पुणे : आजकाल ज्येष्ठ नागरिकांसह तरुणाईमध्ये सुध्दा शारीरिक तंदुरुस्तीविषयी प्रचंड जागरुकता निर्माण झाली आहे.त्यामुळे रोजच्या धावपळीच्या जमान्यात देखील जो तो थोडातरी वेळ आपल्या शरीरासाठी देताना दिसतो. त्यात मग उठल्यापासन ते झोपेपर्यंतच्या सगळ्या बाबींवर तितक्यात कटाक्षाने नियोजनपूर्वक काम केले जाते. त्यात एनर्जेटिक ड्रिंकपासून नाश्ता,जेवण यांची सर्वतोपरी वेळेनुसार काळजी घेतली जाते. परंतु,हे सर्व असूनही छोट्या वयोगटातल्या मुलांपासून ते ज्येष्ठांमध्ये विशेषत: तरुणाईमध्ये जिमचे जबरदस्त आकर्षण आहे. पण अजिंक्य बेंद्रे नावाचा अवलिया तरुण जिमच्या व्यायामासोबत मोकळ्या मैदानावर '' बूट कॅम्प '' च्या नावाखाली व्यायामाचे धडे गिरवत आहे.
अजिंक्य म्हणाला, गेली दहा वर्ष या क्षेत्रात काम करत आहे. तसेच मागील चार वर्षांपासून नव्याने बुथ कॅम्प ही संकल्पना राबविण्यास सुरुवात केली. बंदिस्त वातावरणापेक्षा मोकळ््या हवेच्या ठिकाणी जर मैदानात व्यायामाच्या संधी सांघिक गटानुसार जर घेता आल्या तर हा प्रश्न मनात उभा राहिला आणि ही बुथ कॅम्प ही संकल्पना अस्तित्वात आली. परंतु, या उपक्रमाची सर्वात मोठी गरज होती ती मैदान.. ज्यांची संख्या आपल्याकडे एकतर खूपच मर्यादित आहे. मग शहरातील विविध वयोगटाच्या मंडळी एकत्रित येत माझ्याशी संपर्क करुन या बुथ कॅबची आयोजन केले जाते. त्यात शारीरिक क्षमतेनुसार व्यायाम प्रकार हाताळले जातात.
सायकलिंग, मॅरेथॉन, स्विमिंग, फुटबॉल, क्रिकेट, ट्रेकिंग यांसारखे खेळ खेळणारे लोक जेव्हा जिमच्या तासन्तास चालणाऱ्या वर्कआऊटला कंटाळून माझ्याकडे येतात तेव्हा त्यांना पहिल्यांदा सकारात्मक विचार देण्याचा प्रयत्न करतो. काही कालांतराने ती मंडळी '' बूट कॅम्प '' मध्ये इतक्या सहजतेने व आनंदाने केलेल्या व्यायामातून झालेले अनेक प्रकारचे शारीरिक, मानसिक, वैचारिक बदल अतिशय समाधानकारक असतो.