जमिनीच्या वादातून एकाला मारहाण
---
रांजणगाव : जमीन फिरवून घेण्याच्या कागदपत्रांवर सह्या देतो असे सांगून संकल्पसिटी चौकामध्ये बोलावून चौघांनी एका तरुणाला मारहाण केली. ही घटना शुक्रवारी दुपारी साडेचारच्या सुमारास घडली. याप्रकरणीमहेश चंद्रसेन गुंजाळ, आंबादास चिंचोले, गुमेश चिंचोले, सूर्यकांत चिंचोले यांच्यावर गुन्हा दाखल झाला. याबाबत जिवाराम हजारीराम देवसाी यांन दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल झालेल्या चौघांनी त्यांना रांगणगावातली संकल्पसिटी चौकीत बालूवनू लाथआुक्तयाने मारहाण केलीती भांडणे सोडविण्यासाठी रमेश राज पुरोहित हे मध्ये पडले तर त्यानाही शिवीगाळ व दमदाटी केल्याचे फिर्यदाती नमूद केले.
--
कंटेनरमधील सामान खाली करण्यासाठी खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा
--
लोणीकंद : फुलगाव (ता. शिरुर) येथील एका खासगी कंपनीचा माल कंटेनरमधून आणत असताना कंटनेनरमधील चालक व परप्रांतीय कामगारांना अडवून त्याचे अपहरण करून त्यांना पाच हजारांची खंडणी मागितल्याप्रकरणी सात जणांवर गुन्हा दाखल करण्यता आला. ही घटना शुक्रवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास घडली. याप्रकरणी निलेश वागसकर, रुपेश वागसकर, गणेश वागसकर, नकुल वागसकर, योगेश वागसकर, वैभव वागसकर, सुनील वागसकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी दिलीप सटवाज बावधने यांनी फिर्यादि दिली. फिर्यदीत म्हटले आहे की, कंटनेर घेऊन कंपनीत जात असताना आरोपींना त्यांना अडविले आणि परप्रांतीय कामगारांना या माल खाली करण्यासाठी का आणले जाते त्यासाठी आम्ही विरोध केला असताना पुन्हा आज परप्रांतीय कामगार का आणले म्हणत आरोपींनी दमदाटी केली व कंटेनरमधील सामान खाली करायचे असेल तर पाच हजार रुपये मागून लाथाबक्यांनी मारहाण केली. याबाबत लोणीकंद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करणअयात आला.
---