शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
2
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
3
धक्कादायक! आधी फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली; नराधमांनी प्रियकरासमोर तरुणीवर सामूहिक अत्याचार केला
4
विमानाच्या उड्डाणावेळी इंजिनावर कोंबड्या का फेकल्या जातात?; 'डेड चिकन टेस्ट' जाणून घ्या
5
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!
6
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
7
वैभव दादासारखंच नाव कमवायचंय! बिहारच्या १३ वर्षीय पोरानं १३४ चेंडूत कुटल्या ३२७ धावा
8
93 वर्षीय आजोबाने पूर्ण केले आजीचे स्वप्न; ज्वेलरच्या या कृतीने जिंकले मन, व्हिडिओ तुफान व्हायरल
9
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; सोनमला मदत करणारे 'ते' दोघे कोण?
10
"आता राज ठाकरे भेटतही नाहीत...", ज्येष्ठ अभिनेते मनमोहन माहिमकर यांनी व्यक्त केली खंत
11
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
12
काहीतरी गडबड..., सोनमचं पतीसोबत एवढं वैर कसं? पोलिसांकडून आता या ४ मुद्द्यांवर तपास केंद्रित    
13
कपड्यांपेक्षा अधिक मद्यावर अधिक खर्च करतोय देशातील सामान्य माणूस, केवळ एका वर्षात उडवले 'इतके' लाख कोटी
14
भारताकडे पाकिस्तानपेक्षा जास्त अण्वस्त्रे, कोणत्या देशाकडे मोठा साठा? यादी पाहा
15
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
16
...अखेर पाकिस्तान वठणीवर आला; सिंधुच्या पाण्यासाठी भारतासमोर पसरले हात
17
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता वाहतूक कोंडीतून सुटका, मुंबईत धावणार वॉटर मेट्रो! किती असेल तिकीट?
18
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
19
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
20
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी

सराईत गुन्हेगारांकडून घरफोडी, वाहनचोरीचे तीन गुन्हे उघडकीस; १ लाख ४ हजार ५०० रूपयांचा मुद्देमाल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2017 15:19 IST

संशयितपणे फिरत असलेल्या दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून घरफोडी आणि वाहनचोरीचे तीन गुन्हे उघडकीस आले. त्यांच्याकडून १ लाख ४ हजार ५०० रूपयांचा मुददेमाल जप्त करण्यात आला आहे.

ठळक मुद्देदोघेही रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारएक दुचाकी आणि सोन्याचे दागिने असा १ लाख ४ हजार ५०० रूपयांचा मुददेमाल जप्त

पुणे : संशयितपणे फिरत असलेल्या दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून घरफोडी आणि वाहनचोरीचे तीन गुन्हे उघडकीस आले. हे दोघेही रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून, त्यांच्याकडून एक दुचाकी आणि सोन्याचे दागिने असा १ लाख ४ हजार ५०० रूपयांचा मुददेमाल जप्त करण्यात आला आहे. दरोडा प्रतिबंधक पथक, दक्षिण प्रादेशिक विभाग पुणे शहर पथकाने ही कारवाई केली. दिगंबर गजेंद्र मांदळे (वय २४, रा. पाण्याच्या टाकीजवळ, सहयोगनगर वारजे) आणि नितीन लक्ष्मण तांबारे (वय २७, रा. लक्ष्मीनगर झोपडपट्टी, डहाणूकर कॉलनी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे दोघेही संशयितरित्या फिरताना आढळल्याने त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेऊन चौकशी केली असता मांदळे याने दत्तवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडी आणि तांबारे याने फरासखाना पोलीस ठाण्याच्या हददीमध्ये दुचाकी वाहन आणि स्वारगेट पोलीस ठाण्याच्या हददीत घरफोडी चोरी केल्याचे निष्पन्न झाले. सहायक पोलीस निरीक्षक प्रकाश मोरे, पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत लोहकरे, पोलीस हवालदार बापू खुटवड, दिनेश शिंदे, कृष्णा बढे, रवींद्र फुलपगारे, प्रमोद मोहिते, योगेश घाटगे, अय्याज दड्डीकर, पोलीस शिपाई सचिन ढोक, मयूर शिंदे, महावीर वलटे, अवधूत जमदाडे, नितीन जगदाळे, अविनाश कोंडे, निलेश जाधव, वैभव शितकल, विजय जगताप, संजय बनसोडे, नितेश जाधव यांनी ही कारवाई केली आहे.

टॅग्स :crimeगुन्हेPoliceपोलिस