शहरं
Join us  
Trending Stories
1
"छत्रपती शिवरायांच्या सैन्यात मुस्लिम लोक होते"; आमचे आदर्श मुस्लिमविरोधी नसल्याचे राजनाथ सिंहांचे विधान
2
Tim David नं मोडला किंग कोहलीचा विक्रम; अर्धशतकी खेळीसह असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
3
“कधीही कोणत्याही उपराष्ट्रपतींना अशी राजकीय विधाने करताना पाहिले नाही”: कपिल सिब्बल
4
RCB vs PBKS : पावसाच्या बॅटिंगनंतर विराटसह RCB च्या स्टार फलंदाजांची 'घसरगुंडी' अन् पंजाबचा भांगडा!
5
लाडकी बहीण योजना: एप्रिलचा हप्ता कधी मिळेल? ५०० मिळणार की १५००? नियम बदलले का? जाणून घ्या
6
Maiden IPL Fifty For Tim David : एकटा पडला, शेवटपर्यंत नडला अन् पहिली फिफ्टीही ठोकली
7
धक्कादायक; सोलापूरचे न्युरोसर्जन डॉ. शिरीष वळसंगकर यांची आत्महत्या; डोक्यात झाडली गोळी
8
IPL 2025 :पदार्पणाच्या सामन्यात जे घडलं तेच १८ वर्षांनी पुन्हा विराट कोहलीच्या वाट्याला आलं
9
“अमित शाह भेट वैयक्तिक होती तर तो भार सरकारी तिजोरीवर कशाला, तटकरेंनी...”; कुणी केली टीका?
10
२००० रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या UPI व्यवहारांवर भरावा लागणार जीएसटी? सरकारने केली घोषणा
11
अरविंद केजरीवाल यांच्या लेकीचे फाईव्ह स्टार हॉटेलात थाटात लग्न...! जावई कोण? काय करतो...
12
टेस्ला भारतात येण्यापूर्वी पंतप्रधान मोदींची मस्क यांच्याशी चर्चा; फोनवर काय झाला संवाद?
13
“उद्या बाळासाहेबांच्या आवाजात शरद पवार, सोनिया गांधी देवमाणूस आहेत असे वदवून घ्याल”
14
IPL 2025 : जुने तेवर दिसले! दिग्गज क्रिकेटर म्हणाला; लवकरच रोहितच्या भात्यातून मोठी खेळीही येईल
15
साखरपुड्यातच होणाऱ्या पत्नीने प्रियकराला मिठीत घेतलं अन्... लग्नाचे स्वप्न पाहणाऱ्या अधिकाऱ्याने आयुष्य संपवलं!
16
“काहीही चूक नाही, हिंदी देशाची भाषा आहे, मुलांना...”; सक्तीला संजय निरुपम यांचे समर्थन
17
हिंदी सक्तीला विरोध की पाठिंबा? आदित्य ठाकरे म्हणाले, “प्रगतीसाठी जास्त भाषा येणे गरजेचे”
18
रोल्स रॉयसच्या कारची नावे कायम भुतांवरून का असतात? इतर कंपन्यांनी ठेवली तर कोणी घेणारही नाही...
19
अन् बोभाटा झाला...! घरच्यांपासून बँकॉक ट्रिप लपविण्यासाठी काकांनी पासपोर्टची पाने फाडली; आता जगाला समजले...
20
शाळेच्या कार्यक्रमात प्रेम जागे झाले आणि तिने सगळं संपवलं; प्रियकरासाठी केली तीन मुलांची हत्या

नगर रस्त्याला वाघोलीतून बायपास, दोन किलोमीटरच्या मार्गामुळे वाहतूककोंडी टळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2018 03:25 IST

नगर रस्त्यावरील वाहतूककोंडी दिवसेंदिवस जटिल बनत चालली आहे. वाघोली परिसरात तासन्तास वाहतूककोंडीला सामोरे जावे लागत असल्याने नगर रस्त्यावरून प्रवास करणारे शालेय विद्यार्थी, प्रवासी, नोकरदार, व्यावसायिक आणि स्थानिक नागरिक प्रचंड त्रस्त झाले आहेत.

