शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

जड वाहतूक वाहन परवान्याला ‘प्रशिक्षणा’चा ब्रेक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2018 00:05 IST

जुलैपासून परवाने बंद; चालक परवान्यासाठी इंधन कार्यक्षमता प्रशिक्षण केले बंधनकारक

- विशाल शिर्के पुणे : केंद्रीय परिवहन मंत्रालयाने जड वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांना इंधन कार्यक्षमता प्रशिक्षण बंधनकारक केले आहे. मात्र, नक्की कोणत्या संस्थेतून प्रशिक्षण घ्यायचे याचा स्पष्ट उल्लेख नसल्याने जुलै महिन्यापासून जड वाहतुकीचा वाहनचालक परवाना (हेवी व्हेईकल लायसन्स) वितरण बंद पडले आहे. पुणे वगळता अशी प्रशिक्षण देणारी एकही संस्था राज्यात नसल्याने जड वाहतुकीचा चालक होण्याचे स्वप्न पाहणाºया चालकांच्या मार्गात मोठा अडथळा निर्माण झाला आहे.इंधनाचा अपव्यय आणि पर्यायाने प्रदूषणात वाढ होण्यास चालकाचा निष्काळजीपणा कारणीभूत असतो. इंधन कार्यक्षमता वाढावी, यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने मोटारव्हेईकल अ‍ॅक्टमध्ये सुधारणा केली आहे. त्याबाबतचा अध्यादेश मे २०१८ मध्ये जाहीर झाला असून, नवे बदल १ जुलैपासून देशभरात लागू झाले आहेत. त्यानुसार १२ टनांवरील प्रवासी वाहतूक आणि मालवाहतूक करणाºया वाहनांच्या चालकांना इंधन कार्यक्षमतेचा एकदिवसीय प्रशिक्षण वर्ग पूर्ण करावा लागणार आहे. असा प्रशिक्षण वर्ग केला नसल्यास संबंधितांना परवाना दिला जाणार नाही.मान्यताप्राप्त संस्थेकडून इंधनाचा कार्यक्षम वापर करून वाहन कसे चालवायचे याचे धडे घ्यावे लागतील. संबंधित वाहनचालकाला ५ किलोमीटर अंतरापर्यंत वाहन चालवावे लागेल. प्रत्यक्ष रस्त्यावर आणि वर्गातील पुस्तकी धड्यांच्या माध्यमातून इंधनाचा कार्यक्षम वापर कसा करावा, याबाबत चालकांना प्रशिक्षित करण्यात येईल. वळण घेताना आणि ब्रेक मारताना कोणती काळजी घ्यावी, हेदेखील यात सांगितले जावे, असे मंत्रालयाने काढलेल्या अध्यादेशात म्हटले आहे. असे प्रशिक्षण वाहनचालक स्कूल अथवा संस्थेकडून करून घ्यावे, असा उल्लेख आहे. मात्र, राज्यात पुण्यातील कासारवाडी येथे एकमेव वाहन चालन प्रशिक्षण व संस्था (आयडीटीआर) आहे. याही संस्थेतून प्रशिक्षण घ्यावे, अशी स्पष्ट सूचना नाही. त्यामुळे पुण्यासह राज्यातील जड वाहनचालकांना इच्छा असूनही प्रशिक्षण घेता येत नाही.याबाबत माहिती देताना सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी सी. एस. चव्हाण म्हणाले, की केंद्र सरकारने जुलै २०१८ पासून वाहनचालकास इंधन कार्यक्षमता प्रशिक्षण बंधनकारक केले आहे. पुणे विभागात दररोज असे ८ ते दहा परवाना वितरीत केले जातात. मात्र, अशी प्रशिक्षण देणारी संस्था निश्चित झाली नसल्याने परवाना वितरण बंद आहे.कासारवाडी येथील वाहन चालन प्रशिक्षण व संस्थेत (आयडीटीआर) व्हेईकल हेल्थ मॉनिटरिंग प्रणाली असल्याने वाहनचालकांनी कोणती चूक केल्याचे लक्षात येते. त्यामुळे या संस्थेला प्रशिक्षण संस्थेची मान्यता द्यावी, असा प्रस्ताव राज्य परिवहन विभागाला पाठविला आहे.- बाबासाहेब आजरी,प्रादेशिक परिवहन अधिकारी

टॅग्स :road transportरस्ते वाहतूक