शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

पीएमपीकडून जागतिक महिला दिनानिमित्त महिलांना ‘बंपर’ भेट..

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2019 12:34 IST

प्रत्येक महिन्याच्या ८ तारखेला तेजस्विनी बस मधील महिलांना एक दिवस मोफत बस प्रवास करता येणार आहे..

ठळक मुद्दे येत्या ८ मार्च पासून पुणे व पिंपरी चिंचवड शहरात दिवसभर तेजस्विनी बसमध्ये मोफत प्रवास

प्रत्येक महिन्याच्या ८ तारखेला मिळणार मोफत प्रवास पुणे: जागतिक महिला दिनाचे निमित्त साझून पुणे महानगरपालिका व पीएमीपी प्रशासन यांच्यातर्फे शहरातील महिलांना बंपर भेट देण्यात आली आहे. प्रत्येक महिन्याच्या ८ तारखेला तेजस्विनी बस मधील महिलांना एक दिवस मोफत बस प्रवास करता येणार आहे, अशी माहिती महापौर मुक्ता टिळक व पीएमपीचे संचालक सिध्दार्थ शिरोळे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी स्थायी समितीचे अध्यक्ष सुनील कांबळे उपस्थित होते.    पीएमपीएमएलच्या संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयाची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी महापौर मुक्ता टिळक म्हणाल्या, दरम्यान महिला दिना निमित्त येत्या ८ मार्च पासून पुणे व पिंपरी चिंचवड शहरात संपूर्ण दिवसभर महिलांच्या स्पेशल तेजस्विनी बसेसमध्ये महिलांना मोफत प्रवास करता येणार असल्याची घोषणा देखील टिळक यांनी केली. याशिवाय यानंतरच्या प्रत्येक महिन्याच्या ८ तारखेला या तेजस्विनी बसेस मधून महिलांना एक दिवस मोफत प्रवास करणे शक्य होणार आहे. सध्या पीएमपीकडे ३९ तेजस्विनी बस आहेत.   महिलांना सक्षम करण्यासाठी महापालिकेकडून सातत्याने विविध योजनांद्वारे पावले उचलली जातात. पण, यावेळी माजी सैनिकांच्या पत्नी व तसेच विधवा पत्नी यांच्यामार्फत ४० बसेस पीएमपीने भाडेतत्वावर खरेदी करण्याचा क्रांतीकारी निर्णय पुणे महानगरपालिकेने घेतला आहे. या निर्णयामुळे महिला बचत गटाच्या माध्यमातून त्या महिलांना सक्षमीकरणाचा प्रयत्न केला जाणार आहे. माजी सैनिकांच्या पत्नी व विधवांच्या बचत गटाकडून घेण्यात येणा-या बसेस या निविदा प्रक्रियेतील सर्व अटी, शर्ती लागू करूनच घेण्यात येणार आहेत. पीएमपीएमएलच्या स्पेसिफिकेशन प्रमाणेच या बसेचा पुरवठा करण्यात येईल. लवकरच यामध्ये आणखी २७ तेजस्विनी बसची भर पडणार आहे. अशा प्रकारे या ६६ तेजस्विनी बसमधून महिलांना दर महिन्याच्या ८ तारखेला मोफत प्रवास करता येईल, असेही टिळक यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. 

टॅग्स :PMPMLपीएमपीएमएलpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMukta Tilakमुक्ता टिळकWomenमहिला