शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

कोरेगाव भीमा येथील बेपत्ता तरुणीचा मृतदेह सापडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2018 02:02 IST

पूजा सुरेश सकट ही शनिवारी दुपारपासून बेपत्ता होती. रविवारी दुपारी साडेबारा वाजता तिचा मृतदेह घराजवळच्या एका विहिरीत आढळला.

पुणे : कोरेगाव भीमा येथील १९ वर्षीय मुलीचा मृतदेह रविवारी विहिरीत आढळल्याने परिसरात तणाव निर्माण झाला. १ जानेवारीला येथे दंगल झाली होती. दंगलीच्या वेळी घर पेटवण्याच्या प्रकाराचा संदर्भ या घटनेशी लावण्यात येत आहे.माझ्या मुलीने आत्महत्या केली नसून तिचा खून करून मृतदेह विहिरीत टाकून देण्यात आला, असा दावा मुलीच्या वडिलांनी केला आहे. माझे घर ज्यांनी पेटवून दिले त्यांचा या हत्येत सहभाग असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.पूजा सुरेश सकट ही शनिवारी दुपारपासून बेपत्ता होती. रविवारी दुपारी साडेबारा वाजता तिचा मृतदेह घराजवळच्या एका विहिरीत आढळला. सुरेश सकट यांनी सांगितले की, माझे कुटुंब १५ वर्षांपासून भीमा कोरेगावमधील पीडब्ल्यूडीच्या जागेत राहत आहे. माझ्या घराशेजारचा प्लॉट एकाला विकत घ्यायचा आहे. मात्र माझ्या पत्र्याच्या शेडमुळे त्या जागेची किंमत कमी होत असल्याने घर खाली करण्याबाबत काही दिवसांपासून मला धमकी देण्यात येत आहे. त्याबाबत मी १८ नोव्हेंबर २०१७ रोजी कोल्हापूर पोलीस महानिरीक्षकांकडे तक्रार देखील केली होती.१ जानेवारीला येथे दंगल झाली होती. त्याच्या दुसऱ्या दिवशी माझे घर जाळण्यात आले. त्यामागे घर खाली करण्याची धमकी देणाºयांचा हात होता. मी आतापर्यंत चार वेळा तक्रार दिली आहे. नुकताच पुरवणी जबाब देखील दिला होता. त्यातूनच त्यांनी माझ्या मुलीचा खून केला, असे सकट यांनी सांगितले.पूजा हिचा मृतदेह ससून रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आला आहे. आरोपींना अटक होईपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका तिच्या कुटुंबियांनी घेतली होती.चार वेळा तक्रार करूनही सकट कुटुंबियांना आधार देण्यात आला नाही. या घटनेचा सखोल तपास होणे गरजेचे आहे. कोरेगाव भीमा भागात जातीयवाद करणाºयांवर पोलिसांनी त्वरीत कडक कारवाई करावी. सहा महिन्यांपासून सुरू असलेल्या त्रासामुळे हा प्रकार घडला आहे.- सिद्धार्थ धेंडे, उपमहापौर, पुणे

टॅग्स :Bhima-koregaonभीमा-कोरेगाव