शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

दहावीचा अपघातग्रस्त विद्यार्थी गणेश हाकेला रुग्णालयात पेपर लिहिण्याची बोर्डाची परवानगी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2018 17:04 IST

दहावीचा अपघातग्रस्त विद्यार्थी गणेश हाकेला रुग्णालयात पेपर लिहिण्याची बोर्डाची परवानगी मिळाली असून बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी हाकेची रुग्णालयात जाऊन भेट घेतली.

- हनुमंत देवकरचाकण : दहावीचा अपघातग्रस्त विद्यार्थी गणेश हाकेला रुग्णालयात पेपर लिहिण्याची बोर्डाची परवानगी मिळाली असून बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी हाकेची रुग्णालयात जाऊन भेट घेतली. आज प्रसिद्ध झालेल्या लोकमत वृत्तामुळे दानशूर व्यक्तींचा गणेशच्या उपचारासाठी मदतीचा ओघ सुरु केला आहे. मुलाला रुग्णालयातच अभ्यासासाठी पुस्तके व पेपर लिहण्यासाठी साहित्य उपलब्ध करून दिले. परंतु २१ मार्च व २२ मार्च ला असणारे २ पेपर लिहण्यासाठी चाकण येथील परिक्षा केंद्रात जाण्यासाठी सदर मुलगा असमर्थ होता. म्हणून डॉ. विजय गोकुळे यांनी रुग्णालयातच पेपर लिहण्याची परवानगी मिळवून देण्यासाठी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना मोबाईल वरुन संपर्क केला असता त्यांनी त्वरित त्यांचे स्वीय सहाय्यक कापडणीस यांना तशा सुचना दिल्या. आणि आज गणेशने रुग्णालयातून पेपर लिहिला. गणेश हा भामचंद्र माध्यमिक विद्यालयाचा हुशार विद्यार्थी असून त्याला नववी मध्ये ८४ टक्के मार्क्स पडले आहेत.श्री  शिवाजी विद्यामंदिरचे प्राचार्य अरुण देशमुख यांनी सदर मुलाची परीक्षा रुग्णालयातच घेण्यासाठी मार्गदर्शन केले. डॉ. गोकुळे, बापूसाहेब सोनवणे, दिलीप जाधव हे सर्व एसएससी बोर्ड पुणे चे विभागीय सचिव यांना पुण्यात जाऊन भेटले व गणेश हाके यास रुग्णालयात पेपर लिहण्याची परवानगी मिळवून देण्यासाठी अर्ज केला. भामचंद्र विद्यालयाचे प्राचार्य व लोकमतचे पत्रकार संजय बोरकर यांनी त्वरित ईमेलवर अर्ज व इतर तांत्रिक बाबींची पुर्तता केली. शिक्षणमंत्री विनोद तावडे व एसएससी बोर्ड पुणे विभागीय सचिव दहिफळे यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्यामुळे आणि त्यांच्या अमुल्य व तात्काळ सहकार्यामुळे गणेश हाके या विद्यार्थ्यांला १० वी चे उर्वरित पेपर रुग्णालयात लिहण्याची परवानगी मिळाली. व त्याचे शैक्षणिक वर्ष वाचले. रुग्णालयाच्या जवळच असलेल्या प्रेरणा विद्यालयाच्या केंद्रातील शिक्षक सुपरव्हिजन साठी देऊन गणेशने आज भूगोल विषयाचा पेपर सोडविला.

गणेश हाके या दहावीची बोर्डाची परीक्षा देणा-या एका गरीब मजुराच्या मुलाचा १९ मार्च रोजी चाकणला अपघात झाला होता. अपघातानंतर खंडु शिंदे यांनी सदर मुलास नजीकच्या रुग्णालयात प्रथमोपचारासाठी नेले. उजव्या पायाची दोन्ही हाडे मोडल्या मुळे त्याला प्लास्टर केले. व शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला. परंतु गरीब परिस्थिती मुळे नातेवाईकांनी सामाजिक कार्यकर्ते बापुसाहेब सोनवणे, खेड तालुका एनसीपी डाॅक्टर्स सेल अध्यक्ष व सकल मराठा समाज खेड तालुका मुख्य संघटक डॉ विजय गोकुळे यांना मदतीसाठी आवाहन केले. व त्यामुळे डॉ गोकुळे यांनी त्यांचे मित्र डॉ अमित स्वामी यांना सदर मुलावरील शस्त्रक्रिया सवलतीच्या दरात करण्याची विनंती केली. नातेवाईकांकडे अँबुलन्स ला पैसे नसल्याने स्वतः डॉ गोकुळे व सोनवणे सर अपघातग्रस्त मुलास डॉ स्वामी हाॅस्पिटल ताथवडे येथे अॅडमिट करण्यास कारमधून घेऊन गेले. तिथे डॉ स्वामी यांनी डॉ गोकुळे यांच्या विनंतीवरून ५० टक्के सवलतीच्या दरात उपचार सुरू केले.

या शस्त्रक्रियेकरिता हॉस्पिटलचे बिल भरण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते बापुसाहेब सोनवणे सर, दिलीप जाधव, आप्पासाहेब गवारे, संदीप परदेशी, लायन्स क्लबचे आर सी सुनील जाधव यांनी आर्थिक मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. दोन दिवस भरपूर धावपळ करून व दवाखान्यातील ओपीडीकडे व हॉस्पिटल कडे दुर्लक्ष करून एका गरजू व अपघात ग्रस्त मुलाचे दहावीचे शैक्षणिक वर्ष वाचविण्यासाठी जे प्रयत्न केले याचे आम्हाला खूप मानसिक समाधान मिळाले असून लोकमतचे वृत्त सोशल मीडिया मधून व्हायरल करताच अनेक दानशूर व्यक्तींनी मुलाच्या वडिलांच्या खात्यावर मदतीचा ओघ सुरु झाल्याचे डॉ. गोकुळे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.