शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

पुणे स्थानकात बॉम्ब ठेवलाय, लोकेशन हवं असल्यास ७ कोटी द्या; कंट्रोल रुमला कॉल आला अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2022 22:20 IST

रमजान ईदचा दिवस, त्यात भोंग्यांवरून वाद सुरू असताना पोलीस कंट्रोल रुमला कॉल आला

पुणे : पोलीस नियंत्रण कक्षातील ११२ या क्रमांकावर एका व्यक्तीने फोन करुन रेल्वे स्थानकावर बॉम्ब ठेवला आहे. त्या बॉम्बचे नेमके लोकेशन हवे असेल तर ७ कोटी रुपये द्यावे लागतील, असा सांगितले गेले. रमजान ईदचा दिवस, त्यात भोंग्यांवरून सुरु असलेला वाद यामुळे राज्यात तणावाचे वातावरण असताना असा फोन आल्याने संपूर्ण पोलीस दलाची एकच धावपळ उडाली. हा कॉल वाघोली परिसरातून आला असल्याचे ११२ वरुन याची माहिती तातडीने पुणे शहर पोलीस दलाच्या नियंत्रण कक्षाला देण्यात आली. त्यानंतर तातडीने पोलीस तसेच बॉम्बशोधक व नाशक पथकाने शहरातील सर्व रेल्वे स्थानकावर धाव घेतली. संपूर्ण परिसर श्वान पथकासह पिंजून काढला. मात्र, कोणतीही आक्षेपार्ह वस्तू अथवा बॉम्ब आढळून आला नाही.दरम्यान, एकीकडे तपासणी सुरु असताना त्या कॉलरचा शोध घेण्याचे काम सुरु होते. ज्या मोबाईलवरुन त्याने कॉल केला होता. तो जालना येथील ठाकूर नावाच्या व्यक्तीचा असल्याचे आढळून आले. पोलीस त्याच्यापर्यंत पोहचले. तेव्हा त्याने आपला फोन चोरीला गेला असल्याचे सांगितले. त्याचवेळी पोलीस अधिकार्यांनी या कॉलरशी पुन्हा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्याने मोबाईल बंद केल्याचे आढळून आले आहे.

याबाबत अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांनी सांगितले की, हा कॉल ११२ वर आला होता. तेथून आपल्या नियंत्रण कक्षाला कळविण्यात आले. पोलिसांनी सर्वत्र तपासणी केली. मात्र, अशी कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून आली नाही. या कॉलरचा ठावठिकाणा मिळाला असून त्याचा शोध सुरु आहे.