शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर, ट्रम्प टॅरिफ मुद्द्यांवर विरोधक आक्रमक, आजपासून संसद अधिवेशन; सर्व मुद्द्यांवर चर्चेस सरकार तयार
2
आजचे राशीभविष्य, २१ जुलै २०२५: नोकरी - व्यवसायात लाभदायी अन् यशदायी दिवस
3
उड्डाण करताच डाव्या बाजूचं इंजिन पेटलं; आगीमुळे बोईंगचे इमर्जन्सी लँडिंग
4
Latur: मारहाणीनंतर ‘छावा’चे कार्यकर्ते रात्री उशिरा रस्त्यावर; राष्ट्रवादीचे बॅनर फाडले
5
आधी ‘तिने’ तीन कोटी उकळले,  नंतर आणखी १० कोटी मागितले! ‘हनी ट्रॅप’ची चर्चा
6
ईडी कोणी ड्रोन नाही की सुपरकॉप नाही...मद्रास उच्च न्यायालयाचे ईडीच्या कार्यशैलीवर ताशेरे
7
हे कार्यकर्ते आहेत की गुंडांच्या टोळ्या?
8
योगींचा दिल्ली दौरा अन् प्रदेशाध्यक्ष निवडीची चर्चा; ओबीसी चेहरा किंवा महिला नेत्याची होऊ शकते निवड
9
नोकरीसाठी अडचण नको म्हणून चक्क पोटच्या मुलीलाच विकले
10
हवाई सुंदरीवर अत्याचार; क्रू मेंबरला अटक, मीरा रोड येथील घटना
11
प्रचंड उष्म्यामुळे विद्यार्थ्यांच्या शालेय शिक्षणावर होतोय परिणाम, दीड वर्षांपर्यंत होऊ शकते घट
12
जगातील कोणीही भारताला आदेश देऊ शकत नाही, ट्रम्प यांचा दावा अन् उपरराष्ट्रपतींचे खडेबोल
13
इस्रायल की सशस्त्र टोळ्यांचा हल्ला? गाझामध्ये मदतीची प्रतीक्षा करणाऱ्यांवरच गोळीबार, ७३ जण ठार
14
तरुणांना भाषणबाजी नको, रोजगार हवा! राहुल गांधी यांनी व्यक्त केली चिंता
15
कृषिमंत्री कोकाटेंच्या मोबाइलवर पत्ते; विधानपरिषदेतील व्हिडीओने खळबळ
16
कोकाटेंचा राजीनामा मागितला, तटकरेंना निवेदन देत पत्ते फेकले, छावा आणि अजितदादांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा
17
"आमच्या निवेदनाला लाथाबुक्क्यांनी उत्तर देत असाल तर…’’, विजय घाडगे यांची संतप्त प्रतिक्रिया 
18
ऑपरेशन सिंदूरवेळी जीव धोक्यात घालून केली जवानांना मदत, आता लष्कराने १० वर्षांच्या मुलाला दिलं मोठं बक्षीस
19
"माणिकराव कोकाटे यांचा 'तो' व्हिडीओ AIच्या मदतीनं, मी स्वतः..."; भाजप आमदाराचा दावा
20
राजस्थानात मुसळधार पाऊस, अजमेरमध्ये तरुण वाहून जाता-जाता बचावला; असा वाचला जीव, बघा VIDEO

जेधे चौक घेणार मोकळा श्वास

By admin | Updated: May 23, 2016 02:14 IST

जेधे चौकात होणारी वाहतूककोंडी सोडविण्यासाठी महापालिकेकडून उभारण्यात येत असलेल्या दुसऱ्या टप्प्यातील उड्डाणपुलाचे काम ९५ टक्के पूर्ण झाले आहे.

पुणे : जेधे चौकात होणारी वाहतूककोंडी सोडविण्यासाठी महापालिकेकडून उभारण्यात येत असलेल्या दुसऱ्या टप्प्यातील उड्डाणपुलाचे काम ९५ टक्के पूर्ण झाले आहे. त्यामुळे पुलाच्या बांधकामासाठी शंकरशेठ रस्ता आणि सातारा रस्त्यावर पुलाच्या खाली उभारण्यात आलेले लोखंडी बांधकाम स्ट्रक्चर काढून घेण्यात आले असल्याने चौक मोकळा झाला आहे. या शिवाय स्ट्रक्चर काढण्यात आल्यानंतर या चौकानेही मोकळा श्वास घेतला आहे. पुलाच्या दुसऱ्या टप्प्यात सातारा रस्त्यावरून येणाऱ्या वाहनांना थेट शंकरशेठ रस्ता आणि सारसबागेकडे उड्डाणपूलावरून जाता येणार असल्याने या चौकात सातारा रस्त्यावरून येणारी जवळपास ४५ टक्के वाहतूक कमी होणार आहे. महापालिकेच्या तब्बल १५७ कोटींच्या निधीतून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळच्या (एमएसआरडीसी) माध्यमातून हे काम करण्यात येत आहे. दरम्यान, या उड्डाणपुलाचे उद्घाटन १५ मे रोजी करण्याची घोषणा महापौर प्रशांत जगताप यांनी केली होती. मात्र, पुलाचे काम पूर्ण न झाल्याने ३१ मे रोजी उद्घाटन होण्याची शक्यता असल्याचे प्रशासकीय सूत्रांकडून सांगण्यात आले. (प्रतिनिधी)या उड्डाणपुलाच्या पहिल्या टप्प्यात सातारा रस्त्यावर स्वारगेट ते साईमंदिर या मार्गावर उड्डाणपूल उभारण्यात आलेला आहे. त्यामुळे स्वारगेटहून सातारा रस्त्याकडे जाणाऱ्या वाहनांना लक्ष्मीनारायण चौकात लागणारा वेळ वाचत आहे. सातारा रस्त्याकडे जाणाऱ्या अवजड वाहनांनाही याचा मोठा फायदा होत असल्याचे चित्र आहे. तर दुसऱ्या टप्प्यात सातारा रस्त्यावरून जेधे चौकातून सारसबागमार्गे मध्यवर्ती शहर तसेच कॅम्प तसेच हडपसरकडे जाणाऱ्या ‘वाय’ आकाराच्या पुलाचे काम पूर्ण करण्यात आले आहे. हे काम ९५ टक्क्यांहून अधिक पूर्ण झालेले असून वाय आकाराच्या ठिकाणचा रस्ते जोडणीचे शेवटच्या टप्प्यातील काम शिल्लक आहे. दुसऱ्या बाजूस उड्डाणपुलावरील पथदिवे, डांबरीकरण, वाहतूक नियमांचे फलक तसेच पुलाच्या रंगरंगोटीचे काम पूर्ण झालेले आहे.तिसऱ्या टप्प्याचे काम लवकरच येत्या काही दिवसांत दुसऱ्या टप्प्याचे उद्घाटन झाल्यानंतर एमएसआरडीसीकडून तातडीने तिसऱ्या टप्प्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यात प्रामुख्याने शंकरशेठ रस्त्याकडून सारसबागेकडे जाण्यासाठी दुचाकी, हलकी वाहने तसेच जड वाहनांसाठी भूयारी मार्ग (व्हेईकल अंडरपास) करण्यात येणार आहे. या शिवाय या परिसरात पीएमपीचे मुख्य बसस्थानक तसेच स्वारगेटचा एसटी आगार आणि लवकरच मेट्रो स्टेशन होणार असल्याने पादचाऱ्यांना सुरक्षीत रस्ता ओलांडता यावा यासाठी दोन पादचारी भुयारी मार्गही तयार करणार आहेत.