शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

एका पुस्तकाने बदलली आयुष्याची दिशा :यूपीएससी पार केलेल्या भुवनेशची कथा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2018 23:26 IST

स्पर्धा परीक्षेची लाखो मुलं तयारी करत असताना त्यात यश मात्र काही मोजक्यांचं मिळत. यातल्या एकाची ही गोष्ट. एका पुस्तकामुळे देशाला अधिकारी मिळाला आहे. 

 

पुणे :एका पुस्तकाने आयुष्याची दिशा बदलू शकते का या प्रश्नाचे उत्तर आहे 'हो'.आईने दिलेल्या एका पुस्तकामुळे यूपीएससी परीक्षेत देशात ५९व्या आलेल्या भुवनेश पाटील याचे आयुष्याची दिशा बदलली.निकाल लागला तेव्हा भुवनेश पुण्याच्या लक्ष्मी रस्त्यावर भावाच्या लग्नाची खरेदी करत होता. त्यातच फोन बंद असल्याने त्याने व्हॉट्सऍप  बघितले नव्हते. अचानक मित्राने फोन करून तू सिलेक्ट झाला आहेस सांगितलं आणि त्याचा विश्वासच बसेना. अनेकदा मित्राकडून खात्री करून मग घरच्यांना बातमी सांगितली आणि दुकानातच जल्लोष सुरु झाला. अखेर पाच वर्ष केलेल्या त्याच्या कष्टांचे चीज झाले. 

 

भुवनेश सांगत होता, खर्दे पाथर्डे हे मूळ गाव असलेले पाटील कुटुंब सध्या शिरपूर येथे राहते. भुवनेशचे आई वडील दोघेही शिक्षक आहेत. आईला आदर्श शिक्षिकेचा राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला आहे. त्याने पुण्यातील एमआयटी कॉलेजमधून मेकॅनिकल शाखेची अभियांत्रिकीची पदवी घेतली आहे. त्याचे शिक्षण सुरु असताना त्याच्या आईने 'ताई, मी कलेक्टर व्हयनू' हे राजेश पाटील यांचे पुस्तक भेट दिले आणि सुरु झाला एक प्रवास. २०१३साली अभियांत्रिकीची पदवी घेतलेल्या त्याने तीन वेळा परीक्षा दिली तर चौथ्या प्रयत्नात त्याला यश मिळाले. त्याला चरित्रात्मक चित्रपट बघायला आवडतात तर कँडिड फोटोग्राफीची आवडते.  

 

माझ्या यशात माझ्या आई वडील आणि भावाचा मोठा वाटा आहे. त्यांच्या प्रोत्साहनामुळे हे यश मिळाल्याचं तो आवर्जून सांगतो. तुला इंजिनिअरिंग करून इतकी वर्ष झाले आता जॉब कर असा आग्रह त्यांनी कधीच धरला नसल्याचेही तो म्हणाला. आयुष्यात केलेले कष्ट कधीही वाया जात नाहीत. त्याच फळ कधी ना कधी मिळतंच.तिसऱ्या प्रयत्नात १२ मार्कांवरून रँक हुकला होता.मनात नाही म्हटलं तरी निराशा होतीच. १ जूनला निकाल लागल्यावर वाईट वाटले तरी ते बाजूला ठेवत १७ जूनला परत प्राथमिक परीक्षा दिली आणि आता पास झालो. हे सगळं अद्भुत वाटत आहे.आईला फोन करून बातमी सांगितल्यावर तिला काहीही सुचत नव्हते. तिच्या कातर झालेल्या आवाजात सारे काही अनुभवल्याचेही तो सांगत होता. ते पुस्तक तो आज लागलेला निकाल या साऱ्यात मोठा कालावधी गेला असला तरी त्याचा शेवट मनासारखा झाल्याचं समाधान त्याच्या चेहऱ्यावर झळकत होते. 

 

 

 

टॅग्स :Puneपुणेupscकेंद्रीय लोकसेवा आयोग