शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

बुरसटलेल्या परंपरेला छेद देत विवेक आणि ऐश्वर्या अखेर विवाहबद्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2018 22:45 IST

कौमार्य चाचणीच्या चुकीच्या प्रथेविरुद्ध आवाज उठविणाऱ्या कंजारभाट समाजातील जाेडप्याचा विवाह साेहळा शनिवारी पाेलीस बंदाेबस्तात पिंपरीत पार पडला. या विविध साेहळ्याला अनेक मान्यवर उपस्थित हाेते.

- संजय माने 

पिंपरी : कौमार्य चाचणीच्या चुकीच्या प्रथेविरुद्ध आवाज उठविणाऱ्या कंजारभाट समाजातील तरुण,तरुणीने एकमेकाच्या गळ्यात वरमाला अर्पण करत समाजातील अनिष्ठ प्रथांना मूठमाती दिली. हा क्रांतिकारी विवाह सोहळा शनिवारी पिंपरीत पोलीस बंदोबस्तात पार पडला.     स्टॉप दि व्ही रिच्युअल अर्थात जात पंचायत , कुप्रथाविरुद्ध लढा या संस्थेच्या पुढाकाराने या विवाहसोहळ्याचे आयोजन केले होते. काळेवाडी,विजयनगर येथील बालाजी लाॅन्सवर सायंकाळी 7.10 या गोरज मुहूर्तावर विवाह सोहळा आयोजित केला होता. गेल्या सहा महिन्यांपासून स्टॉप दि व्ही रिच्युअल अर्थात जात पंचायत , कुप्रथाविरुद्ध लढा या संस्थेने कौमार्य चाचणीविरुद्ध आवाज उठविण्यास सुरुवात केली. जातपंचायतीचे पंच आणि ज्यांना परिवर्तन नको अशांनी या तरुणांना यापूर्वी मारहाण केली. समाजाविरुद्ध काम केल्यास वाईट परिणाम भोगावे लागतील, असे काहींनी धमकावलेसुद्धा. मात्र हाती घेतलेले कार्य तडीस न्यायचे असा मनाशी ठाम निश्चय केलेल्या विवेक आणि ऐश्वर्या यांनी बुरसट प्रथांना धुडकावून विवाह केला. किरण सत्यासिंह तमायचिकर यांचे चिरंजीव विवेक तसेच पिंपरी चिंचवड महापालिकेचे माजी महापौर कावीचंद भाट यांची नात यांच्या या विवाह सोहळ्याला समाजबांधवापेक्षा सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.    बँडबाजा होता, पण नातेवाईक, वऱ्हाडी मंडळी यांचा अन्य विवाहाप्रमाणे उत्साह दिसून येत नव्हता. मागील कटू अनुभव लक्षात घेता,विवाह समारंभावेळी काही घडू शकते, ही शक्यता असल्याने पोलीस बंदोबस्त मागविण्यात आला होता. मंगल कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर पोलिसांचा फाैजफाटा तैनात होता. स्टेज जवळ 15 बाऊन्सरही सज्ज होते. या क्रांतिकारी विवाह सोहळ्यास विधान परिषद सदस्या डॉ नीलम गोऱ्हे, अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या मुक्ता दाभोलकर, दिग्दर्शक नागराज मंजुळे, स्टॉप दि व्ही रिच्युअल अर्थात जात पंचायत आणि कौमार्य चाचणी प्रथेविरुद्धचा लढा देणाऱ्या संघटनेचे कार्यकर्ते कृष्ण इंद्रिकर, केतन घमंडे, भारत तामयचीकर व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.    विवाह सोहळ्यानंतर जातपंचायतीच्या नेहमीच्या प्रथेनुसार कौमार्य चाचणीला सामोरे न जाता, या प्रथेला फाटा देत वधू, वर अंबरनाथ (मुंबई) ला वऱ्हाडी मंडळीसह रवाना झाले.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडkalewadiकाळेवाडीNagraj Manjuleनागराज मंजुळे