शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात १३ वर्षाच्या मुलाला केले ब्लॅकमेल, व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी, दोघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2018 22:07 IST

घरातील पोटमाळ्यावरील कपाटामध्ये ठेवलेले दागिने व रोकड असा ७ लाख ५५ हजार रुपयांचा ऐवज गायब झाल्याने दिसून आले. त्याची चौकशी करीत असताना १३ वर्षाच्या मुलाचा सिगारेट पितानाचा व्हिडिओ काढून तो सोशल मिडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन त्याला ब्लॅकमेल करण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. 

पुणे : घरातील पोटमाळ्यावरील कपाटामध्ये ठेवलेले दागिने व रोकड असा ७ लाख ५५ हजार रुपयांचा ऐवज गायब झाल्याने दिसून आले. त्याची चौकशी करीत असताना १३ वर्षाच्या मुलाचा सिगारेट पितानाचा व्हिडिओ काढून तो सोशल मिडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन त्याला ब्लॅकमेल करण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी एकाला अटक केली आहे.

आदित्य मधुकर वांद्रे (वय १८, रा़ पोफळे वस्ती, बिबवेवाडी) असे त्याचे नाव आहे.  वांद्रे हा महाविद्यालयात शिक्षण घेत आहे.  त्याच्याबरोबरच दोघा अल्पवयीन मुलांना ताब्यात घेऊन त्यांना सुधारगृहात पाठविण्यात आले आहे. तसेच वांद्रे याच्याकडून सोने घेणारा सोनार रेवन शिलवंत (वय ४६, रा़ गंगानगर, फुरसुंगी) यालाही अटक केली आहे. हा प्रकार १४ आॅक्टोंबर २०१७ ते १८ जानेवारी २०१८ दरम्यान घडला आहे. 

याप्रकरणी मुलाच्या वडिलांनी फिर्याद दिली आहे़ त्यांना दोन मुले, पत्नी, आई, वडिल असा परिवार आहे़ मोठा मुलगा बारावीत असून धाकटा १३ वर्षाच्या मुलगा ८वीत शिकत आहे़ १८ जानेवारी रोजी नातेवाईकांच्या येथे मुलाच्या बारशाचा कार्यक्रम होता. त्या निमित्ताने फिर्यादीच्या पत्नीने आणि आईने पोटमाळ्यावरील कपाटात दागिने ठेवले होते. दागिने ठेवलेल्या कपाटात दागिन्यांचा शोध घेऊनही दागिने न मिळाले नाही. त्यानंतर मुलाच्या वडीलांनी घरातील सर्वांना याबाबत विचारणा केल्यानंतर छोटा मुलगा घाबरलेल्या अवस्थेत रडू लागला. त्याला धीर देऊन त्याच्याकडे घडलेल्या प्रकाराबाबत विचारणा केल्यानंतर त्याने घडलेला प्रकार सांगितला. त्यामध्ये त्याने त्याचे दोन अल्पवयीन मित्रांनी व वांद्रेने त्याला सिगारेट पिण्यास शिकविले. सिगारेट पित असताना मोबाईलवर तिघांनी त्याचे चित्रीकरण केले. त्यानंतर हा व्हिडिओ घरच्यांना दाखविण्याची भिती दाखविली व पैशाची मागणी केली. तसेच हा व्हिडिओ व्हाट्सअप, फेसबुकवर शेअर करण्याची धमकी दिली़ त्यामुळे या मुलाने घरातील लोकांना काही न सांगता कपाटातील सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम गुपचूप घेऊन वेळोवेळी या तिघांना दिली. तीन महिन्याने या मुलाकडून त्यांनी ७ लाख ५५ हजार रुपयांचा ऐवज लुबाडला. या मुलाच्या वडिलांना जेव्हा कपाटातील दागिने व रोख रक्कम नसल्याचे दिसून आले, तेव्हा त्यांनी चौकशी केल्यावर हा प्रकार उघडकीस आला़ सहकारनगर पोलीस अधिक तपास करीत आहेत. 

दिवाळीपासून होते लुटत...

या मुलाकडून या तिघांनी ७ लाख ५५ हजार रुपये हडप केले होते. त्यामध्ये १ लाख ७५ हजारांचे ७ तोळ्यांचे सोन्याचे गंठण, पाच तोळ्याचा १ लाख २५ हजार रुपयांचा राणीहार राणीहार, ९ तोळे वजनाच्या  प्रत्येकी ३ तोळ्यांच्या २ लाख २५ हजार रुपयांच्या तीन वेढण्या, ३७ हजार रुपयांचे दीड तोळ्याची कर्णफुले, २५ हजारांची एक तोळ्याची खड्याची सोन्याची अंगठी, ३५ हजार रुपयांची एक किलोची चांदीची वीट आणि ८ हजार रुपये असा ऐवज या मुलाने मित्रांना दिला होता. हा ऐवज वांद्रेने रेवेन शिलवंत याला विकल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. 

टॅग्स :ArrestअटकCrimeगुन्हा