स. प. महाविद्यालयात योग दिन उत्साहात साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:09 IST2021-06-24T04:09:49+5:302021-06-24T04:09:49+5:30

कार्यक्रमाची सुरुवात शिक्षण प्रसारक मंडळीचे अध्यक्ष ॲड. एस. के. जैन व क्रिडा समितीचे अध्यक्ष केशव वझे यांच्या मनोगताने झाली. ...

C. W. Yoga Day celebrated in college | स. प. महाविद्यालयात योग दिन उत्साहात साजरा

स. प. महाविद्यालयात योग दिन उत्साहात साजरा

कार्यक्रमाची सुरुवात शिक्षण प्रसारक मंडळीचे अध्यक्ष ॲड. एस. के. जैन व क्रिडा समितीचे अध्यक्ष केशव वझे यांच्या मनोगताने झाली. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आंतरराष्ट्रीय योगपटू सुनील रोट्टी उपस्थित होते. बॉक्सिंग खेळातील अर्जुन पुरस्कार प्राप्त मनोज पिंगळे, पराग ठाकूर, राजेंद्र पटवर्धन, राधिका इनामदार यांचे मार्गदर्शन लाभले.

आकांक्षा खराडे या योगपटूने प्रात्यक्षिके केली. महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या डॉ. सविता दातार व उपप्राचार्य, शिक्षक उपस्थित होते. शारीरिक शिक्षण संचालक रणजीत चामले यांनी संचलन केले. शिक्षण प्रसारक मंडळीच्या पुणे, निगडी, चिपळूण, मुंबई, सोलापुरातील नियामक मंडळाचे सर्व सदस्य, शाळा व महाविद्यालयांचे विद्यार्थी, शिक्षक, पालक या कार्यक्रमामध्ये ऑनलाइन पद्धतीने सहभागी झाले होते. मिहीर प्रभुदेसाई यांनी आभार मानले.

Web Title: C. W. Yoga Day celebrated in college