शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

उद्योगपती अनंत बजाज यांचे हृदयविकाराने निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2018 01:14 IST

प्रख्यात उद्योगपती राहुल बजाज यांचे पुतणे, बजाज इलेक्ट्रिकल्सचे अध्यक्ष शेखर बजाज यांचे पुत्र आणि बजाज इलेक्ट्रिकल्सचे व्यवस्थापकीय संचालक अनंत बजाज (वय ४१) यांचे शुक्रवारी सायंकाळी सहा वाजता हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मुंबई येथे निधन झाले.

पुणे/मुंबई : प्रख्यात उद्योगपती राहुल बजाज यांचे पुतणे, बजाज इलेक्ट्रिकल्सचे अध्यक्ष शेखर बजाज यांचे पुत्र आणि बजाज इलेक्ट्रिकल्सचे व्यवस्थापकीय संचालक अनंत बजाज (वय ४१) यांचे शुक्रवारी सायंकाळी सहा वाजता हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मुंबई येथे निधन झाले. रुग्णालयात नेतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या मागे आई किरण, पत्नी, मुलगा आणि बहीण, असा परिवार आहे. शनिवारी सकाळी १०.३० वाजता काळबादेवी (मुंबई) येथील चंदनवाडी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत, अशी माहिती विश्वसनीय सूत्रे आणि कंपनीच्या संकेतस्थळावरून मिळाली.बजाज यांच्या निधनामुळे उद्योग क्षेत्राला मोठा धक्का बसला आहे. त्यांचा जन्म १८ मे १९७७ रोजी मुंबईत झाला. त्यांनी पदवीचे शिक्षण हसाराम रुजुमल कॉलेज आॅफ कॉमर्स अ‍ॅँड इकॉनॉमिक्स येथून घेतले. पदव्युत्तर शिक्षण एस. पी. जैन इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेंट अ‍ॅँड रिसर्च, मुंबई येथे झाले. तसेच २०१३ मध्ये हॉवर्ड बिझनेस स्कूलमध्ये ओनर प्रेसिडेंट मॅनेजमेंटचे शिक्षण घेतले होते. बजाज इलेक्ट्रिकल्समध्ये १९९९ मध्ये त्यांनी प्रकल्प समन्वयक म्हणून करिअरला सुरुवात केली. रांजणगाव येथे २००१ मध्ये कंपनीचा प्लांट उभा करण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. त्यानंतर २००५ मध्ये त्यांना जनरल मॅनेजर म्हणून नियुक्त करण्यात आले होते. त्यांच्या गुणवत्तेवरून त्यांची बजाज इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडमध्ये एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर म्हणून नियुक्त करण्यात आले होते. दोन महिन्यांपूर्वीच त्यांची बजाज इलेक्ट्रिकल्सचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून नेमणूक करण्यात आली होती. प्रसिद्ध गायक जस्टीन वेबर याच्यासोबत बजाजला लाईटनिंग पार्टनर म्हणून आणण्यात बजाज यांचा मोठा वाटा होता. त्याचबरोबर प्रो कबड्डी, बॅडमिंटन वर्ल्ड चॅम्पियनशिप, इंटरनॅशनल फेडरेशन आॅफ स्पोर्ट क्लायंबिंग यांच्याशीही बजाज इलेक्ट्रिकल्सला त्यांनी प्रायोजक म्हणून जोडले होते.