मंचर : आंबेगाव तालुक्यातील खडकी येथे मावस भाऊ आणि बहिणीने विहिरीत उडी मारून आत्महत्या केली आहे.ही घटना मंगळवारी ( दि. १३ ) पहाटे घडली.या घटनेने खळबळ उडाली असुनआत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पूर्व भागातील खडकी गावठाणानजीक स्मशानभुमीजवळ असणाऱ्या एका विहिरीत नात्याने मावस बहीण भाऊ असणाऱ्या अक्षय अशोक जाधव ( वय २४ ) आणि ऋतुजा उत्तम तट्टु (वय १९) या दोघांनी आत्महत्या केली आहे. आत्महत्या केल्याची घटना आज ( सकाळी उघडकीस आली.
मंचर उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.कैलास भागवत यांनी दोघांचे शवविच्छेदन केले.मृतदेह नातेवाईक ताब्यात देण्यात आले आहेत. अक्षय जाधव आणि ऋतुजा तट्टु या दोघांनी नेमकी आत्महत्या का केली.याचा शोध मंचर पोलिस घेत आहे.पोलीस निरीक्षक कृष्णदेव खराडे म्हणाले तपास सुरू केला आहे . उदया नातेवाईकांकडे चर्चा करणार आहे.दरम्यान या घटनेने खळबळ उडाली आहे.पुढील तपास पोलीस करत आहेत.