शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

'CAA अन् NRC दोन्ही कायद्यांमुळे सामाजिक, धार्मिक ऐक्य धोक्यात'

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2019 06:27 IST

शरद पवार यांचे प्रतिपादन

पुणे : नागरिकत्व दुरुस्ती कायदा व नागरिकत्व नोंदणी कायद्याचे राज्यांना पालन करावेच लागेल, असे केंद्र सरकार म्हणणे अयोग्य आहे. विरोध करणाऱ्या राज्य सरकारांचीच यंत्रणा कायद्यातील तरतुदींचे पालन करणार आहे. त्यामुळे विरोधातील राज्यांचा विचार न करणे अयोग्य आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनीही या कायद्यांबाबत योग्य भूमिका घ्यावी, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले.

सामाजिक व धार्मिक ऐक्य केंद्र सरकार धोक्यात आणत आहे. ढासळत्या अर्थव्यवस्थेवरून लक्ष वळविण्यासाठी व विरोधकांचे न ऐकता सरकारने हे कायदे केले, असे सांगून ते म्हणाले की, पाकिस्तान, बांगलादेश व अफगाणिस्तानमधून येणाऱ्यांच्या चिंतेमुळे ही दुरुस्ती केली, असे सरकार सांगते, पण श्रीलंका व नेपाळला वगळले याचाच अर्थ केंद्र विशिष्ट गटाच्या विरोधात भूमिका घेत आहे.आठ राज्यांनी या कायद्यास विरोध केला आहे. नितीशकुमार व रामविलास पासवान हे नेते भाजपसोबत असूनही त्यांनी विरोधी मत व्यक्त केले. निवृत्त नौदलप्रमुख रामदास, तसेच अनेक साहित्यिक, विचारवंत कायद्याविरोधात आहेत. तरीही केंद्र सरकार बोलायला तयार नाही. अशाने सामाजिक, धार्मिक ऐक्य धोक्यात येईल. आपले म्हणणे विरोधकांनी शांतपणे, लोकशाही मार्गाने सरकारपर्यंत पोहोचवावे, सरकारनेही विरोधकाशी संवाद साधावा, असेही पवार म्हणाले. 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयक