शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

सारसबागेने घेतला मोकळा श्वास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2018 06:55 IST

प्रथमच मोठी कारवाई : खाद्यपदार्थांचे सर्व स्टॉल जेसीबी लावून पाडले

पुणे : सारसबाग चौपाटीवर महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने शुक्रवारी ऐन हंगामात धडक कारवाई करत सर्व स्टॉल जेसीबी लावून पाडण्यात आले. या कारवाईमध्ये ४५० खुर्च्या व २५० टेबल जप्त करण्यात आले. परवानगीपेक्षा अधिक जागेत अतिक्रमण करू नये, अशा स्पष्ट सूचना स्टॉलधारकांना देण्यात आल्या.सारसबागेचा गणपती (तळ्यातला गणपती) म्हणून पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. यामुळे येथे शहरासह बाहेरील पर्यटकांची नेहमीच प्रचंड गर्दी असते.या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने शुक्रवारी दुपारी तीनच्या सुमारास अचानक कारवाई करून येथील स्टॉलधारकांच्या ४५० खुर्च्या आणि २५० टेबल जप्त केले. तसेच स्टॉलच्या समोर टाकण्यात आलेले शेड जेसीबीच्या साहाय्याने पाडण्यात आले. जेसीबीच्या साहाय्याने कारवाई करून आमचे नुकसान करू नका, शेड काढण्यास आम्हाला थोडा वेळ द्या, अशी मागणी येथील स्टॉलधारकांनी अतिक्रमण विभागाच्या अधिकाऱ्यांना केली. मात्र ते ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नसल्याचे पाहून काही जणांनी जेसीबीच्या समोर जाऊन कारवाई रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी त्यांना बाजूला करून शेड पाडण्याची कारवाई सुरूच ठेवली.या कारवाईत उपअभियंते किशोर पडाळ यांच्या मार्गदर्शनाखाली ५० कर्मचारी, ६ ट्रक, १ जेसीबी, १० पोलीस यांनी सहभाग घेतला. पुन्हा अतिक्रमण न करण्याच्या सूचना स्टॉलधारकांना देण्यात आल्या आहेत. न ऐकल्यास त्यांचे परवाने रद्द करण्याच्या दृष्टीने पावले उचलली जातील, अशी माहिती पडाळ यांनी दिली आहे.या बागेमध्ये मोठ्या प्रमाणात शाळकरी मुले येत असतात. याशिवाय सकाळी व सायंकाळी मोठ्या प्रमाणात नागरिक वॉकिंगसाठी सारसबागेत येतात. परंतु या परिसरात व चौपाटीवर स्टॉलधारकांनी केलेल्या अतिक्रमणामुळे बागेत येणाºया नागरिकांना, पर्यटकांना त्रास सहन करावा लागतो. तसेच येथे वाहतूककोंडी देखील होते. वारंवार सूचना देऊनही येथील स्टॉलधारकांकडून त्याकडे दुर्लक्ष करून अतिक्रमण केले जाते. हे अतिक्रमण दिवसेंदिवस रस्त्यांच्या बाजूने वाढतच जात आहे. स्टॉलच्या समोर पार्किंगच्या ठिकाणी खुर्च्या आणि टेबल ठेवण्यात आल्याने दुचाकीधारक आणि स्टॉलधारक यांच्यात वादावादी झाल्याच्या अनेक घटना यापूर्वी घडल्या आहेत.

टॅग्स :Puneपुणे