शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
3
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
4
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
5
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
6
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
7
बापहो, काळजी फक्त कमाईची नको; मुलांच्या यशासाठी त्यांना वेळ देणंही तितकंच मोलाचं! 
8
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
9
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
10
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
11
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
12
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
13
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!
14
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
15
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
16
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
17
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
18
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
19
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
20
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?

अमित शहा झाले लेखक, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार पुस्तकाचे प्रकाशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2017 02:31 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’चे खंड प्रकाशित होत असतानाच, आता भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हेही लेखकांच्या रांगेत येऊन बसत आहेत.

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’चे खंड प्रकाशित होत असतानाच, आता भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हेही लेखकांच्या रांगेत येऊन बसत आहेत. त्यांच्या एका पुस्तकाचे प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रविवारी (दि. १०) दुपारी साडेचार वाजता पुण्यात होत आहे.बालगंधर्व रंगमंदिर येथे हा कार्यक्रम होईल. पुस्तकाच्या मराठी, हिंदी व इंग्रजी अशा तिन्ही आवृत्त्यांचे प्रकाशन शहा यांच्याच हस्ते होणार आहे. रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीने हे पुस्तक प्रकाशित केले असून, भारतीय जनता पार्टी राजकारणात कशासाठी, हे या पुस्तकाचे नाव आहे. त्यात भाजपाच्या धोरणाची चिकित्सा केली असून, कार्यकर्त्यांच्या मार्गदर्शना बरोबरच सर्वसामान्य भारतीय नागरिकांनी पक्षाची ध्येयधोरणे समजावित या हेतूने शाह यांनी पुस्तकाचे लेखन केले असल्याची माहिती दिली. प्राचार्य अनिरुद्ध देशपांडे अध्यक्षस्थानी असतील. पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष खासदार डॉ. विनय सहस्त्रबुद्धे प्रमुख उपस्थित असतील. प्रबोधिनीचे कार्यकारी संचालक रवींद्र साठे व निमंत्रक योगेश गोगावले यांनी ही माहिती दिली.

टॅग्स :Amit Shahअमित शाहDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस