शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

तिरंदाजीत महाराष्ट्राच्या सुकमणी बाब्रेकर याला कांस्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2019 02:03 IST

‘खेलो इंडिया यूथ गेम्स’मध्ये सुकमणी बाब्रेकर याने महाराष्ट्राला तिरंदाजीतील रिकर्व्ह प्रकारात शनिवारी कास्यंपदक मिळवून दिले.

पुणे : ‘खेलो इंडिया यूथ गेम्स’मध्ये सुकमणी बाब्रेकर याने महाराष्ट्राला तिरंदाजीतील रिकर्व्ह प्रकारात शनिवारी कास्यंपदक मिळवून दिले. कांस्यपदकाच्या प्ले आॅफ लढतीत त्याने राजस्थानच्या जगदीश चौधरी याचा ६-२ असा सहज पराभव केला.म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात ही स्पर्धा सुरू आहे. स्पर्धेच्या अखेरच्या दिवशी महाराष्ट्राच्या ३ तिरंदाजांना सुवर्णपदकाची संधी आहे. यामध्ये कम्पाउंड प्रकारात १७ वर्षांखालील गटात मुलांमध्ये प्रथमेश जावकर, मुलींच्या गटात ईशा पवार, तर २१ वर्षांखालील गटात रिकर्व्ह प्रकारात साक्षी शितोळे यांनी अंतिम फेरी गाठली.कम्पाउंड प्रकारातील २१ वर्षांखालील गटात महाराष्ट्राच्या सौमित्र घोष याला हरियाणाच्या सुमीतकुमारकडून १४२-१४० असा २ गुणांनी पराभव पत्करावा लागला. १७ वर्षांखालील मुलींच्या रिकर्व्हच्या कास्यंपदकाच्या प्ले आॅफ लढतीत बिशाल चांगमणी हिला राजस्थानच्या कर्णीसिंग हिचे आव्हान पेलवले नाही. कर्णीने निर्विवाद वर्चस्व राखताना बिशाल हिचा ६-० असा पराभव केला.>व्हॉलिबॉलमध्ये सुवर्णपदकाची संधीसांघिक खेळांमध्ये महाराष्ट्राची निराशाजनक कामगिरी सुरू असतानाच व्हॉलिबॉलपटूंनी शनिवारी काहीसा दिलासा दिला. १७ वर्षांखालील मुलींच्या व्हॉलिबॉल संघाने अंतिम फेरीत धडक देताना सुवर्णपदकाच्या आशा जागविल्या आहेत.महाराष्ट्र संघाने उत्कंठापूर्ण लढतीत केरळचा ३-२ अशा सेट्सने पराभव केला. अंतिम फेरीत महाराष्ट्राची गाठ पश्चिम बंगाल सोबत पडणार आहे.२१ वर्षांखालील मुलीच्या गटात मात्र कांस्यपदकासाठी झालेल्या लढतीत महाराष्ट्राला पराभव स्वीकारावा लागला. पश्चिम बंगालने यजमान संघावर २५-६, २५-२०, २५-१९ अशा फरकाने सहजपणे सरशी साधली.बास्केटबॉलमध्ये कांस्यपदक हुकलेरोमहर्षक लढतीत शेवटच्या पाच मिनिटांत अचूकतेअभावी महाराष्ट्राला १७ वर्षांखालील मुली तसेच २१ वर्षांखालील मुलांच्या गटात महाराष्ट्राला कांस्यपदकाने हुलकावणी दिली. १७ वर्षांखालील गटात त्यांना केरळने ७९-६८ असे हरविले. २१ वर्षांखालील मुलांमध्ये हा संघ केरळकडूनच ७९-७३ अशा फरकाने पराभूत झाला.