शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदार यादीचे देशव्यापी पुनरावलोकन का गरजेचे? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
2
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
3
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यालयात 'वाजले की बारा' लावणी; सुनेत्रा पवारांचा थेट शहराध्यक्षांना कॉल
5
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सेमीफायनलपूर्वी भारतीय महिला संघाला मोठा धक्का, दुखापतीमुळे आघाडीची फलंदाज स्पर्धेबाहेर 
6
निवडणूक आयोगाने देशात SIR ची घोषणा केली; या १२ राज्यांमध्ये होणार सुरुवात, असे असणार वेळापत्रक
7
घराणेशाहीचं राजकारण आता चालणार नाही; ठाकरे बंधूंवर अमित शाहांचा निशाणा, म्हणाले...
8
शेअर बाजार 'रॉकेट'! PSU बँक, रियल्टी आणि ऑटो स्टॉक्सला मागणी; पहा सेन्सेक्सच्या टॉप ५ कंपन्या
9
दोन जणांची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये लैंगिक छळ अन् 'HIV'चा उल्लेख...! अरुणाचल पोलिसांकडून फरार IAS अधिकाऱ्याला अटक 
10
कंगना रणौत भटिंडा न्यायालयात हजर, शेतकरी आंदोलनादरम्यान केलेल्या 'त्या' टिप्पणीबद्दल मागितली माफी
11
धक्कादायक! तूप, दारू आणि स्फोट...UPSC विद्यार्थ्याच्या लिव्ह-इन पार्टनरकडून भीषण हत्या
12
३ दिवसांपासून रॉकेट बनलाय 'हा' शेअर; सातत्यानं लागतंय अपर सर्किट, आता डिविडेंड देण्याचीही तयारी
13
Phaltan Doctor Death: रिलेशनशिप, भांडणं, प्रशांतला डेंग्यू झाल्याने पुन्हा आले एकत्र; कॉल्स, मेसेजचे स्क्रीनशॉट्स पोलिसांकडे
14
IND vs AUS: भारत की ऑस्ट्रेलिया, टी२० मध्ये कोणाचं पारडं जड? पाहा हेड टू हेड रेकॉर्ड!
15
VIDEO: 'तारेवरची कसरत'! मांजर विजेच्या तारेवरून चालत होती, अचानक लागली आग अन् पुढे...
16
"या हॉटेलवर डॉक्टर तरुणीला का बोलावलं होतं?"; सुषमा अंधारे रणजितसिंह नाईक निंबाळकरांचे नाव घेत काय म्हणाल्या?
17
"फलटणच्या घटनेत माजी खासदाराला मुख्यमंत्र्यांकडून क्लिन चिट म्हणजे कटात सहभाग असल्याचा पुरावाच’’, काँग्रेसचा आरोप 
18
Orkla India IPO च्या जीएमपीमध्ये मोठी तेजी; 'या' तारखेपासून लावू शकणार बोली, केव्हा होणार लिस्टिंग?
19
वादग्रस्त इस्लामिक धर्मगुरू झाकीर नाईकसाठी बांगलादेशात 'पायघड्या'; भारतात आहे MOST WANTED
20
ढासू परतावा...! ₹100 पेक्षाही कमी किंमतीच्या शेअरची कमाल, 5 वर्षांती दिला 6455% परतावा; आता रेल्वेकडून मिळाली मोठी ऑर्डर

सीएए हा रौलेट कायद्यासारखा काळा कायदा : उर्मिला मातोंडकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2020 21:30 IST

सीएए हा रौलेट ऍक्टसारखा काळा कायदा आहे. हा कायदा केवळ मुस्लिमांच्या विरोधात नाही, तर गरीबांच्या विरोधात आहे. तो आम्हाला मान्य नाही. हा वणवा सुरु असताना शांत राहून चालणार नाही अशा शब्दात अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी आपले विचार व्यक्त केले. 

पुणे : सीएए हा रौलेट ऍक्टसारखा काळा कायदा आहे. हा कायदा केवळ मुस्लिमांच्या विरोधात नाही, तर गरीबांच्या विरोधात आहे. तो आम्हाला मान्य नाही. हा वणवा सुरु असताना शांत राहून चालणार नाही अशा शब्दात अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी आपले विचार व्यक्त केले. 

'सीएए, एनआरसी, एनपीआर विरोधी अहिंसात्मक जनआंदोलन ' या विषयावर महाराष्ट्र गांधी स्मारक निधीतर्फे  आयोजित सभेला त्यांनी हजेरी लावलीमहात्मा गांधी पुण्यतिथी आणि हुतात्मा दिनानिमित गांधी भवन, कोथरूड येथे  जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. बिशप थॉमस डाबरे, सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड  यांच्या प्रमुख उपस्थितीत ही जाहीर सभा झाली. अध्यक्षस्थानी महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष डॉ.कुमार सप्तर्षी होते.

 मातोंडकर म्हणाल्या, '  महात्मा गांधी यांच्या विचारधारेचा आपण भाग आहोत, हा अभिमानाचा भाग आहे. घोषणाबाजी करणाऱ्यांनाही गांधीजींना अभिवादन करायला राजघाटावर जावे लागते, ही वस्तुस्थिती आहे.भारतीयता सर्वांच्या नसानसात आहे. अहिंसेविरुद्ध काहीही चालू देऊ नका.केवळ संसद म्हणजे देश नाही. नागरिक म्हणजे देश आहे, हे या कायद्याच्या संदर्भात लक्षात घेतले पाहिजे. आपला देशच आपल्याला ओळखू येणार नाही, इतका बदलू देऊ नका असे आवाहनही त्यांनी विरोधकांना केले '

सप्तर्षी पुढे म्हणाले, 'सरकार आपल्याला कागद मागत असेल तर आपण त्यांना मध्यावधी निवडणूक घेवून जनादेशाचा कागद मागा. ज्यांना अक्कल नसते ते नक्कल करतात, हे हिटलरची नक्कल करीत आहेत. हिटलरला आत्महत्या करावी लागली आणि राख झाली.40 कोटी लोक या कायद्यामुळे देशोधडीला लागतील. हा लढा केवळ मुस्लिमांचा नाही, सर्वांचा आहे, तो बंधुतेने लढला पाहिजे. 

 डाबरे म्हणाले, ' मी महात्मा गांधी यांचा अनुयायी आहे, याचा अभिमान वाटतो. अहिंसा, त्याग ही अंतिम मूल्ये आम्ही मानतो. धार्मिक भेदाभेद, पक्षपात आम्हाला मान्य नाही. भारत हा सर्वांचा आहे. राष्ट्र हे कुटुंब आहे. ही आमची भूमिका आहे. सामंजस्य, सलोख्यासाठी सर्वांनी प्रयत्नशील राहावे. '

 सेटलवाड म्हणाल्या, '.आज गांधीजी असते तर त्यांनी विभाजनवादी कायद्यांना विरोध केला असता. कागदपत्रांच्या आडून जमिनी मोकळया करणे , हडप करून अडाणी सारख्या उद्योगपतींना देणे, हाही कट सीएए, एनआरसी, एनपीआर आणण्यामागे आहे. सर्व आघाडयांवर केंद्र सरकार अयशस्वी ठरल्याने अशांतता निर्माण करुन राज्य करण्यात सरकार मश्गूल आहे. महाराष्ट्र गांधी स्मारक निधीच्या शांती दलाचे कार्यवाह संदीप बर्वे यांनी सूत्रसंचालन केले.  

टॅग्स :Urmila Matondkarउर्मिला मातोंडकरcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकKumar Saptarshiकुमार सप्तर्षी