शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

अत्याधुनिक यंत्रणेमुळे पुस्तके होणार सुरक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2018 19:12 IST

संस्थेच्या कार्यकारी मंडळाने ग्रंथालयातील पुस्तकांसाठी ‘आरएफआयडी’ ही अत्याधुनिक प्रणाली वापरण्याचा निर्णय घेतला आहे. या तंत्रज्ञानाचा वापर करणारी भांडारकर संस्था ही केवळ पुण्यातीलच नव्हे तर भारतातील पहिली प्राच्यविद्या संशोधन संस्था ठरणार आहे.  

ठळक मुद्देभांडारकर संस्था : आरएफआयडी तंत्रज्ञानाचा वापर  भांडारकर संस्थेच्या डॉ. रा.ना.दांडेकर ग्रंथालयात सुमारे १,३८,००० पुस्तकांचा अनमोल ठेवा उपलब्ध

पुणे : ग्रंथपालाला दुूर्मिळ पुस्तकाचे नाव सांगितल्यावर त्यांनी अत्याधुनिक उपकरणाच्या साहाय्याने कोणत्या खोलीत, कोणत्या रॅकमध्ये ते मिळेल, हे काही क्षणात सांगितले..ग्रंथालयातून आणलेले पुस्तक परत करण्याच्या तारखेचा मेसेज आला किंवा एखादी व्यक्ती नोंद न करता पुस्तक घेऊन बाहेर पडत असताना सायरन वाजला तर ! या सर्व कल्पना भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेमध्ये लवकरच वास्तवात अवतरणार आहेत. संस्थेच्या ग्रंथालयातील पुस्तकांच्या देखभालीसाठी रेडिओ फ्रिक्वेन्टेड आयडेंटिफिकेशन डिव्हाईसचा वापर केला जाणार आहे.  भांडारकर संस्थेच्या डॉ. रा.ना.दांडेकर ग्रंथालयात सुमारे १,३८,००० पुस्तकांचा अनमोल ठेवा उपलब्ध आहे. कालानुरुप बदल करत असताना डिजिटल लायब्ररीची संकल्पना पुढे आली. त्याप्रमाणे पुस्तकांचा कॅटलॉग तयार करण्याचे काम पूर्ण झाले आहे. डिजिटायझेशनचा पुढील टप्पा म्हणून आरएफआयडी ही नवी संकल्पना अस्तित्वात आणली जाणार आहे. याअंतर्गत प्रत्येक पुस्तकाला मायक्रोचिप बसवण्याचे काम सुरु असून, सेन्सरच्या सहाय्याने पुस्तकांच्या नोंदी ठेवणे शक्य होणार आहे. त्यामुळे पुस्तके गहाळ होणे, पुस्तकांची चोरी अशा प्रकारांना आळा बसणार आहे. संस्थेच्या ग्रंथालयामध्ये वेद, पुराण, उपनिषद, रामायण, महाभारत, आयुर्वेद यांसह विविध विषयांवरील सुमारे एक लाख ३० हजार पुस्तकांचा संग्रह आहे. वेगवेगळ्या विषयांवरील अनमोल ठेवा सुरक्षितपणे जतन करण्याच्या उद्देशातून संस्थेच्या कार्यकारी मंडळाने ग्रंथालयातील पुस्तकांसाठी ‘आरएफआयडी’ ही अत्याधुनिक प्रणाली वापरण्याचा निर्णय घेतला आहे. या तंत्रज्ञानाचा वापर करणारी भांडारकर संस्था ही केवळ पुण्यातीलच नव्हे तर भारतातील पहिली प्राच्यविद्या संशोधन संस्था ठरणार आहे.  परदेशातील ग्रंथालयांमध्ये 'आरएफआयडी' ही प्रणाली उपयोगात आणली जात असून त्याला यश मिळाले आहे.त्यामुळे या प्रणालीचा वापर करुन संस्थेच्या ग्रंथालयातील पुस्तकांचे जतन केले जावे, यासाठी हा निर्णय घेतला आहे. त्यासाठी ठराविक निधीची तरतूद करण्यात येणार आहे. त्यासाठी आॅनलाईन निविदा काढण्यात असून, त्याबाबतची प्रक्रिया लवकरच पूर्ण  करण्यात येईल , अशी माहिती संस्थेचे मानद सचिव डॉ. श्रीकांत बहुलकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.‘आरएफआयडी’ प्रणालीअंतर्गत प्रत्येक पुस्तकामध्ये एक मायक्रोचीप बसविली जाते. त्या चीपला असलेल्या सेन्सरमुळे ग्रंथालयात जाणारी व्यक्ती जसजशी पुस्तकाजवळ जाईल तसा त्या पुस्तकातील चीपचा आवाज मोठा होत जाईल आणि वाचकाला ते पुस्तक नेमके कोठे आहे हे समजू शकेल, असे अशी माहिती दुर्मिळ ग्रंथांच्या डिजिटायझेशनचे काम पाहणारे डॉ. सुधीर वैशंपायन यांनी दिली.  आरएफआयडीच्या वापरामुळे वाचकांना घर बसल्या, त्यांना हवे असलेले पुस्तक सध्या ग्रंथालयामध्ये आहे किंवा ते कोणाकडे आहे याची माहिती मिळू शकणार आहे. त्यामुळे पुस्तक घेण्यासाठी ग्रंथालयात येण्याचा त्यांचा हेलपाटा वाचू शकेल. त्याचप्रमाणे ग्रंथालयामध्ये पुस्तक उपलब्ध असेल तर, वाचकाला ‘एसएमएसद्वारे कळवण्याची सुविधा देणे शक्य होणार आहे. या तंत्रज्ञानामुळे वाचकांना लेखकानुसार, विषयानुसार, शीर्षकानुसार पुस्तक शोधता येणार आहे, असेही वैशंपायन यांनी सांगितले.

टॅग्स :Puneपुणेbhandarkar institute puneभांडारकर संशोधन संस्था, पुणे