शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

अंध मुलांची सायकल सफर; पुणे ते गोवा अंतर पूर्ण केले अवघ्या ३१ तासांत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2017 12:15 IST

पुणे ते गोवा हे साडेसहाशे किलोमीटरचे अंतर अवघ्या एकतीस तासांत सायकलवर पूर्ण करत अ‍ॅडव्हेंचर बियॉण्ड बॅरियर्स फाऊंडेशन संस्थेच्या मुलांनी नियतीला सपशेल मात देत दिव्य यश संपादन केले.

ठळक मुद्देडेक्कन क्लिफ हँगर सायकल स्पर्धा अ‍ॅडव्हेंचर बियॉण्ड फाऊंडेशनची यशस्वी कामगिरी

पुणे :  अंधपणा हा त्यांच्या आयुष्यात नियतीने टाकलेला एक डाव. नियतीच्या खेळासोबत उपेक्षांनी त्यांचे जगणे असहाय केले होते. तसेच त्यांच्यातला एक तर आश्चर्य म्हणजे धारावीतला गुंड म्हणून वावरत होता. परंतु पुणे ते गोवा हे साडेसहाशे किलोमीटरचे अंतर अवघ्या एकतीस तासांत सायकलवर पूर्ण करत अ‍ॅडव्हेंचर बियॉण्ड बॅरियर्स फाऊंडेशन संस्थेच्या मुलांनी नियतीला सपशेल मात देत  दिव्य यश संपादन केले. डेक्कन क्लिफ हँगर सायकल स्पर्धा आयोजित करण्यात आलेली स्पर्धा त्याचे निमित्त होते. या स्पर्धेतील स्पर्धा पुणे ते गोवा असे ६४५ किलोमीेटरचे अंतर केव़ळ ३२ तासांत सायकलवर पूर्ण करण्याचे आव्हान असते. अ‍ॅडव्हेंचर बियॉण्ड फाऊंडेशनने यशस्वी कामगिरी केली. या संस्थेतील एकीनाथ, मनस्वी बाहेती, दिव्यांशू गणात्रा, प्रसाद या दिव्यांगांचा समावेश केला. त्यांना कॅप्टन नुपूर पिट्टी, भरत पिट्टी, कैलास बाहेती, प्रवीण कुमार यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले. नुपूर पिट्टी म्हणाल्या, की उत्तम सायकलपटूदेखील या स्पर्धेत सहभाग नोंदविताना अनेकदा विचार करतात. कारण तसे हे आव्हान अशक्यप्राय आहे. ते पार करण्यासाठी प्रचंड मेहनत आणि जिद्द आत्मविश्वास स्वत:सह संपूर्ण टीमच्या मनात निर्माण करणे गरजेचे होते. पण स्पर्धेत मिळविलेल्या अभूतपूर्व यशाने सर्व परिश्रमांचे सार्थक झाल्याची भावना मनात आहे.  एकीनाथ म्हणाले,  की धारावीत गुंड म्हणून वावरत होतो. परंतु, अ‍ॅडव्हेंचर बियॉण्ड बॅरियर्समुळे माझ्या जीवनात स्वत:ला सिद्ध करण्याची एक संधी मिळाली. आणि या स्पर्धेतले यश मला प्रकाशाच्या वाटेवर घेऊन आले. यशाचे श्रेय नुपूर पिट्टी मॅडम व आमच्या संपूर्ण टीमचे आहे. स्पर्धेसाठी सर्व टीमने अतिशय प्रामााणिक मेहनत घेतली. यशानंतर लोक मला भेटले की थरारक अनुभवाबद्दल विषयी विचारत असतात. दिव्यांशू गणात्रा यांनी सांगितले, या स्पर्धेत जगभरातले सायकलपटू सहभाग नोंदवतात. खूप कमी लोकांना ते आव्हान पूर्ण करण्यात यश मिळते. प्रवासादरम्यान सायकल इंजिनिअर, डॉक्टर, सायकलिस्ट अशी पाच जणांची सुसज्ज यंत्रणा आमच्या सोबत होती.  

 

अंध किंवा दिव्यांग मुलांना आयुष्यात खूप काही साध्य करायचे असते. त्यांच्याकडे विलक्षण जिद्द आणि प्रचंड आत्मविश्वास असतो. परंतु समाज आणि कुटुंबाकडून त्यांच्यावर नेहमी अविश्वास दाखविला जातो. आमची संस्था मात्र कायम अशा गरुडझेप घेण्यासाठी उत्सुक असलेल्या मुलांना प्रोत्साहन देत त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहते. - नुपूर पिट्टी 

टॅग्स :PuneपुणेStudentविद्यार्थी