याबाबत जेजुरी पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, दोन महिन्यांपूर्वी नाझरे येथील अंगणवाडी तसेच पांडेश्वर येथील अंगणवाडी आणि प्राथमिक शाळा यांची कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी इलेक्ट्रॉनिक वस्तू, टी.व्ही. एलईडी स्पीकर व संगणक चोरून नेल्याच्या तक्रारी आल्या होत्या. जेजुरी पोलिसांनी याबाबत पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू केला होता.
पोलिसांनी खबऱ्यांमार्फत या घरफोड्या करणारांची माहिती मिळवली. दोघांनाही पोलिसांनी अटक करून त्यांच्याकडून सुमारे ८० हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपी रात्रीच्या वेळी जेथे कोणी रखवालदार नाही अशा ठिकाणी चोऱ्या करत असून त्यांनी हिंदू पब्लिक स्कूलचे ही कुलूप तोडून चोरीचा प्रयत्न केल्याचे तपासात पुढे आले आहे.
जेजुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नंदकुमार सोनवलकर, पोलीस हवालदार चंद्रकांत झेंडे, संदीप कारंडे, गणेश नांदेड, गणेश माने, धर्मराज खाडे, प्रवीण शेंडे आदीनी तपासात सहभाग घेतला होता.
----
फोटो क्रमांक - ०१ जेजूरी पोलिस
घरफोडी केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेले आरोपींसह जप्त केलेला मुद्देमाल.
010921\1946-img-20210901-wa0026.jpg
आरोपी, व मुद्देमालासह जेजुरी पोलीस