शहरं
Join us  
Trending Stories
1
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
4
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
5
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
6
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
7
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
8
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
9
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
10
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
11
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
12
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
13
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
14
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
15
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
16
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
17
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
18
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
19
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

बायपास रस्ता झालाय धोकादायक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2018 11:30 PM

अनेक वेळा निवेदने देऊनही रस्ते बांधकाम विभागाचे त्याकडे पुर्णपणे दुर्लक्ष असल्याचे दिसून आले

वाघापूर : दिवे घाटातून पुरंदर तालुक्यात प्रवेश केल्यानंतर झेंडेवाडी ते कुंभारवळण असा वनपुरीमार्गे बायपास रस्ता महाराष्ट्र शासनाने दोन वर्षांपूर्वी तयार केला आहे. परंतु या संपूर्ण मार्गावर रस्ते बांधकाम विभागाने सूचनाफलक, दिशादर्शक फलक, साईड पट्टे अथवा रात्रीच्या वेळी दिसणारे रिफ्लेक्टर दिवे बसविलेले नाहीत. त्यामुळे वाहनचालकांना अंदाज न आल्याने गेल्या दोन वर्षांत अनेक मोठे अपघात होऊन कित्येक जणांचे प्राण गेले आहेत.याबाबत स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा निवेदने देऊनही रस्ते बांधकाम विभागाचे त्याकडे पुर्णपणे दुर्लक्ष असल्याचे दिसून आलेआहे. त्यामुळे या मार्गावरून वाहतूक करणे धोक्याचे झाले असल्याचे स्पष्ट झाले आहे.एवढे होऊनही सार्वजनिक रस्ते बांधकाम विभाग मात्र सुस्तच असल्याने वाहनचालक व स्थानिक नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. तालुक्याच्या पूर्व भागातील वनपुरी, उदाचीवाडी, पारगाव, वाघापूर, माळशीरस तसेच यवत आणि वाघापूरमार्गे, उरुळी, कांचन या रस्त्यांना मिळण्यासाठी झेंडेवाडीते वनपुरी या मार्गाचा अवलंब केला आहे. या रस्त्यावरून वाहतूक केल्याने सासवड येथे येण्याची गरज नसते तसेच किमान पाच किलो मीटरचे अंतर वाचत असल्यामुळे वेळ आणि इंधन यांचीही बचत होत आहे. यामुळे या मार्गाला वाहनचालकांची पहिली पसंती आहे. परंतु केवळ रस्ते बांधकाम विभागाचा हलगर्जीपणामुळे आता अनेकांच्या जिवावर बेतला आहे.या ठिकाणी आजपर्यंत किमान सात ते आठ प्रवाशांचा मृत्यू आणि कित्येक जखमी झाल्याचे घाटना घडल्या आहेत.तर येथे मोठया घटना घडण्याचीही शक्यता आहे. मात्र, याकडे लोकप्रतिनिधींसह एकाही अधिकाऱ्याचे लक्ष नसल्याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.>एकही दिशादर्शक फलक नाही...झेंडेवाडीपासून पूर्वेकडे दिवे, सोनोरी, वनपुरी आणि कुंभारवळण आणि पुढे पारगाव-मेमाणे या रस्त्याला हा रस्ता मिळतो. वास्तविक, या मार्गावर सुरक्षेच्या दृष्टीने अनेक उपाययोजना करायला हव्या होत्या; मात्र संपूर्ण मार्गावर एकही दिशादर्शक फलक, वळण, पारदर्शक दिवे अथवा गावांचे बोर्ड अथवा झेब्रा क्रॉसिंग पट्टे असे कुठलेच फलक न लावल्याने वाहनचालकांना अंदाज येत नाहीतआणि त्यामुळे वारंवार जीवघेणे अपघात होत आहेत.विशेषत: वनपुरीजवळ झेंडेवाडी ते कुंभारवळण आणि सासवड ते वाघापूर असा चौफुला तयार झाला असून चारही बाजूंनी अखंड वाहतूक सुरू असते. तसेच, या संपूर्ण मार्गावर रस्त्यालगत अनेक मोठमोठी झाडे असून त्यामुळेही वाहनचालकांना अंदाज येत नाही. यामुळे मार्गावर विविध कामांची मागणी वाहनचालक तसेच स्थानिकांकडून वारंवार केली जाते. तसेच याकडे वेळीच लक्ष न दिल्यास अनेक नागरिक आणि संघटनांनी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

टॅग्स :Puneपुणे