शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
2
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
3
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
4
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
5
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
6
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
7
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
8
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
9
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
10
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
11
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
12
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
13
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
14
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
15
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
16
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
17
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
18
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
19
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
20
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल

बस खरेदीवरून सभेत जोरदार खडाजंगी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2019 02:15 IST

पुुणेकरांना चांगली सुविधा मिळत नसताना किती वर्षे पीएमपीचा तोडा पुणेकरांनी सहन करायचा, असा प्रश्नांचा भडीमार करत विरोधकांनी बस खरेदी वरुन सत्ताधाºयांना चांगलेच धारेवर धरले.

पुणे : एसी बसमुळे शहराच्या प्रदूषणात भर पडणार नाही का, संचालनातील तूट कमी करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक बसचा फायदा होणार आहे, मग अधिक खर्चिक असलेल्या तब्बल ४०० सीएनजी बस का खरेदी करायच्या, बस खरेदीत महापालिकेतील सत्ताधाऱ्यांची ‘राफेल’ नाही ना, पुुणेकरांना चांगली सुविधा मिळत नसताना किती वर्षे पीएमपीचा तोडा पुणेकरांनी सहन करायचा, असा प्रश्नांचा भडीमार करत विरोधकांनी बस खरेदी वरुन सत्ताधाºयांना चांगलेच धारेवर धरले. महापालिकेच्या सभेत पीएमपी बस खरेदीवरून सत्ताधारी व विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. अखेर पुणे महापालिकेच्या हिश्शाच्या २४० बसेस करीता आवश्यक ११६ कोटी १७ लाख रुपयांचा निधी पुणे महानगर परिवहन महामंडळाला टप्प्याटप्प्याने वर्ग करण्याचे अधिकार महापालिका आयुक्तांना देण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला.विरोधकांसह सत्ताधारी भाजपाच्या काही सदस्यांनीदेखील पीएमपीच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली. यावर सत्ताधारी भाजपाचे नगरसेवक व पीएमपीचे संचालक सिद्धार्थ शिरोळे यांनी स्पष्टीकरण देत भाजपाने पुणेकरांचे हित लक्षात घेऊन कमीत कमी किमतीत बस कशा खरेदी केल्याचे सांगितले. तसेच आॅगस्ट २०१९ पर्यंत शहरात ९९० नवीन बस दाखल होणार असल्याचे स्पष्ट केले.>ंपीएमपी करते नव्याने ४०० सीएनजी बस खरेदी करण्यात येणार असून, यामध्ये पुणे महापालिकेच्या हिश्श्याच्या २४० बससाठी आवश्यक निधी टप्प्याटप्प्याने पीएमपीला देण्यासाठी आयुक्तांना अधिकार देण्याचा प्रस्ताव प्रशासनाच्या वतीने सर्वसाधारण सभेसमोर ठेवला होता. या विषयावर चर्चा करताना विरोधकांनी पीएमपी प्रशासन आणि सत्ताधारी भाजपाला चांगलेच धारेवर धरले.