शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

फायनान्स कंपनीतील घोटाळ्यामुळे व्यावसायिकांची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2018 15:16 IST

भागीदारांनी केलेल्या घोटाळ्यामुळे आता गुंतवणूकदारांचे पैसे कसे द्यायचे, या विचाराने मानसिक दबावातून व्यावसायिकाने गोळी झाडून घेऊन शुक्रवारी आत्महत्या केली होती.

पुणे : भागीदारांनी केलेल्या घोटाळ्यामुळे आता गुंतवणूकदारांचे पैसे कसे द्यायचे, या विचाराने मानसिक दबावातून व्यावसायिकाने गोळी झाडून घेऊन शुक्रवारी आत्महत्या केली होती. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी दोघा भागीदारांसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.अरविंद लक्ष्मण फाळके (वय ५७, रा. अमर कॉटेज, भोसलेनगर, हडपसर) असे आत्महत्या केलेल्या व्यावसायिकाचे नाव आहे. तर शिवाजी जाधव आणि सुनील गोसावी अशी गुन्हा दाखल झालेल्या त्यांच्या भागीदारांची नावे आहेत.याप्रकरणी अक्षय अरविंद फाळके (वय २८, रा. भोसलेनगर, हडपसर) यांनी फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अरविंद फाळके यांनी शिवाजी जाधव व सुनील गोसावी यांच्याबरोबर २०११ मध्ये सौदामिनी फायनान्स ही कंपनी हडपसर येथील वैशाली हाईटसमध्ये सुरू केली. त्याबरोबर या दोघांच्या सांगण्यावरून त्यांनी चीटफंडही सुरू केला. चीटफंड व फायनान्स कंपनीसाठी त्यांनी नातेवाईक व इतरांकडून ठेवी घेतल्या होत्या. त्यात जाधव, गोसावी व अन्य दोघांनी ६ ते ८ कोटी रुपयांचा घोटाळा करून ते पैसे दोघांनी स्वत: साठी वापरले. आॅगस्ट २०१६ पासून हा प्रकार सुरू होता. सध्या बँकांची फसवणूक केल्याच्या घोटाळ्यांची सर्वत्र चर्चा आहे. त्यामुळे आता या गुंतवणूकदारांचे पैसे कोठून द्यायचे याबाबत अरविंद फाळके यांच्यावर प्रचंड मानसिक दबाव निर्माण झाला. तसेच त्या चौघांना त्यांना मानसिक त्रास देण्यास सुरुवात केली होती. यामुळे अरविंद फाळके हे प्रचंड मानसिक दबावात होते. शुक्रवारी ते सौदामिनी फायनान्सच्या कार्यालयात आले. त्यांनी घरून आणलेला डबा खाल्ला. त्यानंतर त्यांनी मी झोपतो, असे सांगून ते आपल्या केबिनमध्ये गेले. काही वेळाने साडेतीनच्या सुमारास गोळी झाल्याचा आवाज आला. तो आवाज ऐकून कार्यालयातील लोक त्यांच्या केबिनमध्ये गेले. तेव्हा फाळके हे रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. त्यांनी आपल्याकडील रिव्हॉल्व्हरमधून छातीत गोळी झाडून घेतली होती. तातडीने त्यांना जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. परंतु, डॉक्टर तपासणीपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता.शिवाजी जाधव व सुनील गोसावी हे त्यावेळी एका लग्नासाठी कर्नाटकला केले होते. त्यांना ही बाब समजल्यावर ते फरार झाले आहेत. अक्षय फाळके यांच्या फिर्यादीवरून हडपसर पोलिसांनी चौघांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक विजय झंजाड अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :Deathमृत्यू