शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

डोळस समाजाचे अंधत्व हा अडथळा : राहुल देशमुख; ‘स्वामी विवेकानंद युवा पुरस्कार’ वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2018 13:08 IST

अंधत्व ही आमची अडचण नसून, डोळस समाजाचे अंधत्व हा मुख्य अडथळा आहे. अंधत्वावर मात करीत अंध व अपंगांसाठी संगणक शिक्षण देऊन सक्षमीकरणाचे काम करणारे राहुल देशमुख यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देआपली परिस्थिती बदलण्यासाठी बाहेरून कोणी येईल याचा विश्वास नव्हता : राहुल देशमुखराष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समितीचा ‘स्वामी विवेकानंद युवा पुरस्कार’ सोहळा

पुणे : अंधत्व ही आमची अडचण नसून, डोळस समाजाचे अंधत्व हा मुख्य अडथळा आहे. इच्छाशक्तीच्या बळावर आम्ही जग जिंकू शकतो, आम्हाला ध्येय गाठण्यासाठी सर्वांची साथ अपेक्षित असल्याचे मत स्वत: अंध असून, अंधत्वावर मात करीत अंध व अपंगांसाठी संगणक शिक्षण देऊन सक्षमीकरणाचे काम करणारे राहुल देशमुख यांनी व्यक्त केले.राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समितीचा ‘स्वामी विवेकानंद युवा पुरस्कार’ समितीचे प्रांत सह-कोषाध्यक्ष चंदन कटारिया, प्रांत उपाध्यक्षा पूनम मेहता, पुणे महानगर अध्यक्ष विश्वास जोशी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. शास्त्रज्ञ काशिनाथ देवधर, देवता देशमुख, प्रांत कार्यवाह शैलेंद्र बोरकर, पश्चिम महाराष्ट्रप्रमुख गणेश बागदरे यांची प्रमुख उपस्थिती होती. एक्केचाळीस हजार रुपये व सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते.

चंदन कटारिया यांनी प्रास्ताविक केले. समितीच्या महानगर उपाध्यक्षा अलका पेटकर यांनी परिचय करून दिला. अश्विनीकुमार उपाध्ये यांनी सूत्रसंचालन केले. विश्वास जोशी यांनी आभार मानले.

अंधांबाबतच्या गैरसमजांमुळे रेल्वेच्या फलाटावर झोपून शिक्षण घेतले. समाजात बरे-वाईट अनुभव आले. ध्येयाप्रती आत्मविश्वासानाने जाताना खचलो नाही. आपली परिस्थिती बदलण्यासाठी बाहेरून कोणी येईल याचा विश्वास नव्हता. आपल्यावर आलेली वेळ इतर अंध व अपंगांवर येऊ नये, म्हणून कार्यरत झालो. त्यातून सुमारे ९०० अंध व अपंगांना संगणकाचे प्रशिक्षण देऊन सक्षम करता आले. - राहुल देशमुख

अनेक प्रकारच्या समस्या येतात, परंतु त्याचा धैर्याने सामना केला पाहिजे, ही स्वामी विवेकानंदांची शिकवण होती. याच प्रेरणेतून राहुल देशमुख यांच्यासारखे कार्यकर्ते घडतात. - काशिनाथ देवधर

टॅग्स :Puneपुणे