शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
2
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
3
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
4
दिवसा काम, रात्री अभ्यास! मोबाईल कव्हर विकणारा रोहित होणार डॉक्टर; NEETमध्ये रचला इतिहास
5
दोन्ही पत्नी अन् आता गर्लफ्रेंडही हिंदू, मग मुलांची नावं मुस्लिमच का? आमिर खान म्हणाला...
6
काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"
7
'फादर्स डे': विराट कोहलीसाठी लेक वामिकाने बनवलं खास ग्रिटींग कार्ड, लिहिलाय खास संदेश
8
परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले!
9
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
10
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्ताननं घेतली भूमिका; मुस्लीम देशांना एकजूट होण्याचं आवाहन
11
जावेसमोर पतीची चप्पल मांडीखाली लपवली अन् फसली; पतीची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे लपवले खड्ड्यात
12
बेडरूममधल्या 'या' ३ गोष्टी लगेचच फेका; श्वास घेण्यास त्रास आणि रात्रीची झोपही होईल खराब
13
Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये आता ज्येष्ठ नागरिकांचा डबा
14
पाक सीमेजवळ विमानांचे उड्डाण धोक्याचे, ४६५ वेळा जीपीएसमध्ये छेडछाडीच्या घटना!
15
'टेस्ट चॅम्पियन' टेम्बा बवुमाचा चिमुरड्या लेकाला सोबत घेऊन 'विक्टरी वॉक', पाहा क्यूट Video
16
पुढील २४ तासांसाठी 'या' जिल्ह्यांना रेड तर ६ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट; वीज पडून ८ जण दगावले
17
Bhushan Gavai: संविधान हा सतत विकसित होणारा दस्तऐवज- सरन्यायाधीश
18
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
19
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
20
Radhika Subramaniam : कमाल! भारताची पहिली AI ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सर, देशाची सफर घडवणाऱ्या राधिकाला पाहिलंत का?

‘लिव्ह इन’मध्ये वाढताहेत ब्रेकअप; तीन वर्षांत १५०० तक्रारअर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2018 03:32 IST

गेल्या काही वर्षांमध्ये उच्चशिक्षित तरुण-तरुणींचे ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहण्याचे प्रमाण वाढले आहे. कोणत्याही बंधनात न अडकता स्वेच्छेने एकत्र राहण्याचा पर्याय म्हणून या रिलेशनशिपकडे पाहिले जात असले तरी या नात्यामध्येही आता कुरबुरी वाढू लागल्या आहेत.

