शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
2
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
3
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
4
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
5
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
6
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
7
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
8
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
9
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
10
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
11
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
12
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
13
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
14
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
15
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
16
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
17
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  
18
राहा फिट! वजन कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरतं 'पिरॅमिड वॉक'; पण 'ते' आहे तरी काय?
19
'पंचायत'च्या विनोदने 'या' मराठी अभिनेत्रीसोबतही केलंय काम, सिनेमाची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा
20
…तेव्हा अवघ्या २ मतांनी पराभव, आता ४ वर्षांनी बदललं नशीब, पुनर्मतमोजणीत बाजी मारून बनल्या सरपंच  

BMC Election 2017 - एक्झिट पोलमध्ये शिवसेनेला आघाडी, मात्र बहुमतापासून दूरच

By admin | Updated: February 21, 2017 19:35 IST

इंडिया टुडे आणि एक्सिस माय इंडिया एक्झिट पोलनुसार मुंबईत शिवसेना 86 ते 92 जागा मिळवून नंबर वनचा पक्ष बनणार आहे

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 21 - राज्यभरातील महापालिकांसाठी आज मतदान पार पडलं आहे. राजकीय पक्षांचं भवितव्य मतपेटीत कैद झालं असलं तरी इंडिया टुडे आणि अॅक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलनुसार मुंबईत शिवसेना 86 ते 92 जागा मिळवून नंबर वनचा पक्ष बनणार आहे, तर त्यापाठोपाठ भाजपाला 80 ते 88 जागा मिळण्याचा अंदाजही व्यक्त करण्यात आला आहे. काँग्रेसला 30 ते 34 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर राष्ट्रवादीला 3 ते 6 जागा मिळण्याचा अंदाज आहे, तर मनसेला अवघ्या 5 ते 7 जागांवर समाधान मानावं लागणार आहे. अपेक्षेप्रमाणे शिवसेनेला स्पष्ट बहुमत न मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून, मुंबई महापालिकेतील सत्तेसाठी भाजपा आणि शिवसेनेची युती होण्याची शक्यता आहे. (मुंबई  महानगरपालिका निवडणुकीच्या अधिक बातम्या वाचवण्यासाठी क्लिक करा: BMC Election 2017)मनसेच्या पदरात गेल्या वेळेपेक्षा फार कमी यश पडणार आहे. एक्झिट पोलमधून मुंबईत राज ठाकरेंचा करिष्मा ओसरल्याचं चित्र निर्माण झालं आहे. त्यामुळे 23 तारखेलाच खरं चित्र स्पष्ट होणार आहे. 

पुण्यात भाजपाला स्पष्ट बहुमतकाँग्रेस-राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या पुण्यात यंदा कमळ फुलण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. भाजपाला पुण्यात 77 ते 85 जागा मिळून स्पष्ट बहुमत मिळण्याची शक्यता आहे. तर काँग्रेस आघाडीला 60 ते 66 जागांवर समाधान मानावं लागणार आहे. शिवसेनेची घोडदौड फक्त 10 ते 13 जागांवर राहण्याची शक्यता आहे, असा अंदाज इंडिया टुडे आणि अॅक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलमधून व्यक्त करण्यात आला आहे. पुणे महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीला सत्ता सोडावी लागण्याचा अंदाज असून, भाजपा स्वबळावर सत्ता स्थापन करण्याची शक्यता आहे. (पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या अधिक बातम्या वाचवण्यासाठी क्लिक करा: PMC Election 2017)