शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात हल्ल्याची तयारी, पाकिस्तानी कनेक्शन उघड; दहशतवादी बिलालच्या चौकशीतून धक्कादायक खुलासे
2
Operation Pimple : सैन्याला मोठं यश! कुपवाडामध्ये घुसखोरी करणाऱ्या २ दहशतवाद्यांचा खात्मा
3
"महाराष्ट्र लुटून खा... आम्ही...! मंत्री सरनाईकांनी २०० कोटींची जमीन ३ कोटीत घेतली", वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
4
अजबच...! नकळत लग्न झालं...! अमेरिकन पॉप स्टारचा मलेशियन सुलतानशी 'निकाह', आता 'तलाक'ची मागणी; नेमकं प्रकरण काय?
5
“प्रत्येक भारतीयाला वंदे भारत ट्रेनचा अभिमान”: PM मोदी, वाराणसीतून ४ नव्या सेवांचे लोकार्पण
6
७ वर्षांनंतर अनुष्का शर्मा करणार कमबॅक! 'चकदा एक्सप्रेस' OTTवर होणार रिलीज?
7
एका चपातीमध्ये किती कॅलरीज असतात, वजन कमी करण्यासाठी रात्री किती खाव्यात?
8
Crime:  "काका वारले, मुलंही सारखी आजारी पडतात", जादूटोण्याचा संशयातून जन्मदात्या आईची हत्या!
9
IND vs AUS:"कभी शेर को घास खाते हुए देखा है क्या?" सूर्या भाऊनं केली अभिषेकची थट्टा; व्हिडिओ व्हायरल
10
कतरिना कैफने ४२ व्या वर्षी दिला मुलाला जन्म, कशी आहे तब्येत? रुग्णालयाने शेअर केलं अपडेट
11
Video - काळाचा घाला! उत्तर प्रदेशच्या शामलीत भीषण अपघात, ४ मित्रांचा मृत्यू, कारचा चक्काचूर
12
Video: मराठी अभिनेत्रींनी केलं सोहम बांदेकरचं केळवण; आदेश-सुचित्रा बांदेकरांची होणारी सून कोण?
13
Gardening Tips: बटाट्याची सालं फेकू नका, रोपांसाठी ठरते सुपरफूड; वापर कसा करायचा ते पाहा 
14
'ती' फाइल आधी ३ वेळा माझ्याकडे आली होती; मी ती नाकारली- माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात
15
खळबळजनक! अनिलशी लग्न, आकाशशी अफेअर, नशेच्या गोळ्या...; काजलने नवऱ्याचा काढला काटा
16
“NDA म्हणजे पांडव, निवडणुकीच्या कुरुक्षेत्रावर कौरवांचा पराभव करा”; एकनाथ शिंदेंचे आवाहन
17
Ambadas Danve : "अजित दादांचे वक्तव्य म्हणजे ‘जोक ऑफ द डे’", अंबादास दानवेंचा खोचक टोला
18
बुलिंग, शाळेचं दुर्लक्ष अन् चौथ्या मजल्यावरुन उडी... अमायराला कशाचा झाला त्रास?, आईचा मोठा खुलासा
19
Tarot Card: मध्यम फलदायी आठवडा, संयमाचा कस लागेल; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
20
अजितदादांना शह देण्यासाठी पार्थ पवार प्रकरण काढलं गेलं का?; चंद्रकांत पाटील म्हणाले...

पायाभूत सुविधांच्या विकासाला ‘बूस्ट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2018 02:20 IST

केंद्रीय अर्थसंकल्पात सरकारने पायाभूत सुविधांच्या विकासावर भर दिला आहे. पायाभूत सुविधा या अर्थव्यवस्थेच्या चालक आहेत, असेच भाष्य वित्तमंत्र्यांनी अर्थसंकल्पीय भाषणात मांडले. रेल्वे व रस्ते विकासावर अर्थसंकल्पात आतापर्यंतची सर्वात जास्त तरतूद झालेली आहे.

