शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

ब्रेकिंग न्यूज पाहणारेच पवारांच्या वक्तव्यावर प्रश्न उपस्थित करत आहेत : सुप्रिया सुळे

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2018 11:50 IST

जे अमराठी आहेत, तसेच ज्यांनी पूर्ण मुलाखत पाहिली नाही आणि केवळ ब्रेकिंग न्यूज पाहून प्रतिक्रिया देत आहेत तेच शरद पवारांच्या भाषणावर प्रश्न उपस्थित करत आहेत, असे म्हणत खासदार सुप्रिया सुळेंनी पवारांच्या वक्तव्यावरून होत असलेल्या चर्चेवर पडदा टाकला. 

पुणे : जे अमराठी आहेत, तसेच ज्यांनी पूर्ण मुलाखत पाहिली नाही आणि केवळ ब्रेकिंग न्यूज पाहून प्रतिक्रिया देत आहेत तेच शरद पवारांच्या भाषणावर प्रश्न उपस्थित करत आहेत, असे म्हणत खासदार सुप्रिया सुळेंनी पवारांच्या वक्तव्यावरून होत असलेल्या चर्चेवर पडदा टाकला. राष्ट्रवादी काँग्रेसकडून पुणे स्टेशन येथील महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर सकाळी 9 ते 11वाजताच्या दरम्यान मूक आंदोलन करण्यात आले. त्यानंतर त्या पत्रकारांशी बोलत होत्या. सुळे म्हणाल्या, गांधीजींनी जो शांततेचा मार्ग सांगितला तसेच भारतीय संविधानाचे महत्त्व या दोन्हीची सांगड घालत याची जाणीव आजच्या पिढीला करून देण्यासाठी आज आम्ही येथे शांततेत आंदोलन केले.सरकारने कर्ज माफी ची घोषणा केली असली तरी प्रत्यक्ष त्याचे लाभ शेतकऱ्यांना मिळाले नाहीत. सरकारमध्ये असणारे जबाबदार व्यक्ती महिलांना उचलून नेण्याची भाषा करतात आणि त्यावर सरकार किंवा गृहमंत्रालयाने कुठलेही भाष्य केले नाही. आज सर्वसामान्यांमध्ये अस्वस्थथा आहे. पेट्रोल डिझेल चे भाव वाढत आहेत. या सगळ्याचा विरोध करण्यासाठी आम्ही हे आंदोलन करत आहोत.कोरेगाव भीमा प्रकरणी बोलताना त्या म्हणाल्या ज्यांच्यावर आरोप नाहीत त्यांना नजरकैदेत ठेवलं जातं आहे आणि ज्यांच्यावर आरोप आहेत त्यांना मोकाट सोडलं जात आहे. मुख्यमंत्र्यांनी पारदर्शक कारभार करायला हवा. मुठा कालवा उंदीर, घुशींमुळे फुटला असल्याच्या जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या वक्तव्यावर टीका करताना सुळे म्हणाल्या, जबाबदारी झटकून त्याचे खापर दुसऱ्यांवर फोडण्याची भाजपची पद्धत आहे. याबाबत आमच्या पक्षाने या आधीच भूमिका स्पष्ट केली आहे.

टॅग्स :Supriya Suleसुप्रिया सुळेSharad Pawarशरद पवारRafale Dealराफेल डील