शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

पुणेकरांवरील करवाढीचे ग्रहण टळले; स्थायी समितीच्या खास सभेने फेटाळला करवाढीचा प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2018 15:03 IST

पुणे महापालिकेच्या अंदाजपत्रकातील तूट भरून काढण्यासाठी प्रशासनाने मालमत्ता करामध्ये १५ टक्के वाढ करण्याचा प्रस्ताव तयार केला होता. गुरुवारी झालेल्या स्थायी समितीच्या खास सभेने मात्र करवाढीचा प्रशासनाचा प्रस्ताव फेटाळला आहे.

ठळक मुद्देअंदाजपत्रक तयार करण्यापूर्वी दरवर्षी कर निश्चितीला २० फेबु्रवारीपूर्वी मान्यता घेणे बंधनकारकस्थायी समितीने हा प्रस्ताव मंजूर केला असता तर मुख्यसभेपुढे चर्चेसाठी ठेवण्यात आला असता

पुणे : महापालिकेच्या अंदाजपत्रकातील तूट भरून काढण्यासाठी प्रशासनाने मालमत्ता करामध्ये १५ टक्के वाढ करण्याचा प्रस्ताव तयार केला होता. गुरुवारी झालेल्या स्थायी समितीच्या खास सभेने मात्र करवाढीचा प्रशासनाचा प्रस्ताव फेटाळला आहे. यामुळे सध्या तरी पुणेकरांवरील करवाढीचे ग्रहण टळले आहे.महापालिका प्रशासनाने सन २०१८-१९ या आर्थिक वर्षांसाठी मिळकतकरात १५ टक्के वाढीबरोबरच पाणीपट्टीतही १२ टक्के वाढ करण्याचा प्रस्ताव मंगळवारी स्थायी समितीच्या बैठकित आयत्यावेळी सादर केला होता. त्यात मिळकतकरातील सर्वसाधारण करात ४ टक्के, सफाईकरात ४.५ टक्के, अग्निशमनकरात ०.५० टक्के, जललाभ करात १.२५ टक्के, जलनिस्सारण लाभकरात २.५० टक्के, तर मनपा शिक्षणकरामध्ये २.२५ टक्के वाढीचा हा प्रस्ताव ठेवला होता. हा प्रस्ताव मंजूर झाला असता तर सर्वसाधारण पाच हजार रुपये मिळकतकर भरणा-या नागरिकांना वाढीव करापोटी साडेसातशे रुपये अधिक भरावे लागले असते. या करवाढीमुळे मिळकतकराचे उत्पन्न १३५ कोटी २२ लाख रुपयांनी वाढले असते. महापालिकेला विविध मार्गांनी मिळणारे उत्पन्न आणि विकास कामांसाठी होणारा खर्च यांचा ताळमेळ घालण्यासाठी ही करवाढ आवश्यक असल्याचा दावा आयुक्त कुणाल कुमार यांनी मांडलेल्या प्रस्तावात केला आहे. प्रशासनाने यापूर्वी करवाढीचा प्रस्ताव आणला, मात्र त्यात सुधारणा करण्यासाठी तो पुन्हा मागे घेण्यात आला होता. महापालिकेचे अंदाजपत्रक तयार करण्यापूर्वी दरवर्षी कर निश्चितीला २० फेबु्रवारीपूर्वी मान्यता घेणे बंधनकारक आहे. यामुळे आयुक्तांचा कर वाढीचा प्रस्ताव स्थायी समितीच्या खास सभेपुढे ठेवण्यात आला होता. गुरुवारी झालेल्या खास सभेने मात्र प्रशासनाचा हा प्रस्ताव फेटाळून लावला आहे. उत्पन्नातील तूट भरून काढण्यासाठी सत्ताधारी करवाढीसाठी अनुकल असले तरी विरोधकांकडून होणारी टीका टाळण्यासाठी हा प्रस्ताव फेटाळण्यात आल्याची चर्चा महापालिका वर्तुळात आहे. स्थायी समितीने हा प्रस्ताव मंजूर केला असता तर मुख्यसभेपुढे चर्चेसाठी ठेवण्यात आला असता. त्यानंतर मुख्यसभेची मान्यता घेऊन पुणेकरांवर १५ टक्के करवाढीचा बोजा टाकण्यात आला असता.

टॅग्स :Pune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाPuneपुणे