शहरं
Join us  
Trending Stories
1
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
2
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
3
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
4
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
5
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
6
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
7
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
8
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
9
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
10
VIDEO: पाहावं ते नवलंच... मुलीने चक्क केली ख्रिसमस ट्री हेअरस्टाईल, नेटकऱ्यांना हसू आवरेना
11
बेस प्राईस अवघी ३० लाख, पण लिलावात या ५ खेळाडूंवर पडला पैशांचा पाऊस, बनले करोडपती
12
गीझर-हीटरमुळे तुमचे वीज बिल जास्त येतंय? या स्मार्ट टिप्स वापरून पैसे वाचवा
13
IPL 2026: ऑक्शनमध्ये चेन्नईचा मोठा डाव! १४ कोटी खर्च केले, पण परफेक्ट खेळाडू निवडला, धोनीची जागा घेणार?
14
BJP Assets: 2014 पूर्वी भाजपाच्या तिजोरीत किती पैसा होता? 11 वर्षांत किती वाढला? जाणून थक्क व्हाल!
15
आत्मनिर्भर भारताच्या दिशेने मोठे पाऊल, भारतातील पहिला स्वदेशी 64- बिट मायक्रोप्रोसेसर Dhruv64 लाँच
16
तब्बल ८ कोटी २० लाखांची बोली, दिल्ली कॅपिटल्सने संघात घेतलेला अकीब नबी दार कोण?
17
बाँडी बिचवर हल्ला करणाऱ्या साजिदचं भारताशी कनेक्शन समोर, २७ वर्षांपूर्वी सोडलं होतं हैदराबाद
18
आईने पाय धरले, तर वडिलांनी गळा आवळला; निवृत्त पोलिस अधिकाऱ्याने मुलीला संपवले, कारण...
19
Foldable Smartphones: सॅमसंग गॅलेक्सी ते गुगल पिक्सेलपर्यंत, यावर्षी लॉन्च झालेले प्रीमियम फोल्डेबल स्मार्टफोन!
20
"त्याला वर्षभर संधी, मला २-३ मॅचनंतर बाहेर काढलं..."; शुबमन गिलला संघाबाहेर न केल्याचा संताप
Daily Top 2Weekly Top 5

बसच्या ब्रेकडाऊनला लागेना ‘ब्रेक’, भाडेतत्त्वावरील बसचे प्रमाण तुलनेने अधिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2018 01:02 IST

बसच्या ब्रेकडाऊनचे प्रमाण कमी करण्यात पुणे महानगर परिवहन महामंडळाला (पीएमपी) फारसे यश मिळालेले नाही. मागील चार महिन्यांत बसच्या ब्रेकडाऊनला ‘ब्रेक’ लावता आलेला नाही.

पुणे : बसच्या ब्रेकडाऊनचे प्रमाण कमी करण्यात पुणे महानगर परिवहन महामंडळाला (पीएमपी) फारसे यश मिळालेले नाही. मागील चार महिन्यांत बसच्या ब्रेकडाऊनला ‘ब्रेक’ लावता आलेला नाही. दररोज सरासरी दीडशेहून अधिक बस मार्गावरच बंद पडत आहेत. त्यामुळे भाडेतत्त्वावरील बसचे प्रमाण तुलनेने अधिक आहे.मार्गावरच रुसणाºया बस ही पीएमपीची नेहमीच डोकेदुखी राहिली आहे. त्यावरून पीएमपी बसच्या क्षमतेवरील प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाते. तत्कालीन अध्यक्ष तुकाराम मुंढे यांनी ब्रेकडाऊन कमी करण्यासाठी प्राधान्याने प्रयत्न केले. बसच्या देखभाल-दुरुस्तीचे काम दिवसाबरोबरच रात्रीही सुरू केले. रात्रीच्या वेळी ही कामे होऊ लागल्याने दुसºया दिवशी मार्गावरील बसची संख्या वाढली. भाडेतत्त्वावरील पीपीपीमधील बसच्या ब्रेकडाऊनचे प्रमाण कमी करण्यासाठी त्यांना मोठा दंड आकारण्यास सुरुवात केली. त्यामुळे मार्गावर बंद पडणाºया बसची संख्या कमी करण्यात काहीसे यश मिळाले.सध्या पीएमपीच्या ताफ्यात एकूण १९७२ बस असून त्यामध्ये ६५३ बस भाडेतत्त्वावरील आहेत. मुंढे यांनी पदभार स्वीकारला त्या वेळी दररोज २५० ते ३०० बस मार्गावर बंद पडत होत्या. त्यांनी केलेल्या उपाययोजनांमुळे नोव्हेंबरपर्यंत हा आकडा १५० पर्यंत खाली आला. मुंढे यांनी नोव्हेंबर महिन्यात पीपीपी तत्त्वावरील करार रद्द करून त्यांच्याकडील २०० बस ताफ्यात घेतल्या. नोव्हेंबरनंतर ते मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत हे प्रमाण १५० ते १६० दरम्यान स्थिर राहिले.>शेकडो फेºया ऐनवेळी कराव्या लागतात रद्दपीएमपीच्या मालकीच्या बसच्या तुलनेत भाडेतत्त्वावरील बसचे ब्रेकडाऊनचे प्रमाण तुलनेने अधिक आहे. तसेच त्याला ब्रेक लावण्यात पीएमपी प्रशासनाला तितकेसे यश मिळालेले नाही.भाडेतत्त्वावरील बस निम्म्याने कमी असूनही बे्रकडाऊनचे प्रमाण मात्र अधिक असल्याने शेकडो फेºया अचानक रद्द कराव्या लागत आहेत.पीएमपीच्या संकेतस्थळावरील माहितीनुसार सोमवारी एकूण १७०८ बसच्या २१ हजार ५१४ फेºयांचे नियोजन करण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्षात १२५७ बस मार्गावर आल्या. त्यामुळे जवळपास पाच हजार फेºया रद्द कराव्या लागल्या.>‘पीएमपी’ बसचे ब्रेकडाऊनमहिना एकूण ब्रेकडाऊन पीएमपी मालकीच्या पीपीपी भाडेतत्त्वावरीलसप्टेंबर ६११० (२०४) २५६० (८५) ४९० ३०६० (१०२)आॅक्टोबर ६१९९ (२००) २५८९ (८३) ५४१ ३०७९ (९९)नोव्हेंबर ४७४७ (१५८) १५४० (५१) २८४ २९२३ (९७)डिसेंबर ५१२९ (१६५) २२८६ (७४) - २८४३ (९२)जानेवारी ४७९६ (१५४) २१७३ (७०) - २६२३ (८५)फेब्रुवारी ४५६० (१६२) २०६५ (७३) - २४९५ (८९)४ मार्चपर्यंत ६०८ (१५२) २७१ (६८) - ३३७ (८४)

टॅग्स :PMPMLपीएमपीएमएल