शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
3
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
4
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
5
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
6
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
7
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
8
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
9
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
10
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
11
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
12
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
13
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
14
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
15
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
16
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
17
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

शासनाला लोकांशी जोडणारा सेतू

By admin | Updated: April 20, 2017 06:46 IST

व्यासंग, कामाची आवड, चांगला जनसंपर्क असणा-यांसाठी हा विभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. तेरा वर्ष लोकमतच्या औरंगाबाद आवृत्तीमध्ये काम केल्यानंतर

व्यासंग, कामाची आवड, चांगला जनसंपर्क असणा-यांसाठी हा विभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. तेरा वर्ष लोकमतच्या औरंगाबाद आवृत्तीमध्ये काम केल्यानंतर ते जिल्हा माहिती अधिकारी म्हणून या विभागात नियुक्त झाले. या विभागात काम करीत असताना आपली आवड व व्यासंग जोपासण्यास वाव आहे. लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी भरपूर वाव आहे. सर्वसामान्यांपासून ते मुख्यमंत्र्यांपर्यंत सर्व अधिकारी आणि मंत्र्यांशी संपर्क येत असल्याने अनुभवविश्व संपन्न आणि समृद्ध बनते. उत्तराखंडचा प्रलय कामाच्या निमित्ताने जवळून पाहता आला. मुख्यमंत्र्यांसोबत तीन दिवसांच्या दौ-यामध्ये पिडीतांना मदत करण्यात आली. माध्यमांना साभाळणे आणि लोकांना मदत करणे, अशी दुहेरी जबाबदारी पार पाडावी लागली. २०१३ मध्ये अमरावती येथे उपसंचालक व नागपूर येथील माहिती संचालक या पदाचा अतिरिक्त कार्यभार असताना विविध विषयांवर माहितीपट, जिगंल्स, चित्रफितीची निमिर्ती करण्याची संधीही मिळाली. शासनाचे मुखपत्र म्हणून ओळखले जाणारे लोकराज्य खपाच्या बाबतीत प्रथम क्रमांकावर आहे. मराठी बरोबरच इंग्रजी, उर्दू, गुजराती या भाषेतही हे मासिक प्रसिद्ध होते. एकेकाळी वृत्तपत्र व आकाशवाणी ही दोन माध्यमे होती. आज दूरदर्शन, विविध चॅनल्स, सोशल मिडिया, वेबमिडिया ही प्रभावी ठरत आहे. त्यानुसार माहिती व जनसंपर्क विभागाने त्यात्यावेळी बदल करुन नव्या तंत्रज्ञानातही आघाडी घेतली आहे. फेसबुक, ट्ट्विटर, युट्युब, ब्लॉग, इंस्ट्राग्राम, फ्लॉक, व्हॉट्सअ‍ॅपचा वापर हा विभाग मोठ्या खुबीने करीत आहे. महत्वाच्या व्यक्तीच्या दौ-यांच्या कार्यक्रमाचे नियोजन अचूकपणे प्रसिद्ध करण्यासाठी २४ बाय ७ या सुत्रानूसार नेहमी तत्पर असते. या विभागाने अपलोड केलेले माहितीपट, शार्ट फिल्म, जिंगल्स युट्युबवर पाहायला मिळतात. माहिती तात्काळ मिळावी ाासाठी विविध प्रकारचे व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप केले आहेत.अत्याधुनिक पद्धतीचे डिजिटल कॅमेरे या विभागाकडे आहे. काही ठिकाणी स्टुडिओ देखील आहे. मी मुख्ममंत्री बोलतोय यासारखे कार्यक्रम कमालीचे लोकप्रिय ठरत आहे. विभागाचे सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह हे टेक्नोसेव्ही असल्याने त्यांनी या विभागाला माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रात एका उंचीवर आणून ठेवले आहे. आॅगस्ट २०१६ मधील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यप्रदेशात दौऱ्याच्या वेळी अचानक जाऊन वृत्तांकन करण्याचा संदेश येताच चमूने रात्री त्याठिकाणी पोहचून वृत्तांकन करुन दौरा यशस्वी केला. माहिती व जनसंपर्क विभागात काम करणाऱ्या लोकांमध्ये खूप क्षमता आहे. माळीण गावावर माहितीपट निर्मितीचे काम सुरू आहे. थोड्याच दिवसात ते पूर्णही होईल.माहिती व जनसंपर्क विभागाला भविष्य उज्जवल आहे. येथील पत्रकार, प्रशासनातील अधिकारी यांचा समन्वयातून लोकांच्या स्मरणात राहील, असे काम करता येणार आहे. कारण शासन आणि जनतेला जोडणारा सेतू म्हणून या विभागाचे स्वत:चे वेगळे महत्त्व आहे.