शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

पुणे जिल्ह्यातील धावडीत चोरट्यांचा धुमाकूळ, ४ घरे फोडून सव्वा लाखांचा ऐवज लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2018 12:09 IST

भोर तालुक्याच्या दक्षिणेकडील विसगाव खोऱ्यातील धावडी (ता. भोर) येथे मंगळवार (दि. १६) चोरट्यांनी धुमाकूळ घालून एका रात्रीत चार घरे फोडली असून यामध्ये सुमारे सव्वा लाख रुपयाचा ऐवज लंपास केला आहे.

ठळक मुद्देएका रात्रीत फोडली चार घरे, भोर पोलिसांत फिर्यादमंगेश दरेकर यांच्या घराचा दरवाजा फोडून एक लाख २० हजार रुपयाचा ऐवज गेला चोरीस

नेरे : भोर तालुक्याच्या दक्षिणेकडील विसगाव खोऱ्यातील धावडी (ता. भोर) येथे मंगळवार (दि. १६) चोरट्यांनी धुमाकूळ घालून एका रात्रीत चार घरे फोडली असून यामध्ये सुमारे सव्वा लाख रुपयाचा ऐवज लंपास केला आहे. मंगेश दरेकर यांनी भोर पोलिसांत फिर्याद दिली.भोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवार दि. १६ रोजी रात्रीच्या वेळी १ ते २ यावेळेत धावडी येथील मंगेश विष्णू दरेकर यांच्या बंद अवस्थेत असलेला घराचा दरवाजा फोडून रोख रक्कम, सोने असा एक लाख २० हजार रुपयाचा ऐवज चोरीस गेला आहे. वाईद आब्बास पटेल यांच्या घरातील सोने, रोख रक्कम, संतोष मारुती राऊत यांच्या घरातील कपडे व इतर साहित्य विस्कटलेल्या अवस्थेत होते. संपत गणपत दरेकर यांच्या घराचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करण्यात आला. ही घटना पोलिसांना कळताच या ठिकाणी हजर होत पोलिसांनी माहिती घेतली व पंचनामा करुन सुमारे सव्वा लाख रुपयाची चोरी झाली असल्याचे सांगण्यात आले. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नंदकुमार तडाखे करीत आहे.

टॅग्स :Puneपुणे