शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

लायन्स पाॅईटच्या दरीत सापडला साॅप्टवेअर अभियंता तरुणीचा मृतदेह

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2019 12:53 IST

लायन्स पॉईंट्स येथील एका दरीत तीनशे फुट खोल अंतरावर एका युवतीचा मृतदेह आढळून आला. सायंंकाळी साडेपाच वाजता अलिझाचा मृतदेह दरीतून बाहेर काढण्यात यश आले. या घटनेचा पुढील तपास लोणावळा ग्रामीण पोलीस करीत आहे. 

पुणे  (लोणावळा) :  हैदराबाद येथून पुण्यात कामासाठी आलेल्या एका युवतीचा मृतदेह  लोणावळ्याजवळील लायन्स पॉईंट्स येथील दरीत आढळलेला मृतदेह दरीतून बाहेर काढण्यात शिवदुर्ग मित्रच्या आपत्कालीन पथकाने रविवारी यश आले. ही घटना आत्महत्या की, अपघात हे अद्याप स्पष्ट झाले नाही.  अलिझा राणा (वय-२४, रा. मूळ हैद्राबाद) असे लायन्स पॉईंट्स येथील मृतदेह आढळलेल्या युवतीचे नाव असून, ती हिंजवडी आयटी पार्क येथील एका कंपनीत नोकरीला होती.मिळालेल्या माहितीनुसार अलिझा राणा  गुरूवारी कामाला सुट्टी असल्याने ती एका खाजगी टॅक्सीने गुरूवारी १२ सप्टेंबरला लोणावळ्यात फिरायला म्हणून आली होती. ती पर्यटकांचे आकर्षण असलेल्या लोणावळ्या जवळील लायन्स पॉईंटवर फिरायला गेली होती. त्या ठिकाणच्या एका कड्यावर तिची बॅग सापडली होती. याबाबत स्थानिकांनी लोणावळा ग्रामीण पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेत घटनेची पाहणी  करत बॅग तपासली असता, बॅगमध्ये एक मोबाईल फोन व ओळखपत्र मिळून आले.  पोलिसांनी सदर फोन वरून तिच्या भावाशी संपर्क साधून त्याला लोणावळ्यात बोलावून घेत बॅगची खातरजमा केली. त्यानंतर सदर बॅग अलिझा हिचीच असल्याचे स्पष्ट झाले. 

पोलिसांनी या घटनेचा तपास व शोध घेण्यासाठी शुक्रवारी लोणावळ्यातील शिवदुर्ग मित्रच्या आपत्कालीन पथकाला पाचारण केले होते.  पथकाने येथील दरीत उतरून शोध घेतला होता, मात्र त्यांना काहीही आढळले नव्हते. पुन्हा आज रविवारी सकाळी शिवदुर्गच्या रेस्क्यू पथकाने शोध मोहीम हाती घेतली. दुपारी साडेतीन वाजता लायन्स पॉईंट्स येथील एका दरीत तीनशे फुट खोल अंतरावर एका युवतीचा मृतदेह आढळून आला. सायंंकाळी साडेपाच वाजता अलिझाचा मृतदेह दरीतून बाहेर काढण्यात यश आले. या घटनेचा पुढील तपास लोणावळा ग्रामीण पोलीस करीत आहे. 

या कामात शिवदुर्ग पथकातील आनंद गावडे, चंद्रकांत गाडे, राजेंद्र कडु, वैष्णवी भांगरे, विकास मावकर, दुर्वेश साठे, राहुल देशमुख, प्रविण ढोकळे, सनी कडु, निकेत तेलंगे,अशोक उंबरे, महेश मसने, अभी बोरकर, अनिल आंद्रे, शुभम आंद्रे, अंकुश महाडीक, प्रणय अंबुरे, वैभव शेलार, अजय शेलार, प्रविण देशमुख, ओंकार पडवळ, कपिल दळवी,योगेश अंभोरे, अमोल परचंड, चंद्रकांत बोंबले, अनिकेत आंबेकर, प्रिन्स बैठा, हर्ष तोंडे  रोहित वर्तक, समीर जोशी, सुनील गायकवाड यांचा समावेश होता. 

टॅग्स :lonavalaलोणावळाDeathमृत्यूhinjawadiहिंजवडी