शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

खळबळजनक! अपहरण करत त्याने तरुणीची डोक्यात दगड घालून केली निर्घृण हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2021 21:40 IST

१३ मार्च रोजी सागरने तिला गोड बोलत बाहेर घेऊन गेला होता. त्यानंतर ती कोठेच मिळून आली नाही.

येरवडा : मनिषा व सागर यांचे दहा वर्षापूर्वीपासून प्रेमसंबंध होते. सागर वाईट चालीचा असल्याचे समजल्यावर तिने त्याच्याशी संबंध तोडले. मात्र  तरुणीचे अपहरण करून डोक्यात दगड घालून तिचा भाटघर धरणाच्या परिसरात निर्घृण खून केल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. 

याप्रकरणी चंदननगर पोलिसांनी  सागर गुंडव (वय 32 रा. चांदुरबाजार, अमरावती) याला अटक केली आहे. या घटनेत मनीषा बापूराव गेडाम (वय 29, सध्या रा. विजय कारगिल नगर वडगाव,मूळ-  चांदूर बाजार,अमरावती) असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे. 

पोलिस उपायुक्त पंकज देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार, मनीषा पुण्यात नोकरीच्या निमित्ताने आली होती. वडगावशेरी येथील एका ती मैत्रिणीसोबत राहत होती. सागरने तिच्याशी गोड बोलून तिला १३ मार्च रोजी बाहेर घेऊन गेला. त्यानंतर ती कोठेच मिळून आली नाही. याप्रकरणी तिच्या भावाने चंदननगर पोलीस स्टेशन येथे ती बेपत्ता असल्याची तक्रार नोंदविली होती. १० वर्षांपासून असलेले संबंध तोडल्यानंतर सागरने अमरावती येथील मनिषाच्या घरी जाऊन तोडफोड व नासधुस केली होती. 

 या प्रकरणी तिच्या मूळ गावी चांदूरबाजार येथे अमरावती पोलिसांनी केलेल्या तपासात मनीषाच्या काही वस्तू सापडल्या होत्या. मात्र तिचा काहीही संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे तिच्या भावाच्या तक्रारी वरून  चंदननगर पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता.

सागर याने तिला भाटघर धरणाच्या परिसरात निर्मनुष्य ठिकाणी घेऊन जाऊन डोक्यात दगड घालून निर्घृण खून केला. गुन्हा करून तो अमरावती येथे गेला होता. चंदन नगर पोलिसांनी अमरावती येथून त्याला ताब्यात घेतले. अधिक तपासात त्याने अपहरण व खुनाच्या गुन्ह्याची कबुली दिली. 

आरोपी सागर याला अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला पाच एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. घटनास्थळी पोलिसांना मनिषाच्या शरीराचा सांगाडा व काही वस्तू मिळाल्या आहेत. 

अप्पर पोलीस आयुक्त नामदेव चव्हाण, पोलीस उपायुक्त पंकज देशमुख, सहाय्यक पोलीस आयुक्त किशोर जाधव, चंदन नगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक गुन्हे सुनील थोपटे पुढील तपास करीत आहेत.

टॅग्स :YerwadaयेरवडाPoliceपोलिसArrestअटकKidnappingअपहरण