केंद्रीय अर्थसंकल्पात सरकारने पायाभूत सुविधांच्या विकासावर भर दिला आहे. पायाभूत सुविधा या अर्थव्यवस्थेच्या चालक आहेत, असेच भाष्य वित्तमंत्र्यांनी अर्थसंकल्पीय भाषणात मांडले. रेल्वे व रस्ते विकासावर अर्थसंकल्पात आतापर्यंतची सर्वात जास्त तरतूद झालेली आहे. देशातील राष्ट्रीय महामार्गांच्या विकास व देखरेखीसाठी तर ८० हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.२०१७-१८ मध्ये देशभरात नऊ हजार किलोमीटरचे राष्ट्रीय महामार्ग पूर्ण होतील, असा विश्वास वित्तमंत्र्यांनी व्यक्त केला. ग्रामीण भागात ३.१४ लाख किलोमीटरचे रस्ते बांधण्यात येणार आहेत. देशभरातील विविध भागांना जोडणारा महत्त्वाकांक्षी ‘भारतमाला’ प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यासाठी ५ लाख ३५ लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यामध्ये ३४ हजार ८०० किलोमीटरच्यामहामार्गांची निर्मिती होणार आहे. २०१८-१९ मध्ये यातील ४ हजार ५०० किलोमीटर निर्मितीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. निधी उभारण्यासाठी ‘एनएचएआय’कडून महामार्गांवरील टोल, टीओटी तसेच ‘इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेन्स्टमेंट फंड्स’चा उपयोग करण्यात येणार आहे, असे जेटली यांनी स्पष्ट केले. या क्षेत्रात भरीव तरतूद केल्याखेरीज देशाच्या आर्थिक विकासाला चालना मिळणार नाही, हे विद्यमान सरकारच्या लक्षात आले आहे. यामुळे पायाभूत क्षेत्राशी निगडीत उद्योगांनाही चालना मिळण्यास मदत होईल़पर्यटनाला चालनापर्यटनाला चालना देण्यासाठी ‘रोपवे’, रेल्वेस्थानकांजवळ ‘लॉजिस्टिक पार्क’वर भर‘अमृत’ योजनेंतर्गत ५०० गावांना पाणीपुरवठा. ७७ हजार कोटींची तरतूदमोठ्या पायाभूत सविधा प्रकल्पांना वित्तीय मदत मिळण्यासाठी ‘इंडिया इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड’ची स्थापना.‘डिझास्टर रेसिलिएन्ट इन्फ्रास्ट्रक्चर’च्या विकासासाठी ६० कोटींची तरतूद‘डिजिटल इंडिया’मोहिमेसाठी ३ हजार ७३ कोटींची तरतूदमहामार्ग, बंदरांसाठी निधीभारतमाला २९,६६३.१३ कोटीविजयवाडा-रांची कॉरिडॉर २,९४० कोटीईशान्येकडील राज्य ६,२१० कोटीअरुणाचल पॅकेज ५,७१० कोटीकुठल्याही योजनेत नसणाºया महामार्गांचा विकास १८,५०६.४२ कोटीबंदरांच्या आधुनिकीकरणासाठी 600कोटी अर्थसंकल्पात जहाज मंत्रालयासाठी एकूणकोटींची तरतूद करण्यात आली आहे. यात ‘सागरमाला’प्रकल्पांतर्गत बंदरांच्या आधुनिकीकरणासाठी 600 कोटींची तरतूद समाविष्ट आहे.ऊर्जा क्षेत्रासाठी १३,८८१ कोटीक इन इंडिया मोहीम अधिक सुलभ करण्यासाठी ऊर्जा, कोळसा, नवीन आणि पुनर्वापर करता येणारी ऊर्जा, खाणी या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात बदल करण्याचे संकेत अर्थसंकल्पात दिले आहेत. या क्षेत्राशी संबंधित सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग अधिक स्पर्धाक्षम व्हावेत, यासाठी ५0 कोटी रुपयांपर्यंती उलाढाल असलेल्या उद्योगांसाठी कार्पोरेट करात २५ टक्के कपात करण्यात आली आहे. ग्रामीण मंत्रालयासाठीच्या तरतुदीत ३३ टक्के वाढ करून ती १३,८८१ कोटी रुपये करण्यात आली आहे.येत्या वर्षात आणखी २0 हजार मेगावॅट सौरऊर्जा निर्मितीचे लक्ष्य आहे. सोलर टेम्पर्ड ग्लासवरील सीमा शुल्क आणि अबकारी करात कपात किंवा रद्द करून तसेच सौरऊर्जेसाठी लागणाºया कच्च्या मालावरील करामध्ये कपात करून हे लक्ष्य साध्य करण्यात येईल. रेल्वे सात हजार रेल्वेस्थानके सौरऊर्जेने उजळवणार आहे. आॅफग्रीड सौर ऊर्जेसाठीच्या २०१७-१८ साठीच्या तरतुदीत २१ टक्क्यांनी वाढ करुन ती ८४९ कोटी रुपये केली आहे. २०२२ पर्यत १०० गीगावॅट छतावरील सौरऊर्जा निर्माण करुन देशाची ४० टक्के ऊर्जेची गरज भागविण्याचे लक्ष्य आहे. दीनदयाळ उपाध्याय ग्राम ज्योती योजनेच्या तरतुदीत ४४ टक्के वाढ करून ४,८१४ कोटी करण्यात आली आहे. शहरी भागासाठीच्या एकात्मिक ऊर्जा विकास योजनेसाठीची तरतूद ४,५२४ कोटींवरून ५,८२१ कोटींवर नेण्यात आली आहे.

टॅग्स :Budget 2018अर्थसंकल्प २०१८Puneपुणे