शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

बंदी असताना धावले बैलगाडे .... बैलगाडा मालक आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2018 17:55 IST

बैलगाडा मालकांनी राज्य सरकारलाच येत्या १५ तारखेपर्यंत राज्यात बैलगाडा शर्यत सुरू झाली नाहीतर आम्ही बंदी झुगारून खुलेआमपणे सर्व गाडा मालक एकत्र येऊन बैलगाडे घाटामध्ये पळवू असा इशारा दिला होता.

ठळक मुद्देशुक्रवारी (दि. १८ ) सकाळी ७ ते ११ वाजेपर्यत ५० ते ६० बैलगाडे घाटात धावलेयाबाबत कोणावरही गुन्हा दाखल नाही.

दावडी : बैलगाडा शर्यतीवरील जर न्यायालयीन बंदी उठवली नाही तर १५ मे नंतर न्यायालयीन बंदी झुगारुन बैलगाडा घाटात पळवू असा इशारा खेड तालुक्यातील बैलगाडा मालकांनी दिला होता. ही बंदी झुगारुन बैलगाडा मालकांनी निमगाव खंडोबा ( ता खेड ) येथे बैलगाडे पळविले. दरम्यान, या घटनेची पोलिसांना कुणकुण लागताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बैलगाडा शर्यती बंद केल्या. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात बैलगाडा शर्यतीच्या न्यायालयीन बंदीला जवळपास चार वर्ष पूर्ण झाली आहे. बैलगाडा शर्यत सुरू करण्यासाठी बैलगाडा मालकांची न्यायालयीन लढाई सुरू आहे. मात्र,  बैलगाडा मालकांना शर्यती सुरु होण्याची परवानगी मिळाली नाही. काही दिवसांपूर्वी राजगुरूनगरमध्ये बैलांची मिरवणुक काढून न्यायालयाचा निषेध केला होता. खेड, आंबेगाव, मावळ, हवेली तालुक्यात बैलगाडा मालकांनी काळा दिवस पाळत शहरातून काळे झेंडे घेऊन बैलगाडयासह निषेध रॅली काढली होती. यावेळी संतप्त बैलगाडा मालकांनी राज्य सरकारलाच येत्या १५ तारखेपर्यंत राज्यात बैलगाडा शर्यत सुरू झाली नाहीतर आम्ही बंदी झुगारून खुलेआमपणे सर्व गाडा मालक एकत्र येऊन बैलगाडे घाटामध्ये पळवू असा इशारा दिला होता. त्याप्रमाणे शुक्रवारी (दि. १८ ) सकाळी ७ ते ११ वाजेपर्यत बैलगाडा मालकांनी घाटात पळविल्या. या कालावधीत ५० ते ६० बैलगाडे घाटात धावले. बैलगाडा शर्यती पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात बैलगाडा शौकिनांनी गर्दी केली होती. बैलगाडा धावण्याच्या वेळेची ध्वनीवर्धकावर माहिती सांगण्यात येत होती. या गोष्टीची कल्पना खेड पोलिसांना होती. दोन पोलीस सकाळीच घाटात होते. मात्र, सकाळी ७ ते ११ वाजेपर्यतच बैलगाडा पळविले जाणार होते. मात्र, ११ वाजल्यानंतर पोलिसांनी बैलगाडा शर्यती बंद केली व घाटातील गर्दी हटवली. याबाबत कोणावरही गुन्हा दाखल झाला नाही.

टॅग्स :KhedखेडPoliceपोलिसShivajirao Adhalraoशिवाजीराव आढळरावBull Cart Raceबैलगाडी शर्यत