शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

Pune Crime: व्यावसायिकाने गळफास घेत संपविले जीवन, भिगवणमधील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2023 13:27 IST

शैलेश ओसवाल बुधवारी नियमित पणे कामकाज करीत असताना एका भिशी ठिकाणी भिशीचा लिलाव बोलून घरी गेले असताना त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले...

भिगवण (पुणे) :भिगवण बाजारपेठेतील व्यावसायिकाने राहत्या घरी वायरच्या साहाय्याने गळफास घेत जीवन संपविल्याची धक्कादायक घटना दुपारच्या सुमारास घडली. आर्थिक विवंचना, सावकारी त्रासामुळे आत्महत्या केली की घरगुती काही कारणांमुळे याचा उलगडा झालेला नाही. शैलेश धरमचंद ओसवाल (रा.राही, अंगण बिल्डिंग, भिगवण) असे गळफास घेत आत्महत्या केलेल्या व्यावसायिकाचे नाव आहे. याबाबत मयत शैलेश यांच्या पत्नी मेघना ओसवाल यांनी भिगवण पोलिस ठाण्यात खबर दिली आहे.

शैलेश ओसवाल बुधवारी नियमित पणे कामकाज करीत असताना एका भिशी ठिकाणी भिशीचा लिलाव बोलून घरी गेले असताना त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले. याबाबत बाजारपेठेत उलट सुलट चर्चा केली जात होती. मात्र, त्यांच्या आत्महत्येबाबत कोणतेही कारण समोर आलेले नाही. ओसवाल यांच्या या आत्महत्येमुळे भिगवण बाजारपेठेवर शोककळा पसरल्याचे दिसून आले. भिगवण पोलिसांनी पंचनामा करीत त्यांचे पार्थिव इंदापूर येथे शवविच्छेदन करण्यासाठी पाठविले. याचा तपास पोलिस उपनिरीक्षक रूपेश कदम करीत आहेत.

याबाबत भिगवण पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी दिलीप पवार यांनी भिगवण बाजारपेठेतील व्यावसायिकाने जीव दिल्याची घटना अतिशय दुःखद असून ओसवाल यांच्या नातेवाइकांनी तक्रार केल्यास पुढील तपास योग्य पद्धतीने होणार असल्याचे सांगितले. तसेच, त्यांच्या काही डायऱ्या पोलिसांनी हस्तगत केल्या असून पुढील तपास सुरू असल्याचे सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBhigwanभिगवण