिय नेते', जेडी व्हेन्स यांनी केले पंतप्रधानांचे कौतुक...
12
IPL 2025: हर्षा भोगलेंना KKRच्या मॅचमधून मुद्दाम वगळलं? खुद्द त्यांनीच दिलं स्पष्टीकरण
13
तेव्हा सलग १७ वर्षे घटत होते सोन्याचे दर, झालं होतं एवढं स्वस्त, मात्र आता...  
14
जालना: बॉयफ्रेंडकडून बदनामीच्या धमक्या, १८ वर्षीय तरुणीने संपवलं आयुष्य, मृतदेह कुठे सापडला?
15
टेबल फॅन खूपच खराब झालाय? स्वच्छ करण्यासाठी पाहा 'ही' सोपी पद्धत, पंखा दिसेल नव्यासारखा
16
नरेंद्र मोदींचं विमान सौदी अरेबियाच्या हवाई हद्दीत प्रवेश करताच घडलं असं काही, सारेच अवाक्
17
सलग सहाव्या दिवशी बाजार तेजीत बंद; 'या' बँकांच्या शेअर्सने खाल्ला भाव; कोणत्या सेक्टरमध्ये घसरण?
18
बापरे! सासू अन् जावयानंतर आता विवाहित महिला १५ वर्षाच्या मुलासोबत फरार, प्रकरण काय?
19
सोन्यानं पार केला १ लाखांचा टप्पा, शक्ती कपूरनं ३५ वर्षांपूर्वीच केलेली भविष्यवाणी; व्हिडीओ व्हायरल
20
'२३७ जागा मिळल्याचा माज करू नका, शिंदेंमुळे त्या मिळाल्या', शिवसेना आमदार कदमांचा अतुल सावेंवर पलटवार

बावधन खुर्द येथील वन्यजीव उपचार व अनाथालयाला मंत्रिमंडळाची मंजुरी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2018 14:05 IST

मानवी हल्ल्यामुळे किंवा वाहनांची धडक बसल्यामुळे जखमी झालेल्या वन्य जीवांवर उपचार करण्यासाठी पुण्यात स्वतंत्र केंद्र सुरू होणार आहे.

ठळक मुद्दे एकाच ठिकाणी प्राण्यांवर उपचार करणारी सक्षम यंत्रणा उपलब्ध असून तज्ज्ञ डॉक्टरांचा गट कार्यरतवन्य पक्षी व प्राण्याची संख्या आणि त्यांच्यावर होणारा खर्चात दिवसेंदिवस वाढ

पुणे : बावधान खुर्द येथे वन्य जीवांसाठी उपचार केंद्र व अनाथालय उभारण्याच्या वन विभागाच्या प्रस्तावास मंत्रिमंडळाने नुकतीच मंजूरी दिली. त्यामुळे मानवी हल्ल्यामुळे किंवा वाहनांची धडक बसल्यामुळे जखमी झालेल्या वन्य जीवांवर उपचार करण्यासाठी पुण्यात स्वतंत्र केंद्र सुरू होणार आहे. परिणामी पुढील काळात वन विभागाला वन्यजीव उपचारासाठी कात्रज येथील राजीव गांधी प्राणी संग्रहालयाच्या उपचार केंद्रावर अवलंबून राहावे लागणार नाही.जिल्ह्यात भीमाशंकर सारखे मोठे अभयारण्य असून शेकरू, बिबट्या, वानर, माकड, कोल्हा, लांडगा, हरिण, काळवीट आदी वन्य प्राणी आढळून येतात. तसेच शहरात व इतर परिसरात विविध वन्य पक्षीही आढळून येतात. दिवसेंदिवस वन क्षेत्रातील मानवी हस्तक्षेप वाढत चालला आहे. त्यामुळे काही कारणास्तव हे वन्य प्राणी जखमी होतात. तसेच आजारी पडतात. त्यामुळे त्यांच्यावर योग्यवेळी उपचार करणे आवश्यक असते. मात्र, जिल्ह्यात केवळ कात्रज येथील प्राणी संग्रहालय या एकाच ठिकाणी प्राण्यांवर उपचार करणारी सक्षम यंत्रणा उपलब्ध असून तज्ज्ञ डॉक्टरांचा गट कार्यरत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील विविध ठिकाणांहून या ठिकाणी जखमी वन्य प्राणी उपचारासाठी आणले जातात. त्याचप्रमाणे जुन्नर तालुक्यात माणिकडोह येथे बिबट्या निवारण केंद्र आहे. याठिकाणी जखमी बिबट्यावर उपचार केले जातात. त्याचप्रमाणे त्यांचे संगोपनही केले जाते. प्राणी संग्रहालयातील वन्य पक्षी व प्राण्याची संख्या आणि त्यांच्यावर होणारा खर्च दिवसेंदिवस वाढत चालला आहे. संग्रहालयात वन विभागाकडून जखमी वन्य प्राणी उपचारासाठी दाखल केले जातात. मात्र, वन विभागाने स्वत:चे वन्यजीव अनाथालय स्थापन करण्याचा निर्णय घेतला. गेल्या काही महिन्यांपासून वज्यजीव उपचार केंद्र स्थापन करण्याचा शासनाकडे पडून होता. अखेर मंत्रिमंडळाकडून त्यास मंजुरी मिळाली. त्यामुळे उशीराका होईना बावधान परिसरात नवीन वन्यजीव उपचार केंद्र सुरू होणार आहे. 

टॅग्स :wildlifeवन्यजीवState Governmentराज्य सरकारkatraj zoo parkकात्रज प्राणीसंग्रहालयJunnarजुन्नर