शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
3
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
4
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
5
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
6
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
7
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
8
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
9
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
10
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
11
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
12
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
13
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
14
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
15
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
16
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
17
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
18
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
19
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला
20
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!

आफळेबुवांच्या आठवणींना उजाळा

By admin | Updated: February 21, 2017 03:14 IST

पहाटेचे प्रात:स्मरण, माधुकरी मागून मिळविलेल्या जेवणाचा एकित्रतपणे घेतलेला आस्वाद, संस्कृत स्तोत्रांपासून उदकशांतीसारख्या

पुणे : पहाटेचे प्रात:स्मरण, माधुकरी मागून मिळविलेल्या जेवणाचा एकित्रतपणे घेतलेला आस्वाद, संस्कृत स्तोत्रांपासून उदकशांतीसारख्या पूजेपर्यंत मिळालेले धडे आणि मल्लखांब, पोहण्यासारख्या व्यायाम करण्याकरिता उद्युक्त केलेल्या गोविंदस्वामी ऊर्फ नानांनी केलेले संस्कार आज आमच्या जडणघडणीत मोलाचे ठरले, असे सांगत नानाविध आठवणींमध्ये व्यास गुरु कुलातील (सध्याचे नारद मंदिर) ५० वर्षांपूर्वीचा शिष्यवर्ग रमला. निमित्त होते, सदाशिव पेठेतील नारद मंदिर येथे राष्ट्रीय कीर्तनसम्राट गोविंदस्वामी आफळे यांच्या जन्मशताब्दी वर्ष प्रारंभानिमित्त आफळे अकादमीतर्फे व्यास गुरु कुलातील १९५५ ते ६५ मध्ये असलेल्या विद्यार्थ्यांच्या संमेलनाचे. या वेळी सुधाकर थत्ते, वासुदेव आपटे, डॉ. दत्तराजशास्त्री वाडदेकर, डॉ. अरु ण प्रभुणे, सतीश गुर्जर, राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळे, क्रांतिगीता महाबळ, प्राची मोडक, रेवा खडकीकर आणि इतर माजी विद्यार्थी उपस्थित होते.डॉ. दत्तराजशास्त्री वाडदेकर म्हणाले, ‘‘आफळेबुवांनी राज्यभर केलेल्या कीर्तनांतून गरीब मुलांचे संगोपन आम्ही करू, असा प्रचार केला. त्यानुसार अनाथ, गरीब मुलांना सदाशिव पेठेतील व्यास गुरु कुलात एकत्र करीत त्यांना शिक्षण दिले. पहाटे ४.३० पासून गुरु कुलातील दिनक्र म सुरु होत असे. माधुकरी मागून जेवण करायचे आणि बाराही महिने थंड पाण्याने अंघोळ करायची, त्यासोबच संध्या आणि स्तोत्रपठण होतेच. त्यामुळे लहानपणापासून आम्हा सर्वच विद्यार्थ्यांवर उत्तम संस्कार झाले, ते आफळेबुवांमुळेच.डॉ. अरु ण प्रभुणे म्हणाले, ‘‘आफळे यांनी हालअपेष्टा सहन करून शिक्षण घेतले. ते कष्ट गरीब मुलांना सहन करावे लागू नयेत, यासाठी गुरु कुल स्थापन केले. गुरु कुलामध्ये वासंतिक वर्ग होत असत. त्यामध्ये ब्रह्मणस्पतीसूक्त, सत्यनारायण पूजा, वास्तुशांती, सौरसूक्त, पुरु षसूक्त, उदकशांत यांसारख्या अनेक गोष्टी शिकविल्या जात. त्यासोबतच महाराष्ट्र मंडळात व्यायामाचे धडेही मिळत होते. त्यामुळे एक उत्तम नागरिक घडविण्याकरिता साकारलेल्या गुरु कुलात पुन्हा एकदा एकत्र आल्याचा आम्हाला आनंद आहे, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली. (प्रतिनिधी)