शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

बोन्साय वृक्ष म्हणजे अपूर्णांकडून पूर्णाकांचा प्रवास : वनमंत्री सुधीर मुनगंटीवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2018 13:26 IST

प्राजक्ता काळे यांनी पुण्यात ३,३३३ बोन्साय झाडांचा जगातील सर्वांत मोठा संग्रह करून तो एकाच ठिकाणी प्रदर्शित केला आहे...

ठळक मुद्देपुण्याच्या बोन्साय मास्टर प्राजक्ता काळे यांचे गिनीज रेकॉर्डजगभरात भारतीय गोष्टींमध्ये संशोधन सुरु

पुणे : आपण ज्यावेळी वृक्ष पाहतो त्यावेळी आपल्या मेंदुमध्ये वेगळ्या प्रकारच्या रासायनिक प्रक्रिया होतात. यामुळे आपल्याला आनंदाची  भावना होते. नवीन आनंद व त्याचा शोध घेण्याची प्रेरणा आपल्याला वृक्षांच्या माध्यमातून मिळते. बोन्साय वृक्ष म्हणजे अपूर्णांकाकडून पूर्णांकांचा प्रवास असल्याची भावना असून ही कला आपल्याकडे आता विकसित होण्याची गरज असल्याचे मत वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केले. एकाच ठिकाणी बोन्साय झाडांचा जगातील सर्वात मोठा संग्रह करून तो प्रदर्शित करण्याचे गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड पुण्यातील बोन्साय मास्टर प्राजक्ता गिरीधारी काळे यांनी पुण्यामध्ये प्रस्थापित केले. गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचे भारतातील परीनिरीक्षक (अ‍ॅडज्यूडीकेटर) रिशी नाथ यांनी या विषयीची अधिकृत घोषणा करीत गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचे प्रमाणपत्र एका कार्यक्रमात काळे यांना प्रदान केले. यावेळी  राज्याचे वन व अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, वन खात्याचे सचिव विकास खर्गे, राज्याच्या उद्योग विभागाचे उपसचिव संजय इंगळे,  सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल मणियार, पद्मविभूषण डॉ. के. एच. संचेती, गिरीधारी काळे यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.मुनगंटीवार म्हणाले, बोन्सायचा समावेश महाराष्ट्र शासन कौशल्य विकास योजनेमध्ये करणार असून, त्यामध्ये अभ्यासक्रम तयार करण्यात येतील, तसेच रोजगार निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केला जाईल. 

सा-याच गोष्टी भारतामधून निर्माण झाल्या आणि त्या जगामध्ये गेल्या. जगभरात भारतीय गोष्टींमध्ये संशोधन सुरु आहे. प्राजक्ता काळे यांनी अशाच एका कलेला भारतामध्ये पुन्हा आणून देशाचे, राज्याचे आणि पुण्याचे स्थान जगामध्ये बोन्सायच्या माध्यमातून उंचावले आहे.प्राजक्ता काळे यांनी पुण्यात ३,३३३ बोन्साय झाडांचा जगातील सर्वांत मोठा संग्रह करून तो एकाच ठिकाणी प्रदर्शित केला आहे. यामध्ये देशविदेशातील १५० हून अधिक झाडांच्या जातींचा समावेश आहे. प्रास्ताविक करताना गिरिधारी काळे यांनी केले. इंडोनेशिया येथील बोन्साय मास्टर रुडी नजाओ आणि अनेक देशांमधील बोन्सायचे तज्ञ उपस्थित होते.

टॅग्स :PuneपुणेSudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवार