शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

जमिनीच्या मोहापायी सख्ख्या भावाचा काढला काटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2018 02:31 IST

वडिलोपार्जित शेतजमिनीच्या भांडणाच्या कारणावरून मेहुण्याच्या सांगण्यावरून कट रचून भावाने आपल्या दोन मुलांच्या सहाय्याने सख्ख्या भावाचा लाकडी दांडके व टिकावाने मारून निर्घृणपणे खून केल्याची घटना भांबोरा, यमाईनगर, (ता. कर्जत, जि. अहमदनगर) येथे घडली.

लोणी काळभोर -  वडिलोपार्जित शेतजमिनीच्या भांडणाच्या कारणावरून मेहुण्याच्या सांगण्यावरून कट रचून भावाने आपल्या दोन मुलांच्या सहाय्याने सख्ख्या भावाचा लाकडी दांडके व टिकावाने मारून निर्घृणपणे खून केल्याची घटना भांबोरा, यमाईनगर, (ता. कर्जत, जि. अहमदनगर) येथे घडली.या घटनेत हनुमंत कोंडिबा चव्हाण (वय ५५) यांचा खून झाला असून त्यांचा मुलगा राहुल हनुमंत चव्हाण (वय २७, रा. भांबोरा, यमाईनगर, ता. कर्जत, जि. अहमदनगर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रमेश कोंडिबा चव्हाण, किरण रमेश चव्हाण, गणेश रमेश चव्हाण (भांबोरा, यमाईनगर, ता. कर्जत, जि. अहमदनगर) व सुनील रामदास पवार (रा. घुगलवडगाव, ता. श्रीगोंदा, जि. अहमदनगर) या चौघांविरोधांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.हनुमंत व रमेश चव्हाण या दोघांनी ७ ते ८ वर्षांपूर्वी बहीण भामाबाई सर्जेराव शितोळे (रा. भांबोरा, ता. कर्जत, जि. अहमदनगर) यांच्याकडून प्रत्येकी अर्धा एकर जमीन विकत घेतली होती. त्यानंतर ५ ते ६ वर्षांपूर्वी पैशाची गरज असल्याने हनुमंत चव्हाण यांनी आपला भाऊ रमेश याचा मेहुणे सुनील रामदास पवार याला तीन लाख रुपयांना विकली होती. त्या वेळी पवार याने ही जमीन त्याची बहीण व रमेश चव्हाण याची बायको हिचे नावे खरेदीखताने घेतली होती.हा व्यवहार होताना हनुमंत चव्हाण याच्याकडे पैसे आल्यानंतर तीन लाख रुपये घेऊन परत द्यायची ठरले होते. ४ ते ५ महिन्यांपूर्वी हनुमंत चव्हाण याच्याकडे उसाचे पैसे आल्याने ३ लाख रुपये जमवून जमीन परत घेण्याकरिता सुनील पवार याच्याकडे गेले. परंतु पवार याने जमीन परत देण्यास नकार दिला. भाऊ रमेश याचा सुनील मेहुणा असल्याने दोन्ही भावांत शेतजमिनीच्या कारणावरून वाद सुरू झाले. त्यांत वडिलोपार्जित शेतजमिनीच्या हिश्श्याच्या कारणावरून भांडणे होत होती. त्या वादात पवार हस्तक्षेप करून रमेशची बाजू घेऊन हनुमंतवर दबाव आणून धमकावत होता.६ मे रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास याच कारणावरून दोन्ही भावांत वाद झाला. त्या वेळी हनुमंत रमेश यांस आपण जमिनीची मोजणी करू असे म्हणत. परंतु रमेश याने त्याचे काहीच ऐकून न घेता शिवीगाळ करण्यास सुरुवात केली व त्याने अचानक हातात पाणी धरण्याचे खोरे त्यांचा मुलगा किरण याने लाकडी दांडके व गणेश याने लोखंडी टिकाव घेऊन हनुमंत याच्या अंगावर धावून आले. त्यांच्यात बाचाबाची सुरू झाली, म्हणून हनुमंत याचीराहुल व महेंद्र ही दोन मुले भांडण सोडविण्यासाठी गेले, त्या वेळी रमेश याने भाऊ हनुमंत याला पकडले होते.किरण लाकडी दांडक्याने मारहाण करीत होता. तेवढ्यात गणेश याने त्याच्या हातातील लोखंडी टिकाव त्याच्या डोक्यात मारला. यामुळे हनुमंत चव्हाण याच्या डोक्यातून रक्त येऊ लागले व ते बेशुद्ध पडल्याने मारहाण करणारे तिघेही निघून गेले. हनुमंत चव्हाण याला उपचारासाठी तत्काळ दौंड येथील पिरॅमिड रुग्णालयात दाखल करण्यात आले.त्या रुग्णालयात उपचार सुरू असताना हनुमंत चव्हाण शुद्धीवर आले नाहीत, म्हणून पुढील औषधोपचार करण्यासाठी त्यांच्या मुलांनी आज ससून रुग्णालयात नेण्याचे ठरवले. रुग्णवाहिकेतून पुणे येथे निघाले असता त्यांनी यवत टोलनाका ओलांडून पुढे आले असता हनुमंत चव्हाण यांचा श्वासोच्छ्वास व शरीराची हालचाल मंदावल्याचे जाणवले, म्हणून त्यांना लोणी स्टेशन येथील विश्वराज हॉस्पिटलमध्ये दुपारी १-३० वाजण्याच्या सुमारास नेले. तेथील डॉक्टरांनी त्यांना तपासून ते मृत झाले असल्याचे घोषित केले. लोणी काळभोर पोलिसांनी गुन्हा दाखल करून अधिक तपासासाठी अहमदनगर पोलिसांकडे वर्ग केला आहे.

टॅग्स :MurderखूनCrimeगुन्हा