- नम्रता फडणीसपुणे : गेल्या काही वर्षांमध्ये उच्चशिक्षित तरुण-तरुणींचे ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहण्याचे प्रमाण वाढले आहे. कोणत्याही बंधनात न अडकता स्वेच्छेने एकत्र राहण्याचा पर्याय म्हणून या रिलेशनशिपकडे पाहिले जात असले तरी या नात्यामध्येही आता कुरबुरी वाढू लागल्या आहेत. ‘लिव्ह इन रिलेशन’मध्ये राहणाऱ्या महिलांनाही कौटुंबिक हिंसाचार कायद्यामध्ये समाविष्ट करण्यात आल्याने पुणे जिल्हा न्यायालयाकडे गेल्या तीन वर्षांत तब्बल १५00 तक्रारअर्ज प्राप्त झाले आहेत.नोकरी किंवा शिक्षणानिमित्त बाहेरगावी राहण्याचे स्वातंत्र्य त्या तरुणींना कुटुंबाकडून मिळू लागले आहे. लग्न न करताही एकत्र राहण्यामध्ये तरुणींनाही आता काहीच वावगे वाटत नाही.गेल्या काही वर्षांमध्ये उच्चशिक्षित तरुणी लग्न न करता जोडीदाराबरोबर एकत्र राहण्याचा पर्याय निवडू लागल्या आहेत. आपली मुलगी कुणाबरोबर राहते याचा कुटुंबीयांनादेखील पत्ता नसल्याची वस्तुस्थितीदेखील पाहायला मिळत आहे. लग्नाचे आमिष दाखवून तरुणीला एकत्र राहाण्यास भाग पाडल्याच्या कहाण्याही आहेत. २00५मध्ये कौटुंबिक हिंसाचार कायदा अस्तित्वात आला तेव्हा ‘लिव्ह इन रिलेशन’मध्ये राहणाºया महिलांचाही या कायद्यात समावेश केला.एकाच छताखाली जर स्त्री-पुरुष राहत असतील आणि पुरुषाने महिलेवर हिंसाचाराचे कृत्य केले तर तिलाही न्याय मागण्याचा अधिकार दिला आहे. तसेच २00६ मध्ये‘लिव्ह इन’मध्ये राहणाºया महिलेला जर मूल झाले तर तिच्यामुलालाही त्या व्यक्तीच्या संपत्तीमध्ये अधिकार मिळू शकतो अशी तरतूद केली असल्याने या कायद्याचा आधार घेत आता ‘लिव्ह इन’मध्ये राहत असलेल्या तरुणीही तक्रारी देऊ लागल्या आहेत. जिल्हा न्यायालयामध्ये कौटुंबिक हिंसाचार कायद्यांतर्गत तक्रारींचे प्रमाण वाढत असून, तीन वर्षांमध्ये जवळपास १५00 तक्रारी प्राप्त झाल्या असल्याची माहिती अ‍ॅड. माधवी परदेशीयांनी दिली.‘लिव्ह इन’मध्ये राहण्याची कारणे- दोघांनाही स्पेस मिळते.- जबाबदारी नसते.- एकमेकांच्या आवडीनिवडी समजून घेता येतात.- एक मानसिक आधार मिळतो.- सोबतीची गरज असते.- कुणीतरी शेअर करणारे हवे असते.४ लग्नापूर्वी समजून घेता येते.पुणे जिल्हा न्यायालयामध्ये कौटुंबिक हिंसाचार कायद्यांतर्गत तक्रारींचे प्रमाण वाढत असून, तीन वर्षांमध्ये जवळपास १५00 तक्रारी प्राप्त झाल्याआहेत.गेल्या काहीवर्षांमध्ये उच्चशिक्षित तरुणी लग्न न करता जोडीदाराबरोबर एकत्र राहण्याचा पर्याय निवडू लागल्याआहेत.‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये होतो तेच बरे होतोआम्ही सहा वर्षे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होतो; पण समाजाच्या दबावामुळे आम्ही लग्न केले. मात्र लग्नानंतर आम्ही खूप मोठी चूक केली याची जाणीव झाली. बॉयफ्रेण्ड नवरा झाला की बदलतो आणि त्याचा त्रास व्हायला लागतो. नऊ ते पाच नोकरी करायची, घर दोघं चालवत असल्यामुळे पैसे घरी द्यायचे, शॉपिंग जास्त करायची नाही. विशिष्ट वेळेलाच जेवण बनवायचे. एका बंधनात बांधून घेतल्यासारखे वाटले. मी असे जीवन जगू शकत नाही म्हणून मग आम्ही घटस्फोट घेतला.- महिलाघरापासून लांब राहणारी उच्चशिक्षित तरुण-तरुणींचे ‘लिव्ह इन’मध्ये राहण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यांच्यामध्ये नवरा-बायकोचे नाते नसले तरी ते नवरा-बायकोसारखेच एकमेकांबरोबर राहतात. अनेक वेळा तरुणी किंवा महिलांना या नात्यामध्ये नैराश्य येते. मग कौटुंबिक हिंसाचार कायद्याचा आधार घेत पुरुषाविरोधात त्या तक्रार दाखल केल्या जातात. कौटुंबिक हिंसाचार कायद्यामध्ये ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ ही गोष्ट मान्य करण्यात आली असल्याने तक्रारींच्या प्रमाणात वाढ होत चालली आहे.- माधवी परदेशी,वकील, कौटुंबिक न्यायालय

टॅग्स :Puneपुणे