शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

खून करून मृतदेह जंगलात पुरला, नगर जिल्ह्यातील घारगावमध्ये केला निर्घृण खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2018 00:33 IST

शरीर सुखासाठी वेश्या न पुरविल्याच्या या कारणावरुन मित्रांनी तरुणाच्या डोक्यात पाटा घालून त्याचा खून केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे.

चाकण : शरीर सुखासाठी वेश्या न पुरविल्याच्या या कारणावरुन मित्रांनी तरुणाच्या डोक्यात पाटा घालून त्याचा खून केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. चाकणच्या या तरुणाला अहमदनगर जिल्ह्यातील घारगावमध्ये नेऊन मारल्यानंतर त्याचा मृतदेह जंगलात पुरण्यात आला. याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून एकाला अटक करण्यात आल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक श्रीधर जगताप यांनी दिली.बाळू जनार्दन नवले (वय ४५, रा. खालुंब्रे, ता. खेड) असे खून झालेल्याचे नाव आहे. नवले हे मुळचे जुन्नर तालुक्यातील कुरण येथील रहिवासी होते. याप्रकरणी भीमराव मारुती पवार ( वय ३२, रा. खालूंब्रे, ता.खेड, मुळगाव धुमाळवाडी, पो. डोळसने, घारगाव, ता. संगमनेर, जि. अहमदनगर) यास अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवले यांचे लग्न झालेले असून खालुंब्रे येथे ते पत्नीसह राहण्यास होते. आरोपी आणि नवले एकमेकांचे मित्र होते.नवले यांना २४ जानेवारी रोजी मोबाईलवर फोन आला. कुरण गावी जाऊन येतो असे पत्नीला सांगून नवले दुचाकी घेऊन घराबाहेर पडले. त्यानंतर तीन दिवस ते घरी परतलेच नाहीत. नातेवाईकांनी त्यांचा आसपासच्या गावात तसेच नातेवाईकांकडे शोध घेण्यात आला. मात्र, त्यांचा काहीच पत्ता लागू शकला नाही. त्यामुळे २७ जानेवारीला चाकण पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार देण्यात आली. पोलिसांनी तातडीने नवले यांच्या मोबाईल कॉल्सचे डिटेल्स काढण्यास सुरुवआत केली. मोबाईल कॉल्सच्या तपशीलावरुन पवार याला संशयावरुन चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. घारगावचे पोलीस निरीक्षक दिलीप निघोट, चाकणचे उपनिरीक्षक श्रीधर जगताप, सहाय्यक फौजदार दत्तात्रय जाधव, हवालदार अमोल जाधव यांनी आरोपीला घारगावच्या जंगलात नेले. जंगलामध्ये पुरलेला मृतदेह काढून पंचनामा केला. संगमनेरचे उपविभागीय अधिकारी अशोक थोरात हे याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.>पोलिसी खाक्या दाखवताच गुन्हा कबुलत्याच्याकडे पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव यांच्या पथकाने चौकशीला सुरुवात केली. सुरुवातीला त्याने पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे देऊन बनविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याला पोलिसी खाक्या दाखविताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली.नवले, पवार आणि त्यांचा एक साथीदार असे तिघे मिळून २५ जानेवारी रोजी धुमाळवाडी येथे पार्टी करण्यासाठी गेले होते. त्यावेळी आरोपींनी नवले यांच्याकडे वेश्येची मागणी केली होती. ही मागणी न पुरविल्याने त्यांच्यामध्ये भांडणे झाली.या भांडणात पवार व त्याच्या साथीदाराने नवले यांना मारहाण करीत डोक्यात पाटा घालून खून केला. त्यानंतर दुसºया दिवशी नवले यांचा मृतदेह घारगावच्या जंगलात पुरला.

टॅग्स :Deathमृत्यू