- अभिजित कोळपेपुणे : नगर रस्त्यावरील वाहतूककोंडी दिवसेंदिवस जटिल बनत चालली आहे. वाघोली परिसरात तासन्तास वाहतूककोंडीला सामोरे जावे लागत असल्याने नगर रस्त्यावरून प्रवास करणारे शालेय विद्यार्थी, प्रवासी, नोकरदार, व्यावसायिक आणि स्थानिक नागरिक प्रचंड त्रस्त झाले आहेत. ही वाहतूककोंडी सोडविण्यासाठी पीएमआरडीएने पुढाकार घेतला असून, यासाठी १५ कोटी रुपयांचा डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट (डीपीआर) तयार केला आहे. प्रथम वाघेश्वर मंदिर-भावडी रस्ता ते बकोरी फाटा असा २ किलोमीटर १०० मीटरचा बायपास करण्यात येणार असल्याचे पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणचे (पीएमआरडीए) आयुक्त किरण गित्ते यांनी सांगितले.चंदननगर-खराडी ते वाघोली आणि वाघोली-लोणीकंद ते पेरणे फाटापर्यंत सात ते आठ किलोमीटरपर्यंत वाहतूककोंडी नित्याचीच झाली आहे. शाळा, कॉलेजमध्ये जाणारे विद्यार्थी, नोकरदार, अत्यावश्यक सेवा, अ‍ॅम्ब्युलन्स आदी या वाहतूककोंडीने त्रस्त आहेत. वाघोली परिसरातील वाघेश्वर मंदिर परिसर, आव्हाळवाडी फाटा, बाजारतळ, केसनंद फाटा आणि भारतीय जैन संघटना शैक्षणिक संकुल (बीजेएस कॉलेज) आदी चौकांमध्ये तर दुचाकी चालकांनाही मोठी कसरत करावी लागत असल्याचे चित्र पीएमआरडीच्या टीमने केलेल्या पाहणीमध्ये निदर्शनास आले आहे. हा परिसर पीएमआरडीच्या अंतर्गत येत असल्याने तातडीने करण्यासारख्या गोष्टींचा अहवाल तयार केला. त्यामुळे प्रथम बायपास, त्यानंतर ग्रेडसेपरेटर बनवण्याचे नियोजन केल्याचे आयुक्त किरण गित्ते यांनी सांगितले.औद्योगिक कंपन्यांमुळे येरवडा ते शिरूर या जवळपास ७० किलोमीटरच्या भागातील जमिनीचा मोठा भावआला आहे. वाघोली, लोणीकंदआणि पेरणे फाटा येथे मोठमोठाल्या रहिवासी इमारती निर्माण झाल्या आहेत. सध्या येथे वास्तव्यास असलेल्या लोकांची संख्या ५ लाखांच्याही पुढे गेली आहे.त्यामुळे याठिकाणी पायाभूत सुविधा उभ्या करणे गरजेचे असल्याने पीएमआरडीएने १५ कोटींचा डीपीआर तयार केला असून, प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आहे.५२ गावांसाठी अग्निशमन केंद्रांचे काम सुरूवाघोली येथील सामाईक सुविधा क्षेत्रातील किमान ४००० चौ. मी. भूखंडावर सुसज्ज असे अग्निशमन केंद्र उभारण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. यासाठी आवश्यक असणाऱ्या अग्निशमन वाहने व उपकरणे यांची खरेदी केली आहे.इमारत बांधकामासाठी ७ कोटी ५० लाख रुपये, तर यंत्रसामग्रीसाठी ७ कोटी रुपये असा एकूण १४ कोटी ५० लाख रुपयांचा खर्च येणार आहे. विशेष नागरी वसाहतींनी विकसित केलेली अग्निशमन केंद्रे करारनामा करून प्राधिकरणामार्फत कार्यान्वित करण्यासाठी होणाºया वार्षिक ५० टक्के खर्चाची प्रतिपूर्ती पीएमआरडीच्या वतीने करणार आहे.परिणामी, वाघोली परिसरातील ५२ गावांतील तब्बल ४ लाख ८२ हजार लोकसंख्येला या यंत्रणेची सेवा मिळणार आहे. त्याचबरोबर नांदेड सिटी, अ‍ॅमेनोरा टाऊनशिप आणि कोलते पाटील डेव्हलपर्स यांच्याकडून तीन फायर स्टेशन टेकओव्हर पीएमआरडीने केले आहेत.चारशे मीटरचा ग्रेडसेपरेटर बनवणारवाघोली बाजारतळ, आव्हाळवाडी फाटा ते केसनंद फाटा अशा साधारण चारशे मीटर अंतराचा ग्रेडसेपरेटरच्या कामाला लवकरच सुरुवात करण्यात येणार आहे. या कामासाठी ७ ते ८ कोटींचा खर्च येणार आहे. पुढील दोन महिन्यांत ग्रेडसेपरेटरच्या कामाचे टेंडर काढणार आहे.बायपाससाठी जागा देणाºयांना टीडीआर देणारवाघोलीतील कोंडी सोडवण्यासाठी प्रथम बायपास करणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने वाघेश्वर मंदिर, भावडी रस्ता ते बकोरी फाटा असा २ किलोमीटर १०० मीटरचा बायपास तयार करणार आहोत. त्यासाठी जागेचा सर्व्हे केला आहे. दोनदा टेंडरही काढले होते; मात्र काही तांत्रिक आडचणी आल्या त्यामुळे पुन्हा टेंडरला मुदतवाढ दिली आहे. या बायपाससाठी तीन ते चार बिल्डरांनी जागा दिली आहे. उर्वरित स्थानिक नागरिकांना जागेविषयीच्या नोटिसाही पाठवल्या आहेत. बहुतांश नागरिकांचे सहकार्य आहे. तर काही मोजक्या नागरिकांचा जागा देण्यास विरोध आहे. त्यांच्यासी सकारात्मक चर्चा सुरू आहे. काही नागरिकांची झोन चेंज करण्याची मागणी आहे. त्यावर चर्चा सुरू आहे. या बायपाससाठी जागा देणाºया नागरिकांना पीएमआरडीएच्या टाऊनशिपमध्ये ५० टक्के जागा विकसित करून देणार आहोत. त्याचबरोबर टीडीआर देण्यात येणार आहे. त्यामुळे लवकरच बायपासचे काम सुरू होईल.- किरण गित्ते, आयुक्त, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए)

टॅग्स :Puneपुणे