शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

इमारती कोसळल्या; पण देवदूतांनी वाचविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2018 03:45 IST

आपत्ती व्यवस्थापन दलाची चित्तथरारक प्रात्यक्षिके; गुजरात व महाराष्ट्राचा संयुक्तसराव

पुणे : शनिवारचा दिवस.. सर्व नागरिक आपल्या रोजच्या व्यवहारात मग्न असताना अचानक जमीन हादरते अन् क्षणार्धात टोलेजंग इमारती पत्त्यासारख्या कोसळातात. या उंच इमारतींच्या ढिगाऱ्याखाली शेकडो नागरिक अडकतात.. काही क्षणातच आपत्ती निवारणाचे पथक घटनास्थळी दाखल होते अन् सुरू होते नागरिकांना वाचविण्याची धडपड. अत्याधुनिक साधनांच्या साह्याने ढिगाºयाखालील नागरिकांना बाहेर काढले जाते. त्यांना प्रथमोपचार देत सुरक्षित स्थळी नेत भूकंपासारख्या आपत्तीच्या काळात कशा पद्धतीने नेले जाते याचे प्रात्यक्षिक राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाच्या (एनडीआरएफ) जवानांनी दाखविले.सुदुंबरे येथील राष्ट्रीय आपत्ती निवारण केंद्राच्या (एनडीआरएफ) पाचव्या तुकडीच्या मुख्य कार्यालयात शनिवारी गुजरात आणि महाराष्ट्र राज्याच्या आपत्ती निवारण पथकाचे पहिला संयुक्त बचाव सराव शनिवारी पार पडला. या वेळी कोयना धरण परिसरात झालेल्या भूकंपामुळे पुणे आणि सातारा परिसरात इमारती कोसळल्यास तातडीने करण्यात येणाºया आपत्ती निवारणाचे प्रात्यक्षिक दाखविले. जवानांच्या वेगवान आणि धडक निर्णयाच्या या प्रात्यक्षिकांमुळे उपस्थितांच्या अंगावर शहारे उभे राहिले.आपत्ती निवारण कार्यात राज्य आपत्ती निवारण पथकांना बळकटी मिळावी, यासाठी राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाद्वारे विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. याच उपक्रमांतर्गत या पहिल्या आंतरराज्यीय संयुक्त सरावाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये महाराष्ट्र व गुजरात राज्याच्या आपत्ती निवारण प्राधिकरणाचे अधिकारी, आपत्ती निवारण पथक तसेच विविध स्थानिक स्वराज्य संस्थांचे अधिकारी सहभागी झाले होते. एनडीआरएफचे महासंचालक संजीव कुमार यांच्या हस्ते या सरावाचे उद्घाटन शुक्रवारी झाले. या वेळी एनडीआरएफच्या अतिरिक्त महासंचालक अर्चना त्यागी, पोलीस महानिरीक्षक रावसाहेब शिंदे उपस्थित होते. कुमार म्हणाले, ‘‘आपत्ती निवारणासाठी अशाप्रकारच्या संयुक्त सरावांमुळे आंतरराज्यीय स्तरावर राज्यांना एकमेकांच्या संसाधनाचा उपयोग करणे सोपे होणार आहे. तसेच याद्वारे एनडीआरएफच्या कार्यक्षमतेत बदल करण्याण्यासाठी आवश्यक उपाययोजनांचा आढावा घेतला जाणार आहे. भविष्यात या सारखे आणखी सराव करण्याचे नियोजन एनडीआरफचे आहे.’’आधुनिक साधनांचा प्रभावी वापरभूकंपात ढिगाºयाखाली अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढणे राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या जवानांपुढे मोठे आव्हान असते.या संयुक्त सरावात आधुनिक कॅमेºयांचा वापर करत ढिगाºयाखाली अडकलेल्या नागरिकांचा शोध घेण्यात आला. या आधुनिक साधनांच्या वापरामुळे एनडीआरएफ आधुनिक साधनांनी सज्ज असल्याची प्रचिती उपस्थितांना आली.देशात ३६ राज्यस्तरीय आपत्ती निवारण पथकभारतात दरवर्षी नैसर्गिक तसेच मनुष्यनिर्मित आपत्तीमध्ये अनेक नागरिकांना आपले प्राण गमवावे लागतात. तसेच मोठ्या प्रमाणात साधनसंपत्तीचे नुकसान होते. यामुळे आपत्ती निवारण क्षेत्रात क्षमता वाढविण्यासाठी एनडीआरएफतर्फे प्रयत्न केले जात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही यासाठी लक्ष देत राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाला सक्षम करण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. याचाच एक भाग म्हणजे देशातील ३६ राज्यांत जवळपास राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाच्या धर्तीवर ३६ नवे राज्यस्तरीय आपत्ती निवारण पथके स्थापना करण्यात आली आहे. त्यांच्या माध्यमातून आपत्ती निवारणासंदर्भात मोठे काम केले जात आहे.- संजीव कुमार, महासंचालक, एनडीआरएफ

टॅग्स :National Disaster Response Forceराष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलPuneपुणे