शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा बँक मदतीबाबत संभ्रमात;डीएसकेप्रकरणी आज सुनावणी, मालमत्तेवर बोजामुळे अडथळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2018 05:44 IST

बुलडाणा अर्बन बँक पुढाकार घेऊन डीएसकेंच्या मदतीला धावली आणि त्यांनी त्यांच्या मालमत्ता खरेदी करण्याची तयारी उच्च न्यायालयात दर्शविली होती. असे असले, तरी त्यांच्या सर्व मालमत्तांवर कर्जे असून, त्या बोजाविरहित नसल्याचे बँकेला समजले असल्याने बुलडाणा अर्बन बँकेच्या अध्यक्षांसह संचालकही संभ्रमात पडले आहेत. 

पुणे : बुलडाणा अर्बन बँक पुढाकार घेऊन डीएसकेंच्या मदतीला धावली आणि त्यांनी त्यांच्या मालमत्ता खरेदी करण्याची तयारी उच्च न्यायालयात दर्शविली होती. असे असले, तरी त्यांच्या सर्व मालमत्तांवर कर्जे असून, त्या बोजाविरहित नसल्याचे बँकेला समजले असल्याने बुलडाणा अर्बन बँकेच्या अध्यक्षांसह संचालकही संभ्रमात पडले आहेत. दरम्यान याप्रकरणी उच्च न्यायालयाने २२ डिसेंबर ऐवजी तातडीने १६ डिसेंबरला सुनावणी ठेवली आहे.डी़ एस़ कुलकर्णी यांना उच्च न्यायालयात ५० कोटी जमा करण्यात अपयश येत असल्याने, त्यांनी बुलडाणा अर्बन बँकेकडे मदतीची विनंती केली होती़ त्यानुसार बँकेने डीएसकेंजवळ असलेल्या १२ कोटींच्या विकण्यायोग्य मालमत्ता विकत घेण्याची तयारी मंगळवारी बँकेने उच्च न्यायालयात दर्शविली होती़ त्यानंतर बँकेने डीएसकेंना काही अटीवर १०० कोटी देण्याची तयारी दर्शविली याबाबत बुलडाणा अर्बन बँकेचे संस्थापक अध्यक्ष राधेश्याम चांडक यांनी सांगितले की, डीएसके यांनी उच्च न्यायालयात सादर केलेला १२ कोटींचाप्लॉट आम्ही विकत घेणार होतो. परंतु, पोलिसांनी या मालमत्तेवर अगोदरच बँकांचा बोजा असल्याची कागदपत्रे न्यायालयात सादर केली आहेत़ डीएसके यांच्या विना बोजा असलेली २०० कोटी रुपयांची मालमत्ता बँक खरेदी करेल़ त्याबदल्यात डीएसके यांच्या १०० कोटी रुपयांच्या ठेवीदार बुलढाणा बँकेकडे हस्तांतर करणार आहे़ या ठेवीदारांना २ वर्षे या ठेवी काढता येणार नाहीत़ त्यांना बँक साडेआठ टक्के व्याज देणार आहे़ या दोन वर्षात डीएसके यांनी आमचे पैसे व्याजासह फेडले तर त्यांची मालमत्ता त्यांना परत करण्यात येईल़ नाही तर तिच्यावर बँकेचा हक्क कायम होईल़ ती मालमत्ता विकून ठेवीदारांचे पैसे देण्यात येतील़ दरम्यानच्या काळात ही मालमत्ता बँकेच्या ताब्यात राहणार आहे़ डीएसके जी मालमत्ता बोजारहीत असल्याचे दाखवितात़ त्या अ‍ॅमिनिटी प्लेस आहेत़ त्यावर आम्ही शाळा, हॉस्पिटल, हॉस्टेल बांधू शकतो़ यासंबंधीचे वृत्त प्रसिद्ध होताच पुण्यातून अनेक मेसेज, फोन आम्हाला येऊ लागले आहेत़ त्यांच्या कोणत्याच मालमत्ता बोजाविरहीत नसल्याचे सांगण्यात येऊ लागले आहे़ त्यामुळे आम्ही सर्व जण संभ्रमात पडलो असून २२ फेब्रुवारीला उच्च न्यायालय काय निर्णय घेते, यावर पुढे काय करायचे हे बँक निश्चित करणार असल्याचे चांडक यांनी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेD.S.Kulkarniडी.एस. कुलकर्णी