शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

न्यायालयीन आदेशही मोडीत, प्रार्थनास्थळांकडे दुर्लक्ष, किरकोळ विक्रेत्यांवर बडगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2017 05:09 IST

मुंबई उच्च न्यायालयाने आदेश दिल्यानंतरही पदपथांवरच्या धार्मिक स्थळांवरील कारवाई तब्बल वर्षभर टाळणाºया महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी विभागाने रस्त्यांवरच्या किरकोळ विक्रेत्यांना बडगा दाखवणे सुरू केले आहे.

पुणे : मुंबई उच्च न्यायालयाने आदेश दिल्यानंतरही पदपथांवरच्या धार्मिक स्थळांवरील कारवाई तब्बल वर्षभर टाळणाºया महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी विभागाने रस्त्यांवरच्या किरकोळ विक्रेत्यांना बडगा दाखवणे सुरू केले आहे. अनधिकृत धार्मिक स्थळांचा सविस्तर अहवाल उपलब्ध असताना तो बाजूला ठेवण्यात आला आहे व खाद्यपदार्थ विक्रेते, पथारीवाले यांच्यावर कारवाई केली जात आहे.मुंबई उच्च न्यायालयाने एका प्रकरणात महापालिका प्रशासनाला शहरातील सर्व अनधिकृत धार्मिक स्थळांची माहिती घेण्याचे व तसा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी विभागाने पहिल्या टप्प्यात पदपथावरील तसेच वाहतुकीला अडथळा ठरणाºया अनधिकृत धार्मिक स्थळांची माहिती जमा केली होती. ती करताना १९६० पूर्वीची धार्मिक स्थळे १९६० ते २००९ या कालावधीतील, तर २००९ याप्रमाणे अ, ब, क अशी वर्गवारी केली आहे. महापालिकेच्याच अहवालानुसार एकूण ५६८ स्थळे आहेत.आतापर्यंत महापालिकेने त्यातील फक्त १०३ धार्मिक स्थळांवर गेल्या वर्षभरात कारवाई केली आहे. उर्वरित ४६५ अनधिकृत धार्मिक स्थळे जैसे थे अवस्थेत आहेत. विविध कारणांनी पुढील कारवाई करणे टाळले जात आहे. त्यात कायदा सुव्यवस्था, पोलीस बंदोबस्त, राजकीय दबाव अशी अनेक कारणे आहेत. अनेकदा महापालिकेचे पथक कारवाई करण्यास गेले व राजकीय दबावामुळे परत आले असे झाले आहे.असे असताना रस्त्यांवरील किरकोळ खाद्यपदार्थ विक्रेते, पथारीवाले यांच्यावर मात्र गेल्या काही दिवसांमध्ये महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने जोरदार कारवाई सुरू केली आहे. या विक्रेत्यांचा वाहतुकीला अडथळा होत असतोच पण मोठ्या दुकानदारांनाही ते रस्त्यावर नकोसे असतात, कारण ग्राहक दुकानात येत नाहीत. त्यातूनच ही कारवाई सुरू करण्यात आली आहे.सप्टेंबर महिन्यात आतापर्यंत एकूण ६६ अनधिकृत स्टॉल काढण्यात आले, ७८५ हातगाडी विक्रेते, ६४५ पथारीवाल्यांवर कारवाई करण्यात आली. स्वयंपाकाच्या गॅसचा गैरवापर करताना १९८ टाक्या पकडण्यात आल्या. परवानगी न घेता बांधलेल्या ९२ शेड काढून टाकण्यात आल्या. वाहनतळ नसताना लावलेली ७ वाहनेही ताब्यात घेण्यात आली आहे.

टॅग्स :Puneपुणे