शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
2
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
3
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
4
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
5
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
6
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
7
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
8
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
9
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
10
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला 'खासदारकी'मुळे आव्हान, न्यायालयाने काय दिला निकाल?
11
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
12
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
13
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...
14
'सकाळी उठतात, डोळे चोळत काहीही पोस्ट करतात...', कंगना राणौतचा राहुल गांधींवर पलटवार
15
तुम्हालाही छोट्या छोट्या गोष्टींचा राग येतो, आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट अटॅकचे ठराल बळी
16
तुमचा मारुती, ह्युंदाई, टाटावर विश्वास पण डीलर्सचा? या कंपन्या त्यात नाहीच...
17
महायुती सरकारमध्ये सहकारी होण्याचा निर्णय का घेतला? पक्षाच्या चिंतन शिबिरात दादांनी स्पष्टच सांगितलं!
18
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
19
Gold Silver Price 19 September: सोन्याच्या दरात घसरण, पण चांदीच्या किमतीत जोरदार उसळी; कॅरेटनुसार पाहा सोन्याचे नवे दर
20
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा

बुक हाऊस : ‘पॉप्युलर’ घेतेय निरोप  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2018 05:33 IST

गेली ६४ वर्षे हजारो वाचक, लेखक, प्राचार्य, ग्रंथपालांचे हक्काचे साहित्यस्थान असलेले फर्ग्युसन रस्त्यावरील पॉप्युलर बुक हाऊस वाचकांचा निरोप घेत आहे. करमणुकीची नवी साधने, वाचनाची कमी झालेली ओढ यामुळे पुस्तकविक्री घटल्याने हे बुक हाऊस बंद करण्याची वेळ ओढवली आहे.

पुणे  - गेली ६४ वर्षे हजारो वाचक, लेखक, प्राचार्य, ग्रंथपालांचे हक्काचे साहित्यस्थान असलेले फर्ग्युसन रस्त्यावरील पॉप्युलर बुक हाऊस वाचकांचा निरोप घेत आहे. करमणुकीची नवी साधने, वाचनाची कमी झालेली ओढ यामुळे पुस्तकविक्री घटल्याने हे बुक हाऊस बंद करण्याची वेळ ओढवली आहे. चार-पाच वर्षांपासून पुस्तकविक्रीचे प्रमाण लक्षणीयरीत्या घटले आहे. वाचनप्रेमी दुकानामध्ये येईनासे झाले आहेत. त्यामुळे बुक हाऊस काळाच्या पडद्याआड जाणार आहे.पुस्तकांबरोबरच सीडी, व्हीसीडी, डिव्हीडी, आॅडिओ बुक्स, किंडल असे कालानुरूप होत गेलेले बदल ‘पॉप्युलर’ने सहज स्वीकारले. पहिले आॅनलाईन बुक स्टोर्स सुरू केले होते. मात्र, काही कारणाने ते यशस्वीपणे चालू शकले नाही. फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप, ईमेलच्या माध्यमातून आम्ही ग्राहकांच्या कायमच संपर्कात राहिलो. ‘टीम पीबीएच’ या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपने अनेक मित्र दिले. या ग्रुपद्वारे आम्ही अनेक सामाजिक उपक्रम राबवू शकलो, अशी प्रतिक्रिया सुनील गाडगीळ यांनी व्यक्त केली. परिस्थिती बदलली, आवड, प्राधान्यक्रम बदलला व बुक हाऊस बंद करावे लागणार या कटू सत्याला सामोरे जाण्यासाठी मनाची तयारी केली. त्याच जागेत लवकरच एका नव्या रूपात, नव्या स्वरूपात आपल्या सेवेस येत आहोत, असेही ते म्हणाले.माधव लक्ष्मण गाडगीळ यांनी १० आॅक्टोबर १९५४ रोजी पॉप्युलर बुक हाऊसची स्थापना केली. लेखक, खेळाडू, अभिनेते, राजकीय नेते, उद्योगपती, गायक, शास्त्रज्ञ, शासकीय व पोलीस अधिकारी अशा दिग्गजांचे बुक हाऊसशी स्नेहबंध निर्माण झाले. वाचकांच्या तीन-चार पिढ्या दुकानाशी जोडल्या गेल्या. पु. ल. देशपांडे, व्यंकटेश माडगूळकर, डॉ. श्रीराम लागू, निळू फुले, विक्रम गोखले, पं. हृदयनाथ मंगेशकर, अनुराधा पौडवाल, बाळासाहेब ठाकरे यांनी दुकानाला भेट दिली होती.पुस्तकप्रेम आणि व्यवहार यामध्ये व्यवहाराची सरशी झाली. पुस्तकविक्रीचे प्रमाण घटल्याने तोटा सहन करत आणखी किती काळ दुकान सुरू ठेवायचे ही चिंता भेडसावत होती. ग्राहकांचा ओघ कमी झाल्याने पुस्तकांची विक्री होत नसल्याच्या कारणास्तव काही कर्मचाºयांना कमी करण्याची वेळ ओढवली. वर्षभर विचार केल्यानंतर आता हे दुकान बंद करण्याचा निर्णय घेण्याची वेळ आली आहे. दुकानातील उर्वरित माल वितरकांकडे पोहोचविल्यानंतर चार-पाच दिवसांत दुकान औपचारिकरीत्या बंद होणार आहे. लवकरच आम्ही एका नव्या स्वरूपात पुणेकरांसमोर येणार आहोत.- सुनील गाडगीळ

टॅग्स :Puneपुणेnewsबातम्या