शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

सलग दोन वर्षे उत्सवाची परंपरा खंडित, रामनवमी पाच भक्तांच्या उपस्थितीत साजरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 18:00 IST

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर १ एप्रिल पासून मंदिर दर्शनासाठी बंद

ठळक मुद्देदरवर्षी येथे साधारण पंचवीस ते तीस हजार भाविक दर्शनासाठी येत असे

लोणी काळभोर: तिर्थक्षेत्र रामदरा शिवालय येथे आज रामनवमी पारंपारिक पद्धतीने मोजक्या भक्तांच्या उपस्थितीत साजरी करण्यात आली. कोरोनाच्या साथीमुळे यावेळी महंत हेमंतपुरी महाराज यांच्यासमवेत फक्त पाच भक्त उपस्थित होते. 

तीर्थक्षेत्र रामदरा शिवालयाचे संस्थापक १००८ देविपुरी महाराज उर्फ धुंदीबाबा यांनी साठ वर्षांपुर्वी हे तीर्थक्षेत्र विकसित केले आहे. तेव्हापासून येथे रामनवमी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. आज पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास महंत हेमंतपुरी महाराज यांनी महामस्तकाभिषेक करून श्रींची आरती केली. दुपारी बारा वाजता रामजन्म झाल्यानंतर हेमंतपुरी महाराज यांच्या हस्ते रामजन्मोत्सवाची आरती करण्यात आली. त्यानंतर उपस्थित भाविकांना प्रसाद वाटप करण्यात आले.   

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर १ एप्रिल पासून मंदिर दर्शनासाठी बंद करण्यात आले आहे. त्यामुळे आजही भाविकांना मंदिरात प्रवेश देण्यात येणार नाही. अशी पुर्व कल्पना सोशल मिडीयाच्या माध्यमातून देण्यात आली होती. त्यामुळे एकही भाविक मंदिरात आला नाही. यापुर्वी ढोल ताशांच्या गजरात " श्री " समवेेत धुंदीबाबा व मंगलपूूूरी महाराज यांच्या पादूूूकांंची मिरवणूक काढण्यात येत होती. याप्रसंगी परिसरातील भक्त गजनृत्य सादर करत असत. मिरवणूकीमध्ये लोणी काळभोर, फुरसुंगी गावातील नागरिकांसह पुणे, पिंपरी - चिंचवड, सातारा तसेंच परप्रांतातून भाविक व पर्यटक मोठ्या उत्साहात सहभागी होत असे.  दरवर्षी येथे अखंड हरिनाम सप्ताह आयोजित करण्यात येतो. गेले दोन वर्षापासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व कार्यक्रम रद्द करण्यात येत आहेत. दरवर्षी येथे साधारण पंचवीस ते तीस हजार भाविक दर्शनासाठी येतात. रस्ता दिवसभर दुचाकी, चारचाकींनी वाहत असतो. परंतूू कोरोना पार्श्वभूमीवर सन २०२० व २०२१ ची  रामनवमी मात्र खुपच शांततेत पार पडली. आज दुपारी शहर पोलीस उपायुक्त नम्रता पाटील व लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी तिर्थक्षेत्र रामदरा येथे भेट दिली. 

टॅग्स :PuneपुणेLoni Kalbhorलोणी काळभोर